Tag: Chandrapur Cultural Festival 2025

  • Padva Pahat event Chandrapur | चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक तेजाची नवी पहाट; आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रेरणादायी शब्द

    Padva Pahat event Chandrapur

    Padva Pahat event Chandrapur : चंद्रपूर, दि. 22 (News34 वृत्तसेवा) :  चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य प्रतिभावान कलावंत आहे. या सर्वांना एका व्यासपीठावर आणून आपल्या जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अधिक तेजस्वी आणि समृद्ध करावा, असे प्रेरणादायी आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    Also Read : चंद्रपुरात मोठा घातपात टळला

    community unity events

    संस्कृती संवर्धन मंडळाचा वतीने आझाद गार्डन येथे आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग, शैलेश परबते, विजय चंदावार, गणपतराव येवले, नम्रता आचार्य-ठेमस्कर, सूर्य खजांची, रवी लोणकर, धनराज कोवे, डॉ. अशोक वासलवार,डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. विलास मुळे,गोपाल मुंदडा, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. भूपेश भलमे, डॉ. राहुल तपासे, डॉ. सलीम तुकडी, प्रलय सरकार, अमित निरंजने, निलेश काळे, उमेश आष्टणकर, सचिन कोतपल्लीवर,मुग्धा खांडे, पुरुषोत्तम सहारे, चांद पाशा, माया उईके, शिला चव्हाण, सुनील डोंगरे आदींची उपस्थिती होती. Sudhir Mungantiwar cultural initiatives

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, दीपावली सण हा उत्सवांचा राजा असून तो आनंद, ऐक्य आणि प्रकाशाचा सर्वोच्च प्रतीक आहे. संस्कृती संवर्धन मंडळ समाजात “हम साथ साथ हैं” या भावनेचा प्रसार करत आहे. गावांमध्ये भौतिक विकासाबरोबरच संस्कृती, मूल्य आणि मनोविकासालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा जगासाठी प्रेरणादायी ठरली असून, परदेशांतही गणेशोत्सव साजरा केला जातो, हे संस्कृतीची ताकद आणि जागतिक ओळख दर्शवते.

    सांस्कृतिक तेजाची नवी पहाट, चंद्रपूरचा अभिमान:

    डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या दिवाळीपासून एक सुंदर आणि महत्वपूर्ण उपक्रमाला सुरुवात केली.दीपावलीच्या पावन पर्वावर कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून यशाची खात्री झाली. एकेकाळी लोकपूर म्हणून ओळखले जाणारे चंद्रपूर आज उत्साह, संस्कृती आणि सहनशीलतेसाठी ओळखले जाते. जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण ‘सूर्यपूर’ या नावाने नाही तर चंद्रपूर या नावानेच ओळखले जाते. चंद्रपूरकरांच्या सहनशीलतेला संस्कृतीची जोड देत सांस्कृतिक तेज आणि सामाजिक ऐक्याने शहर उजळवूया, हीच या नव्या उपक्रमाची खरी प्रेरणा असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    चंद्रपूरची कला गंगासागराच्या रूपात पाहायला मिळेल:

    तणावात नव्हे, तर आनंदात जगायला शिका, हा संदेश या कार्यक्रमातून उमटला. संस्कृती संवर्धन मंडळाने चंद्रपूरमधील सर्व कलाकारांची नोंद करून पुढील दीपावलीपर्यंत “हम हे चंद्रपूरकर” या भावनेतून एकत्र येऊन हजारो कलाकारांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम साकारण्याचा संकल्प करावा. आजची ही सुरुवात गंगोत्रीसारखी आहे; जशी गंगा प्रवाहित होऊन गंगासागरात मिळते, तशीच संस्कृती आणि कलाकारांच्या कलेची गंगा एक दिवस चांदा क्लब मैदानावर गंगासागराच्या रूपात अवतरलेली पाहायला मिळेल, हा विश्वास या कार्यक्रमाने दिला असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 । चंद्रपूरमध्ये ‘भाऊचा दांडिया’ महोत्सवाचा भव्य समारोप; विजेत्यांना लाखोंची बक्षिसे

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 : चंद्रपूर (४ ऑक्टोबर २०२५) – “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे प्रेम यांमुळेच हा महोत्सव दरवर्षी अधिक उत्साहाने पार पडतो,” अशा भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-भाऊचा दांडिया’ या सोहळ्याचे चौथे वर्ष दिनांक २ ऑक्टोबर रोजी  थाटामाटात संपन्न झाले. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीला वंदन करत सलग अकरा दिवस (२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) चांदा क्लब मैदानावर दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी गुणवंत कलाकारांना दुचाकीसह लाखो रुपयांच्या रोख पुरस्कारांचे वितरण करून त्यांच्या कलागुणांना सन्मानित करण्यात आले.  Bhaucha Dandiya Festival Chandrapur

    Also Read : खासदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केले चक्काजाम आंदोलन

    हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम केवळ दांडियाचा मनमुराद आनंद देणारा नव्हता, तर शिक्षण, क्रीडा, कला, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा गौरव करण्याचा एक महत्त्वाचा मंच ठरला.

    अनुराग घोरपडे आणि मनीषा सरकार चॅम्पियन

    समारोपावेळी दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चॅम्पियन पुरुष गटातून अनुराग घोरपडे आणि चॅम्पियन महिला गटातून मनीषा सरकार यांनी दुचाकी आणि सन्मानचिन्ह पटकावले. याशिवाय, किंग मध्ये धनंजय मेश्राम आणि क्वीन मध्ये सुष्मिता मलिक यांनी पारितोषिक मिळवले.

    bhaucha dandiya festival chandrapur

    यावेळी रील स्पर्धा, ग्रुप दांडिया, लहान गट आणि ३५ वर्षांवरील महिला गटातील स्पर्धकांनाही रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने आयोजित या महोत्सवामुळे चंद्रपूरकरांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि दांडिया खेळण्याची उत्तम संधी मिळाली. या यशस्वी आयोजनाबद्दल स्पर्धकांनी व नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शहरातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.