Tag: Chandrapur crime branch

  • BSNL copper cable thieves arrested । कंत्राटी कामगार म्हणून यायचे आणि चोरी करायचे, स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

    BSNL copper cable thieves arrested

    BSNL copper cable thieves arrested : चंद्रपूर – ९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपुरात स्वतःला कंत्राटी कामगार भासवीत चोरी करणाऱ्या २ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करीत तब्बल ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दूरसंचार विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित अशोक जीवने यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.जीवने यांनी ८ सप्टेंबर रोजी बीएसएनएल कंपनीचे कॉपर केबल चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

    पत्नीवर वाघाचा हल्ला, पती वाघाशी भिडला

    ८ सप्टेंबर रोजी जीवने यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरु केला, पोलिसांनी या गुन्ह्याचा तंत्रबद्ध व सखोल तपास करीत गुन्हेगाराबाबत गोपनीय माहिती काढली असता एक चारचाकी आयशर ट्र्क हा कोसारा रोडवर लपलेल्या स्थितीमध्ये होता, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी पोहचत चौकशी केली असता त्या वाहनात चोरी गेलेला बीएसएनएल कंपनीचा कॉपर केबल किंमत २४ लाख रुपये आढळून आला.

    कामगार म्हणून भासवायचे आणि डाव साधायचा

    गुन्हे शाखेच्या पथकाने आयशर वाहन क्रमांक up२४ bt ७०४६ व कॉपर केबल, हेल्मेट, रिफ्लेक्टर, जॅकेट, प्लॅस्टिक बॅरीकेट सह एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करीत आरोपी २२ वर्षीय नरेंद्र सोरणसिंह मौर्या व २६ वर्षीय नाजीम शोख असमुद्दीन शेख दोघे राहणार कलपिया तालुका जिल्हा बदायू उत्तरप्रदेश यांना अटक करण्यात आली. सदर आरोपी हे स्वतःला कंत्राटी कामगार भासवून दुरुस्तीच्या नावाने कॉपर केबल चोरत होती. crime branch recovers stolen telecom cable

    telecom cable

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, गणेश भोयर, जयंत चुनारकर, नितेश महात्मे, सचिन गुरनुले, किशोर वैरागडे, जयसिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, अजय बागेसर, नितीन कुरेकार, सुरेंद्र महतो, संजय वाढई, दीपक डोंगरे, मिलिंद जांभुळे, प्रदीप मडावी, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, अजित शेंडे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, दिनेश अराडे यांनी केली.