Tag: cdcc bank recruitment

  • cdcc bank exam : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत उत्तरात झाला बदल आणि..

    cdcc bank exam

    cdcc bank exam : सहकार क्षेत्रातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती परीक्षेत आज सकाळी चांगलाच गोंधळ उडाला, परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर धरणे आंदोलन करीत मध्यवर्ती बँकेचा निषेध केला.
    अखेर मुंबई आयटीआय कंपनीने आजचा पेपर रद्द करीत उमेदवारांना पुढची तारीख मेल व मोबाईल द्वारे कळविण्यात येणार असे सांगितले.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 358 पदांची पदभरती निघाली होती, यामध्ये लिपिक 261 व शिपाई पदासाठी 97 जागा निघाल्या, या पदभरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. (Cdcc bank recruitment 2024)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधात युवासेनेचे आंदोलन


    358 पदासाठी राज्यभरातून तब्बल 31 हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केला, 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत सदर परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार होत्या मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरातील आंबेडकर कॉलेज केंद्रावर चांगलाच गोंधळ झाला.
    पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळाने उत्तर सेव्ह करीत असताना निवडलेल्या पर्यायात बदल व्हायला लागला.
    याबाबत उमेदवारांनी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितला काही वेळाने सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याचे कारण समोर करीत परीक्षा रद्द केली.

    बँकेच्या परीक्षेत घोळ, आमदार जोरगेवार संतापले

    विशेष बाब म्हणजे चंद्रपुरात या पदभरती परीक्षेचा पेपर देण्यासाठी नांदेड, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अकोला या जिल्ह्यातील उमेदवार आले होते परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त करीत (cdcc bank chandrapur) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.


    ही परीक्षा आधीच सेट केली आहे असा आरोप उपस्थित उमेदवारांनी केला. आम्ही 700 किलोमीटर चे अंतर कापून परीक्षेत सहभागी झालो मात्र पेपर सुरू झाल्यानंतर अचानक हा गोंधळ झाल्याने आम्हाला मानसिक व आर्थिक त्रास झाला, करीता आता आम्हाला स्थानिक जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी उमेदवारांनी केली.

    बँक प्रशासन म्हणते, ती जबाबदारी आमची नाही


    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी आपले हात झटकत आमचा करार मुंबई आयटीआय कंपनी सोबत झाला असून ही सर्व जबाबदारी आहे, यामध्ये बँक प्रशासन जबाबदार नाही अशी प्रतिक्रिया कल्याणकर यांनी दिली.

    आमदार जोरगेवार यांचे गंभीर आरोप

    नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळाबाबत मुद्दा उपस्थित केला, ते म्हणाले की या भरती प्रक्रियेत एका जागेचा दर हा 40 लाख रुपये असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहे, राज्यात 9 जिल्ह्यामध्ये ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.

    आज झालेल्या गोंधळामुळे ही परीक्षा रद्द केली मात्र बाहेर आलेल्या उमेदवारांना याचा आर्थिक भुर्दंड बसला असून सदर परीक्षा आता पारदर्शक पध्दतीने घेण्यात याव्या व उमेदवारांना स्थानिक जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी अधिवेशनात आमदार जोरगेवार यांनी केली.

  • Kishor Jorgewar on cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पदभरतीवरून हिवाळी अधिवेशनात आमदाराचा संताप

    Kishor jorgewar on cdcc bank

    Kishor jorgewar on cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सदर परीक्षा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. यामुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    तसेच या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप असून, सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केली आहे.

    माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा रौप्य महोत्सवी सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित


    जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या लिपिक 261 आणि शिपाई 97 अशा 358 पदांसाठी 31,156 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. मात्र, या परीक्षेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत.

    एका उमेदवाराकडून 40 लाख रुपयांपर्यंत पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केला आहे.
    यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरतीची जाहिरात निघाली. त्यानुसार 21, 22 आणि 23 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र ही परीक्षा चंद्रपूर, नागपूर किंवा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक अशा दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे.

    राज्यातील 31,156 उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, या परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहेत. एका जागेचा 40 लाख रुपये असा दर असल्याच्या तक्रारी असून, सदर परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी अधिवेशनात बोलताना त्यांनी केली आहे.

    रद्द झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना स्थानिक परीक्षा केंद्र द्या – आ. किशोर जोरगेवार

    आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (cdcc bank chandrapur) उमेदवारांची परीक्षा होती. मात्र, पेपर देत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर याची दखल घेत अर्धा तास पेपर झाल्यावर सदर पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली.


    मात्र, या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष असून, याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या दिल्ली येथील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रविण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून, आता पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा उमेदवारांच्या स्थानिक केंद्रावरच घेण्यात यावी.

    त्यांना पुन्हा बाहेर जिल्ह्यात केंद्र देऊन आर्थिक भुर्दंड लादू नये, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सदर कंपनी व्यवस्थापनाने ही आता पुढील परीक्षा स्थानिक केंद्रावर घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीच्या केंद्रांवर ही परीक्षा घेतल्या जाणार आहे.