Tag: BJP candidate Sharda Durgam

  • Ghugghus BJP Nomination Rally । भव्य शक्ती प्रदर्शनासह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

    Ghugghus BJP Nomination Rally

    Ghugghus BJP Nomination Rally : घुग्घूस १७ नोव्हेम्बर (News३४) : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली त्यानंतर  नगरपरिषद कार्यालयात पोहोचून सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शारदा दुर्गम यांनी अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षा तर्फे अर्ज सादर केला.

    Read Also : ब्रह्मपुरीत कांग्रेस-वंचित आघाडीचे शक्तिप्रदर्शन, २४ उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

    सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण घुग्घूस शहरात निवडणुकीचा रंग आणला. बँक ऑफ इंडिया चौक, गांधी चौक आणि पंचशील चौक मार्गे जात ही रॅली थेट नगरपरिषद कार्यालयात दाखल झाली. ढोल-ताशांचा दणदणाट, घोषणाबाजी आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख भूमिकेचा जयघोष यामुळे परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. पक्षाचे पदाधिकारी, महिला, युवक आणि विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात पोहोचल्यानंतर सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. Ghugghus BJP Nomination Rally

    यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, घुग्घूसची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून शहराच्या भविष्याचा निर्णायक टप्पा आहे. घुग्घूसचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांतील प्रगती हीच भारतीय जनता पक्षाची प्राथमिकता आहे.

    ते पुढे म्हणाले, घुग्घूसमध्ये आजवर झालेल्या कामांची यादी मोठी आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास हा आमच्या विकासकार्यासाठी महत्त्वाचा प्रेरणास्रोत आहे. भाजपाच्या उमेदवारांमध्ये प्रामाणिकपणा, काम करण्याची क्षमता आणि जनतेशी असलेला आत्मीय संवाद हीच आमची ताकद आहे.

    शारदा दुर्गम या अभ्यासू, समर्पित आणि सर्व समाजमन जिंकणाऱ्या नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात घुग्घूस शहर सर्वसमावेशक विकासाची नवीन उंची गाठेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, घुग्घूस निवडणूक प्रमुख प्रकाश देवतळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, महिला मोर्चा व युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Ghugghus BJP Nomination Rally

    हे आहेत भाजपचे उमेदवार…

    नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार – शारदा मोहन दुर्गम, प्रभाग क्रमांक १ शास्त्रीनगर-आंबेडकर नगर प्रभाग – अ – प्रेमा तगरपवार, ब – विशाल दामेर, प्रभाग क्रमांक २ रामनगर – अ – राजकुमार गोडशेलवार, ब – सरिता इसारप, प्रभाग क्रमांक ३ अ – सुचिता लुटे, ब – शिवराजन गोहणे, प्रभाग क्रमांक ४ अ – विवेक बोढे, ब – चैताली सातपुते, प्रभाग क्रमांक ५ अ – रुपेश कोहळे, ब – पल्लवी सोदारी, प्रभाग क्रमांक ६ अ – कविता तकल्ला, ब – संतोष नुने, प्रभाग क्रमांक ७ अ – गणेश पिंपळकर, ब – मधू तिवारी, प्रभाग क्रमांक ८ अ – शीतल आत्राम, ब – प्रकाश बोबडे, प्रभाग क्रमांक ९ अ – मीना मोरपाका, ब – वैशाली ढवस, प्रभाग क्रमांक १० अ – हेमंत पाझारे, ब – नितु चौधरी, प्रभाग क्रमांक ११ अ – आशिष मासिरकर, ब – सुनीता पाटील.

  • BJP candidate post of Municipal President । नगराध्यक्षपदाच्या उमेदवार; घुग्घूस नगराध्यक्षपदाकरिता शारदा दुर्गम मैदानात

    BJP candidate post of Municipal President

    BJP candidate post of Municipal President : घुग्घूस 17 नोव्हेम्बर (News34) : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून शारदा उर्फ पूजा दुर्गम यांची निवड जाहीर केली आहे.

    Read Also : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजपकडे इच्छुकांची गर्दी

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, घुघूस शहर अध्यक्ष संजय तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शारदा दुर्गम या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर सक्रिय असून, स्थानिक महिलांमध्ये त्यांचा चांगला संपर्क व कार्याचा ठसा असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. BJP candidate post of Municipal President

    घुघूस शहरातील पाणीपुरवठा, रस्ते-विकास, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी अशा विविध प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी सक्षम व पारदर्शक नेतृत्व आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. घुघूसच्या सर्वांगीण विकासासाठी शारदा दुर्गम यांना नगराध्यक्षपदासाठी आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केले आहे. लोकांना विश्वास देणारे नेतृत्व देणे हाच उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

    उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शारदा दुर्गम यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. घुघूस नगरपरिषद निवडणुकीत आता भाजपने उमेदवारी स्पष्ट केल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. इतर पक्ष आणि उमेदवारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.