Tag: chandrapur accident

  • Chandrapur accident | शहरातील बायपास मार्गावर भीषण अपघात

    Chandrapur accident

    Chandrapur accident : चंद्रपुरातील बायपास मार्गावर 2 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला, अपघातानंतर कार चालक घटनस्थळावरून पसार झाला.

    राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचा विकास करा – आमदार मुनगंटीवार

    दुचाकी वाहन क्रमांक MH34G 6197 हे चंद्रपूर वरून बल्लारपूर च्या दिशेने जात होते त्यावेळी जुनोना मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाले होते मात्र चालकाने वाहन विरुद्ध दिशेने टाकले, अतिवेगात असलेल्या चारचाकी वाहनाने आधी मार्गावर उभ्या असलेल्या स्कुल बस ला धडक दिली.

    त्यानंतर अनियंत्रित कार दुचाकी ला धडकली, धडक इतकी जबर होती की दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला पडला, या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला.
    कार चालक घटनास्थळावरून पसार झाला मृतकाचे नाव अद्याप कळू शकले नाही. (Chandrapur bypass crash)


    रामनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

  • चंद्रपुरात एकाच दिवशी 3 अपघात 3 मृत्यूनंतरही प्रशासन निद्रावस्थेत

    News34

    चंद्रपूर: दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी एकाच दिवशी 3 नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था व जड वाहनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. नागपूर महामार्ग बंगाली कॅम्प व मूल मार्ग तसेच बायपास रस्त्यावरील जीवघेणे अपघात रोखण्याच्या मागणीसाठी आता जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

     

    दुपारी 12 वाजता संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, महिला आघाडीच्या मनीषा बोबडे व युवा आघाडीचे अक्षय येरगुडे यांचे नेतृत्वात जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिवंगत अनिता ठाकरे यांना त्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी वाहतूक अडवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलिसांनी वाहतूक अडविण्यास अटकाव केल्यानंतर अर्धा तास जनविकासचे कार्यकर्ते पोलिसांशी झोंबले. संतप्त कार्यकर्ते व नागरिकांचा आवेश पाहून अखेर पोलिसांनी रस्त्यावरील अपघातस्थळी श्रद्धांजली अर्पण करू दिली.

    जनविकास सेनेच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी अपघातस्थळी दिवंगत अनिता ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करून निवेदन स्वीकारल्यानंतर जनविकासच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचा समारोप केला. शहरातील जीवघेणे अपघात रोखण्याचे हेतुने 8 दिवसांत उपायोजना आखणे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनविकास सेनेने जिल्हा प्रशासनाला दिला.

    यावेळी निर्मला नगराळे, कुसुम उध्दार,किरण कांबळे, श्रुती कांबळे, माया डोईफोडे, पुष्पा मुळे,नेत्रा इंगुलवार, प्रतिभा तेलतुंबडे,मेघा दखणे, चंदा नैताम, संगीता मेश्राम,स्नेहल चौथाले,वसंता जोशी, विशाल बीरमवार, देवा पाचभाई, सुहास फुलझेले,चंद्रमणी पाटील , मनोहर धांडे,सोमेश्वर गीरडकर, अमोल पांढरे, प्रशांत काळे, प्रशांत थूटे, शरद दुरटकर, ओम कोमलवार,प्रतिक हरणे, वैभव लेडांगे,गिरीश ढवस,मनीष घनश्याम येरगुडे, देवराव हटवार ,इमदाद शेख,प्रफुल बैरम,गोलू दाखने, भूषण माकोडे, राहुल दडमल,आकाश लोड़े, शुभम चिंचोलकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

    शहरातील जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नव्याने रिंग रोडचा प्रस्ताव, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनविरुद्ध कारवाई, नियमानुसार वाहनतळ नसलेले हॉटेल, शोरूम ,बार- रेस्टॉरंट,दुचाकी विक्रेते,स्ट्रिट फूड विक्रेते, खाजगी ट्रॅव्हल्स इत्यादीं विरूद्ध कठोर कारवाई, मुख्य रस्ता व सर्विस लेन यांच्यामध्ये छोटे दुभाजक, नागपूर मार्गावर गजानन मंदिर चौकातील ट्राफिक सिग्नल सुरू करणे, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत शहरातून जड वाहतुकीवर बंदी घालणे अशा विविध उपाययोजना आखण्यासाठी पुढील 8 दिवसांत कार्यवाही सुरू करण्याची जनविकास सेनेची मागणी आहे.

     

    तर कदाचित अनिता ठाकरे यांचा जिव वाचला असता…

    16 मार्च 2022 रोजी जनविकास सेनेने नागपूर मार्गावरील एमडीआर मॉल, जुना वरोरा नाका चौक, आंबेडकर भवन मार्ग अशा विविध पाच अपघातप्रवण स्थळांची ओळख पटवून गतिरोधक लावण्याची मागणी बांधकाम विभागाला केली होती. मात्र दीड वर्षात बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. एमडीआर माॅलसमोर नागपूर कडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक असते तर ट्रकची स्पीड कमी झाली असती व 15-20 मीटर अंतरावर झालेल्या अपघातात कदाचित दिवंगत अनिता ठाकरे यांचा जीव वाचला असता.

