Tag: Chandrapur bank fraud news

  • AU Small Finance Bank Chandrapur । 🚨 चंद्रपूरमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेचा मनमानी कारभार!

    AU Small Finance Bank Chandrapur

    AU Small Finance Bank Chandrapur : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) चंद्रपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

    हे प्रकरण आहे एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) चे — जिथे एका ग्राहकाने बँकेत आपले सोने गहाण ठेवून कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली, तरीही त्याला पैसे मिळाले नाहीत.

    Also Read : घराच्या अंगणात तरुणाने केली गांजाची लागवड

    🔹 ४ तासांच्या औपचारिकता, तरीही ‘पैसे मिळाले नाहीत’

    मिळालेल्या माहितीनुसार, शकील पठाण नावाचे व्यक्ती आज सकाळी एयू स्मॉल फायनान्स बँक, चंद्रपूर शाखेत पोहोचले.

    त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांना त्यांच्या सोन्याच्या बदल्यात १ लाख रुपयांचे गोल्ड लोन हवे आहे. बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले.

    सुमारे एका तासाच्या प्रतीक्षेनंतर शकील पठाण यांना बोलावण्यात आले आणि त्यांच्या नावावर एयू बँकेत नवीन खाते उघडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत ३ ते ४ तास वेळ गेला. यानंतर बँकेने त्यांना सांगितले की, “थोडा वेळ अजून थांबा, सोन्याची तपासणी आणि मूल्यांकन करण्यासाठी मूल्यमापक (Valuer) येणार आहे.”

    🔹 मूल्यमापन पूर्ण, पण पैसे मिळेनात!

    सुमारे दीड तासानंतर मूल्यमापक (Valuer) पोहोचले, सोन्याची तपासणी केली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आता फक्त बँकेला १ लाख रुपये त्यांच्या खात्यात हस्तांतरित करायचे होते. AU Bank customer harassment case

    पण बँकेकडून उत्तर मिळाले — “तुम्ही जा, तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.”

    मात्र, संध्याकाळचे ७ वाजेपर्यंतही पैसे खात्यात जमा झाले नाहीत. शकील पठाण यांनी पुन्हा बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना धक्कादायक उत्तर मिळाले —

    “पैसे आले नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने परत घेऊन जा.”

    🔹 “मी वणी येथील चारगाव चौकीत आहे, येऊ शकत नाही”

    शकील पठाण यांनी बँकेला सांगितले की, ते सध्या वणी येथील चारगाव चौकी परिसरात आहेत आणि लगेच बँकेत येऊ शकत नाहीत. यावरही बँकेकडून कोणतेही ठोस समाधान देण्यात आले नाही.

    बँकेच्या या गैर-जबाबदार आणि मनमानी कारभारामुळे ग्राहकाचा केवळ वेळच वाया गेला नाही, तर त्यांना मानसिक तणाव आणि आर्थिक गैरसोयीचाही सामना करावा लागला. Gold loan customer complaint

    🔹 ग्राहकाचा आरोप — “आरबीआय नियमांचे उल्लंघन”

    शकील पठाण यांचे म्हणणे आहे की, बँकेने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे निर्धारित गोल्ड लोनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी सांगितले —

    “बँकेने माझ्या सोन्याचे मूल्यांकन करूनही पैसे हस्तांतरित केले नाहीत. उलट, मला दागिने परत घेऊन जाण्यास सांगितले. हे थेट आरबीआयचे मानक आणि बँकिंग नैतिकतेचे उल्लंघन आहे.”

    ते म्हणाले की, ते या प्रकरणाची औपचारिक तक्रार पोलीस ठाण्यात आणि आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात करणार आहेत.

