Tag: Chandrapur accident news

  • Chandrapur multiple deaths in road crash । चंद्रपूरात दोन भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, पाच जखमी

    Chandrapur multiple deaths in road crash

    Chandrapur multiple deaths in road crash : चंद्रपूर (२९ सप्टेंबर २०२५)- चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ५ नागरिक जखमी झाले आहे. मूल तालुक्यातील जुनासुर्ला हद्दीत दुचाकीला ट्र्क ची धडक बसल्याने २ युवकांचा जागीच मृत्यू झाला तर माजरी मध्ये तेलंगणा राज्यातून नातेवाईकांकडे आलेल्या नागरिकांना चारचाकी वाहनांची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, या दोन्ही अपघातात एकूण ५ जण जखमी झाले आहे.

    चंद्रपुरात दहशत थांबेना , युवकांकडून तलवार, कोयता व चाकू जप्त

    २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी – खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत ट्रकने उडविले. या अपघातात सारंग गंडाटे ( वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे ( वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असून या अपघातात एक युवक जखमी आहे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. Chandrapur accident latest news

    माजरी येथे रविवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास एका बोलेरो वाहनाच्या भीषण धडकेत दोन दुचाकींना जोरदार धडक बसून एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. माजरी कॉलरी ते माजरी वस्ती या मार्गावर नागमंदिरासमोर ही दुर्घटना घडली.

    फिर्यादी हॅन्सन प्रकाश राव हे माजरी वस्तीला जात असताना भरधाव बोलेरो (क्र. एमएच ३१ एफसी ६६८७) ने दोन मोटारसायकलींना धडक दिली. पहिल्या मोटारसायकलवर बसलेले जंबोजी व्यंकटचारी, कोंडापर्ती राजमोगली आणि कोंडापर्ती श्रीलता तर दुसऱ्या मोटारसायकलवर बसलेले सपना दत्तू पुरुषोत्तम व जगन्नाथ मलय्या बंडा हे गंभीर जखमी झाले. यातील कोंडापर्ती राजमोगली यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. fatal road accident Chandrapur district

    नातेवाईकाकडे आले आणि…

    या अपघातात जखमी झालेले कोंडापर्ती श्रीलता व मृतक कोंडापर्ती राजमोगली हे तेलंगणा राज्यातील गोदावरी खनी येथील रहिवासी असून ते आपल्या नातेवाईक जंबोजी व्यंकटचारी यांच्याकडे माजरीला आले होते. वर्धा – बल्लारशाह या गाडीतून ते माजरी रेल्वे स्थानकावर उतरले, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी व्यंकटचारी हे मोटारसायकलवर आले होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. तसेच इतर जखमीही रेल्वे स्थानकावरूनच घरी परतत होते.

    दरम्यान, वेकोलिच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना वरोरा आणि नागपूर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले.

    अपघातानंतर माजरी पोलिसांनी बोलेरो चालक अजित नथ्थु पावडे याला अटक करून वाहन जप्त केले. आरोपी चालक हा व्यसनी असून अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माजरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ८१/२०२५ नुसार कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) भादंवि तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  • Nagpur-Chandrapur Highway । नागपूर-चंद्रपूर महामार्ग: ट्रक थेट दुकानात घुसला; एकाचा मृत्यू

    Nagpur-Chandrapur Highway

    Nagpur-Chandrapur Highway : चंद्रपूर, ( १३ सप्टेंबर २०२५) – चंद्रपूर जिल्ह्यातील नागपूर–चंद्रपूर महामार्गावर असलेल्या टेमुर्डा येथील मुख्य चौकात शनिवारी (दि. १३ सप्टेंबर २०२५) पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका १६ चाकी ट्रकने (क्रमांक यूपी ७२ सीटी ७८१७) नियंत्रण गमावले आणि तो थेट रस्त्यावरील दुभाजक तोडून बाजूच्या ‘शिवकृपा मेडिकल’ आणि ‘तेजस्विनी क्लिनिक’ या दवाखान्याच्या टिनशेडवर आदळला. या अपघातात मेडिकलच्या शेडमध्ये झोपलेल्या एका अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

    इरई धरणाचे दरवाजे उघडले, १ मीटरने पाण्याचा विसर्ग सुरु

    काय घडले नेमके?

    पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकमध्ये धडक इतकी जोरदार होती की, मेडिकलच्या लोखंडी शेडचा चक्काचूर झाला. त्याचबरोबर बाजूला असलेले विठ्ठल काळे यांचे भाजीपाल्याचे शेडही उद्ध्वस्त झाले. अपघातानंतर ट्रकचा चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून पळून गेले. Fatal accident

    अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी पाहिले की, शेडमध्ये झोपलेला तरुण ट्रकखाली दबला गेला होता आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या वर्षातील या ठिकाणी घडलेला हा सातवा अपघात आहे, त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

    ‘मोठा अनर्थ’ टळला

    स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अपघाताच्या आदल्या रात्री म्हणजे १२ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी सुमारे २५-३० लोक झोपलेले होते. जर हा अपघात एका दिवसाने झाला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, असा अंदाज वर्तवला जात आहे.

    या चौकात दररोज मच्छी बाजार, फळ-भाजीपाला विक्रेते, नाश्ता सेंटर आणि इतर लहान व्यवसाय चालतात, त्यामुळे येथे नेहमीच मोठी गर्दी असते. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने या चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.