burglary theft accused
burglary theft accused : 22 डिसेंबर रोजी बाबूपेठ भागातील डीएड कॉलेज परिसरामागे होमगार्ड जीवने यांच्या घरी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान एकाने संधी साधत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारला.
गुन्हा दाखल झाल्यावर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत काही तासात आरोपी 21 वर्षीय युवकाला अटक केली.
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू
घरी आल्यावर कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसल्याने घरी चोरी झाल्याचे समजताच याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सीसीटीव्ही फुटेज घेतले आणि सुरू केला आरोपीचा शोध, विशेष बाब म्हणजे शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चोरी च्या घटनेनंतर अवघ्या 5 तासात आरोपीला अटक केली. (Burglary accused case updates)
गडचांदूर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य
रेकॉर्डवरील 21 वर्षीय आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख राहणार फुकटनगर, संविधान चौक याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
22 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता गौतम जीवने हे मॉर्निंग वॉक साठी बाहेर गेले, त्यांची पत्नी रजनी जीवने ह्या तुकुम येथील होमगार्ड कॅम्प करिता हजर होत्या, त्यामुळे गौतम जीवने हे घरी एकटे होते, त्यामुळे चोराने संधी साधत आपला डाव साधला.
कोण आहे जल्लाद?
जल्लाद शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे, विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. बाहेर निघाल्यावर पोलिसांची त्याच्यावर पाळत होती. आरोपी जल्लाद हा आपल्या घरी राहत नव्हता. त्यानंतर सुद्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अथक परिश्रम करीत त्याला अटक केली. (Accused in theft case)
पोलिसांनी आरोपी जवळून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक बैसाने, पोउपनी संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, राजेश चिताडे, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, इर्शाद खान, विक्रम मेश्राम यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास संतोषकुमार कणकम करीत आहे.