    बँकिंग प्रणालीवर प्रश्नचिन्ह

    ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागांमध्ये कार्यरत असलेल्या काही खासगी बँका कशा प्रकारे ग्राहकांना अनावश्यक विलंब, तांत्रिक कारणे आणि कागदपत्रांच्या औपचारिकतेत गुंतवून ठेवतात, याचे हे प्रकरण स्पष्ट उदाहरण आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेणे ही एक पारदर्शक प्रक्रिया मानली जाते, परंतु अशा घटनांमुळे ग्राहकांचा विश्वास आणि बँकिंग व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसतो. Gold loan disbursement delay

    एयू स्मॉल फायनान्स बँकेने खरोखरच आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे का? पैसे न देता, ग्राहकाचे सोने ताब्यात ठेवणे कायदेशीररित्या गुन्हा ठरतो का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासन आणि बँक नियामक संस्था आरबीआयला द्यावी लागतील.

    शकील पठाण लवकरच या प्रकरणाची तक्रार घेऊन चंद्रपूर पोलीस ठाणे आणि आरबीआय या दोन्ही ठिकाणी पोहोचणार आहेत. दरम्यान, नागरिकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे की, जर एका प्रतिष्ठित खासगी बँकेत असे होऊ शकते, तर सामान्य लोकांच्या बँकिंग सुरक्षेवर काय विश्वास ठेवायचा?

    एयू स्मॉल बँकेची ही घटना केवळ एका ग्राहकाच्या त्रासाची कहाणी नाही, तर संपूर्ण बँकिंग क्षेत्रासाठी धोक्याचा इशारा आहे. जिथे नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि ग्राहकांची गैरसोय “सिस्टमची चूक” म्हणून टाळणे सामान्य होत चालले आहे. AU Small Finance Bank Chandrapur

    वेळेत अशा घटनांवर कारवाई न झाल्यास, “गोल्ड लोन” च्या नावाखाली सुरू असलेले बँकिंग शोषण आणखी खोलवर मूळ धरू शकते.

  • Anand Nagri Bank loan fraud । आनंद नागरी बँक फसवणूक? ४० लाख कर्जप्रकरणाने चंद्रपूर-नागपूर हादरले!

    Anand Nagri Bank loan fraud

    Anand Nagri Bank loan fraud : चंद्रपूर – चंद्रपूर मुख्यालय असणाया आनंद नागरी सहकारी बैंकेची नागपूर येथे जी शाखा आहे. तिथून दीड कोटीच्या मालमत्तेवर खोट्या दास्तावेजाच्या आधारे 40 लाखांच कर्ज प्रकरणी मालमत्ता धारक ज्योती मुदलियार यांनी स्थानिक प्रेस क्लब तेथे पत्रकार परिषद घेऊन बैंकेच्या अध्यक्ष, सिइओ व त्यांना साथ देणायां रुपाली मोरे यांच्यावर मनी लॉंड्रीन्ग ऍक्ट द्वारे गुन्हे दाखल करून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

    बेलोरा गावाच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत खासदार धानोरकर आक्रमक

    यावेळी राजु कुकडे यांनी सांगीतले की, दिपक मुदलियार यांची नागपूर अभ्यंकर नगर येथील प्लाट क्रमांक 252, घरं क्रमांक 311/A/249 दोन मजली इमारत होती, या इमारतीचा किराया केवळ 15 हजार येत होता आणि दीपक मुदलियार हा काहीही धंदा करतं नव्हता, त्यांना पैशाची गरज होती, मात्र त्यांना कर्ज मिळू शकतं नव्हते, दरम्यान त्या इमारतीला गहाण ठेऊन कर्ज उचल करण्यासाठी दिपक ने योगेश खंडवानी या दलालाला आर्थिक अडचण सांगितली, या दरम्यान रुपाली विनोद मोरे हिला योगेश खंडवानी नावाच्या दलालानी दीपक मुदलियार यांना लोन मिळतं नसल्याने तिचे दास्तावेज जोडले व 20 लाख रुपये बोली लावून श्री आनंद नागरी सहकारी बैंक शाखा नागपूर सोनेगाव इथून 40 लाख रुपयाचे कर्ज प्रकरण तयार केले. fake documents loan approval

