Bhisi police swift crime resolution
Bhisi police swift crime resolution : चंद्रपूर ४ ऑक्टोबर २०२५ – प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी मधील शासकीय निवासस्थानी चोरीचा मुद्देमाल ठेवत ते गिऱ्हाईक शोधत होते मात्र त्यापूर्वी भिसी पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांना अटक केली.
४ ऑक्टोबर च्या मध्यरात्री भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले राकेश ऑटो अँड हार्डवेअर व शरण्या ईलेकट्रीकल या दुकानांचे अज्ञातांनी शटर तोडत रोख ७ हजार ३०० सह १५०० रुपये आणि तीन टेबल फॅन लांबवीले. याबाबत राकेश विजय खोब्रागडे व श्रीकांत सोहनलाल ठोंबरे यांनी भिसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली.
Also Read : शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, तात्काळ तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित
पोलिसात तक्रार नोंद झाल्यावर भिसी पोलिसांनी तपासाला सुरुवात करीत रात्री दरम्यान संशयास्पद फिरत असलेला प्रज्वल उर्फ नागेश वामन तुंबेकर याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने साथीदार दीपक संजय छापेकर व आयुष उर्फ गट्टू खोब्रागडे सोबत चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ दीपक संजय छापेकर ला अटक करीत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. Bhisi shop burglary night arrested
शासकीय निवासस्थानी चोरीचा मुद्देमाल
आरोपी आयुष गट्टू खोब्रागडे पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहे. सदर चोरीचा मुद्देमाल प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी मधील युवराज खोब्रागडे यांच्या शासकीय निवासस्थानी आढळून आला. चोरीचा माल विक्री करीत मिळालेले पैसे वाटप करण्याचे ठरविले होते. भिसी पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासणे अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा उलगडा झाला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी चे ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे , पोउपनि रवींद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी हिरोज हनवते, सतीश झिलपे, श्रीकांत वाढई, स्नेहल खोब्रागडे, हर्षल दडमल व साद शेख यांनी पार पडली.