Tag: Chandrapur AAP protest news

  • Chandrapur road sweeping machine scam | चंद्रपूर मनपातील रोड स्वीपिंग मशीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार? – आपचे गंभीर आरोप

    Chandrapur road sweeping machine scam

    Chandrapur road sweeping machine scam : चंद्रपूर २५ सप्टेंबर २०२५ : चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे खरेदी करण्यात आलेल्या व्हॅक्युम असिस्टेड रोड स्वीपिंग मशीन व त्याच्या देखभाल-दुरुस्ती निविदेमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टी, चंद्रपूरने केला आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश दे. गोखरे यांच्या नेतृत्वाखाली आज मा. जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार सादर करण्यात आली.

    तक्रारीतील मुख्य मुद्दे :

    महागडी खरेदी – महानगरपालिकेने GEM पोर्टलवरून मशीन ₹१,०९,५०,०००/- मध्ये खरेदी केले, तर त्याच पोर्टलवर जास्त चांगल्या वैशिष्ट्यांची मशीन ₹५४ ते ₹६५ लाखात उपलब्ध होती. तरीही महागडी मशीन खरेदी करून मोठा संशय निर्माण केला गेला.

    मेंटेनन्स निविदा घोटाळा –

    मशीनच्या ऑपरेशन व देखभालीसाठी ₹८० लाखांची निविदा मंजूर करण्यात आली. गणनेनुसार, ७ कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार सुमारे ₹१२,६०,०००/-, मशीनच्या देखभालीसाठी व सर्व्हिसिंगसाठी सुमारे ₹२०,००,०००/- ते ₹२५,००,०००/- एवढा खर्च होतो. एकूण खर्च साधारण ₹३२ ते ₹३५ लाख एवढाच अपेक्षित असताना निविदा ₹८० लाखांना मंजूर करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे मशीनला लागणारा डिझेल खर्च हा महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे कंत्राटदाराला सुमारे ₹४० लाखांचा अतिरिक्त लाभ मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    १ ऑक्टोबर पासून ताडोबा मधील जिप्सी बंद

    घोटाळ्याचा अंदाज – मशीन खरेदी व देखभाल निविदा प्रक्रियेत मिळून सुमारे ₹१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आप, चंद्रपूरने निदर्शनास आणले.

    आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी सांगितले:

    “महानगरपालिकेने लोकांच्या पैशांचा उघड उघड गैरवापर केला आहे. कमी किमतीत व जास्त चांगल्या वैशिष्ट्यांची मशीन उपलब्ध असूनही महागडी मशीन खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यातच मशीनच्या देखभाल व ऑपरेशनसाठी अनावश्यकपणे दुपटीने खर्च दाखवून कंत्राटदाराला फायदा करून दिला आहे. या दोन्ही प्रकरणांत मिळून सुमारे एक कोटी रुपयांचा घोटाळा झालेला दिसतो. आम्ही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो. जर कारवाई झाली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.” Road sweeping machine tender fraud

    तक्रार अर्ज देताना आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव सुनील मुसळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर संघटणमंत्री संतोष बोपचे, महानगर शिक्षण आघाडी अध्यक्ष एकनाथ हांडेकर सर, विशाल बिरमवार, जितेंद्र भाटिया व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.