Tag: Chandrapur ATM theft suspects search

  • Chandrapur Bank of Maharashtra ATM robbery । १३ दिवस आणि १ हजार सीसीटीव्ही फुटेज, अखेर आरोपी गवसला; चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    Chandrapur Bank of Maharashtra ATM robbery

    Chandrapur Bank of Maharashtra ATM robbery : चंद्रपूर – १५ ऑगस्ट रोजी घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही अज्ञातांनी बँक ऑफ महाराष्ट्र चे ATM फोडत तब्बल १० लाख ९२ हजारांची रोख रक्कम लंपास केली होती, या गुन्ह्यातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली.

    आदिवासी समाजाच्या मोर्च्यात पोलीस जखमी, ५ जणांवर गुन्हे दाखल

    १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाला पांढरकवडा मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र चे Atm फोडण्यात आले होते, आव्हानात्मक गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला, या गुन्ह्यात काही आरोपी चारचाकी क्रमांक नसलेल्या वाहनातून आले आणि गॅस कटरच्या साहाय्याने ATM फोडत त्यामधील रोख रक्कम लंपास केली.

    हजार सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

    विशेष बाब म्हणजे सदर गुन्ह्यातील आरोपीना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग १३ दिवस ९०० ते १००० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली, तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करीत ५२ वर्षीय जिल्ली सिरदार खान राहणार सबलगड, कामा जिल्हा भरतपूर राजस्थान याला चिन्नूर जिल्हा मंचेरियल तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली. Chandrapur police successful ATM investigation

    आरोपीची चौकशी करीत पुढील तपासासाठी घुग्गुस पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर गुन्ह्यात फरार असलेले आरोपी साजिद खान राजुद्दीन हरियाणा, शेकूल उन्नस खान राजस्थान व काला राहणार हरियाणा यांचा शोध सुरु आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, मिलिंद जांभुळे व ऋषभ बारसिंगे यांनी केली.