    असा झाला अपघात…

    गायत्री अलाइनमेंट समोर उभ्या असलेल्या एका स्कार्पियो चालकाने अचानक गाडी मागे घेऊन मुख्य रस्त्यावर नेल्याने अनिता ठाकरे यांना बाजुला जावे लागले. त्याच वेळी भरधाव वेगाने मागून येणाऱ्या ट्रक चालकाने छोट्या टेम्पोला डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्याने अनिता ठाकरे यांच्या गाडीला धडक दिली व अपघात झाला. चौकशी करून सर्व दोषीविरुद्ध कारवाई करण्याची जनविकास सेनेची मागणी आहे.

  • चंद्रपूर शहरात एकाचं दिवशी 3 अपघात, 3 मृत्यू तर 1 गंभीर जखमी

    News34 chandrapur city accident

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात 4 सप्टेंबर ला सकाळपासून अपघातांचे सत्र सुरू झाले, या अपघातामध्ये तिघांचा बळी गेला तर 1 गंभीर जखमी झाला आहे.

    शहरात सकाळी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ने धडक दिली, धडक बसल्यावर ती शिक्षिका खाली कोसळली आणि बघता बघता त्या शिक्षिकेचे डोके ट्रक च्या चाकात आले, या अपघातात शिक्षिका ठाकरे यांचा मृत्यू झाला.

    सायंकाळी साडेसात वाजता चंद्रपूर-मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप जवळ झालेल्या अपघातात 1 युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी आहे.

    हे 2 युवक चंद्रपूरच्या दिशेने भरधाव वेगात येत होते, आदर्श पेट्रोल पंप जवळ येताच युवकांचा दुचाकीवरून नियंत्रण सुटले असता दुचाकी रस्त्यावर स्लिप झाली.

    या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

    या अपघातातनंतर काही वेळात पुन्हा चंद्रपूर-मूल मार्गावर अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

    भास्कर सातपुते राहणार कोंढाळा-घुग्गुस असे मृतकाचे नाव आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भास्कर पायी जात असताना त्याला मागून येणाऱ्या एका ऑटोने एसपायर अकॅडमी नेहरू नगर मूल रोड येथे जोरदार धडक दिली. यात भास्करचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन आटो पसार झाला असून रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहे.

    चंद्रपूर शहरात 4 सप्टेंबर रोजी घडलेल्या अपघात सत्रामध्ये भरधाव वाहनांमुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला, चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेत 2 पोलीस निरीक्षक असताना सुद्धा शहरातील वाहतूक अनियंत्रित कशी? हा मोठा प्रश्न आहे.

    शाळा सुटल्यावर शहरात अल्पवयीन बाईक रायडर्स चा धुमाकूळ सुरू होतो, सायंकाळी दारू पिऊन वाहन चालविणार्याची संख्या सुद्धा मोठी आहे.

    भरधाव वेगात वाहन चालविणारे चंद्रपूर वाहतूक शाखेला दिसत नाही काय? कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज असतात मग भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? वाहतूक शाखेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कुणाचं नियंत्रण नाही का?

    जर वाहतूक पोलीस असेच कार्य करीत राहली तर भरधाव वेगात धावणारे वाहन व होणारे अपघात हे कधीच थांबणार नाही हे विशेष.

     

  • चंद्रपुर शहरात पुन्हा अपघात 1 मृत्यू 1 गंभीर

    News34 accident chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहर आज भीषण अपघाताने हादरुन गेले, सकाळी शाळेत निघालेल्या शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने धडक दिली, यामध्ये शिक्षिकेचा मृत्यू झाला तर सायंकाळी 7 साडेसात वाजता चंद्रपूर मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप जवळ दुचाकी स्लिप झाल्याने एक युवक जागीच ठार झाला.

    सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे निघालेल्या शिक्षिका अनिता ठाकरे यांच्या दुचाकी वाहनाला ट्रक ने जोरदार धडक देत त्यांना फरफटत नेले, या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू झाला.

    सायंकाळी साडे सात वाजता शहरातील आदर्श पेट्रोल पंप जवळ 2 युवक दुचाकी क्रमांक MH34BA9595 ने चंद्रपूर शहराच्या दिशेने भरधाव वेगात येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने स्लिप झाली, यामधील एक युवक रस्त्यावर घासत गेला, त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 युवक गंभीर जखमी झाला.

    चंद्रपूर शहरात आज अपघाताच्या रुपात मृत्यूचे तांडव घडले, मात्र यामध्ये दोष कुणाचा? हा प्रश्न सर्वाना पडला असेलचं, कारण शहरात अनियंत्रित झालेल्या वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे राहिले नाही.

    शहरात आज अल्पवयीन मुलांचं टोळकं भरधाव वेगात वाहन चालविताना सहज आढळतो, महामार्गावरील ट्रक चा सुसाट वेग अपघाताचा अंदाज आपल्या दर्शवितो मग हे वाहतूक विभागाला का दिसत नाही?

    वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित झाल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत आहे, आजचे 2 अपघात अनियंत्रित वाहतुकीचे उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

  • चंद्रपूर शहरातील रिलायन्स पेट्रोलपंप जवळ अपघात शिक्षिका ठार

    News34

    चंद्रपूर – 4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    मृतक 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे राहणाऱ्या होत्या, त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

    4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता शिक्षिका ठाकरे ह्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या, चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक RJ11GC-0824 ने ठाकरे यांच्या दुचाकी वाहन क्रमांक mh34bs4977 ला धडक दिली.

    या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला, धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

    सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.