    या कर्ज प्रकरणात दीपक मुदलियार यांच्या प्लाट क्रमांक 252, घरं क्रमांक 311/A/249 दोन मजली इमारत चे दस्तावेज गहाण ठेवण्यात आले आणि रुपाली मोरे यांचे श्री आनंद नागरी बैंक शाखा सोनेगाव इथे दीपक मुदलियार यांचे सोबत जाईन्ट अकॉउंट तयार करण्यात आले, या जाईन्ट अकॉउंट मध्ये श्री आंनद नागरी सहकारी बैंक तर्फे लोन अमाऊंट 40 लाख रुपये जमा करण्यात आले, मात्र ते सर्व पैसे 40 लाख रुपये रुपाली विनोद मोरे यांनी स्वतःच्या धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी बैंक अकॉउंट मध्ये जमा केले आणि दीपक मुदलियार यांचे धनलक्ष्मी बैंकेत अकाउंट काढून तिथे 15 लाख खात्यात जमा केले. property seizure bank dispute Nagpur

    दिपक मुदलियार यांची मालमत्ता प्लाट क्रमांक 252, घरं क्रमांक 311/A/249 दोन मजली इमारत हिचे मूल्यांकन हे जवळपास 1.5 कोटी रुपयाची असतांना श्री आनंद नागरी सहकारी बैंकेचे अध्यक्ष दीपक पारेख व सिइओ बनकर यांनी ऑक्टोबर 2017 ला दिलेले लोन हे 40 लाखांचे होते ते सन 2023 मध्ये 75 लाख झाले असल्याचे बैंकेने म्हटले व सदर मालमत्ता हिची किंमत 1.15 कोटी लावली आणि त्यातून 35 लाख रुपये कर्जदाराला येऊन दीड कोटीची मालमत्ता हडपली असल्याचा आरोप ज्योती मुदलियार यांनी लावून मला न्याय न मिळाल्यास बैंकेच्या चंद्रपूर मुख्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

    आनंद नागरी अध्यक्ष व इतरांवर नागपूर येथे गुन्हे दाखल?

    दिपक मुदलियार प्रकरणात ज्या पद्धतीने 1.50 कोटीची असताना तीचे मूल्यांकन 1.15 कोटी कसे लावण्यात आले, या मालमत्तेत रुपाली विनोद मोरे हिचा काहीही संबंध नसताना व अधिकार नसताना तिचे दास्तावेज जोडून दीपक मुदलियार यांच्या मालमत्तेवर 40 लाखांचे बेकायदेशीर कर्ज मंजूर झाले कसे हा प्रश्न आहे, बैंकेने बोगस दस्तावेज तयार करून जें कर्ज प्रकरण तयार केले त्यात साक्षीदार विनोद मोरे आहेत जें कर्ज प्रकरणात असलेल्या रुपाली विनोद मोरे हिचे पती आहे, या सर्व स्थितीवरून श्री आंनद नागरी सहकारी बैंक चे संचालक हे बोगस कर्ज प्रकरण करून जनतेची मालमत्ता लुटत आहे हे सिद्ध होते. Anand Nagri Bank loan fraud

    सोबतच जमीन तारण प्रकरणी श्री आंनद नागरी सहकारी बैंकेच्या अध्यक्ष सिइओ व एजंट वर नागपूर च्या पोलीस स्टेशनं मध्ये 76.65 लाखांची अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहे, त्यामुळे श्री आंनद नागरी सहकारी बैंक ही भारतीय रिजर्व बैंकेने आखून दिलेल्या अटी शर्ती आणि निर्देशाचे पालन करतं नसल्याने व जनतेच्या हिताचे रक्षण करतं नसल्याने मनी लॉंड्रीन्ग एक्ट अंतर्गत गुन्ह्यास पात्र आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आगामी 15 दिवसात चंद्रपुर येथील श्री आनंद नागरी सहकारी बैंके समोर आंदोलन करण्याचा इशारा कुकडे यांनी दिला आहे. Anand Nagri Bank property dispute

    यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, पियुष धुपे व मनसे पदाधिका_यांची उपास्थिती होती. Anand Nagri Bank loan fraud