Tag: bike theft case Chandrapur

  • bike theft case Chandrapur । चंद्रपूरमध्ये दुचाकी चोरी – पोलिसांपेक्षा फिर्यादीनेच शोधला आरोपी

    bike theft case Chandrapur

    bike theft case Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे, तरीसुद्धा हि गुन्हेगारी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर आहे, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा हि गुन्हेगारी नियंत्रित करण्यास असमर्थ ठरली आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थीत होतो. अशीच एक गुन्हेगारी चंद्रपूर शहरात घडली. १३ फेब्रुवारीला शहरातील बंगाली कॅम्प परिसरातून एक दुचाकी वाहन चोरी झाले. मात्र आरोपी अजून मिळाला नाही. सदर दुचाकी चोरी प्रकरण अतिशय रंजक आहे. CCTV footage bike theft

    कौशल्य विकास विभागाचा रोजगार मेळावा संपन्न

    चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १३ फेब्रुवारीला ३१ वर्षीय सुशांत राजबंशी हा युवक भाजीपाला घेण्यासाठी बंगाली कॅम्प येथे गेला, रात्री ८ वाजता भाजीपाला मार्केट जवळ सुशांत ने आपले दुचाकी वाहन क्रमांक MH ३४ बीटी ४५०९ पार्क केले. अंदाजे ९.३० वाजता सुशांत भाजीपाला घेत परत आपल्या दुचाकी जवळ गेला मात्र दुचाकी वाहन पार्क केलेल्या ठिकाणी नव्हते.

    दुचाकी वाहनाचा सुशांतने परिसरात इतरत्र शोध घेतला मात्र वाहन कुठेही आढळून आले नाही. आपलं वाहन चोरी झालं हे समजताच त्याने पोलीस स्टेशन गाठलं मात्र पोलिसांनी सध्या तक्रार करू नका काही दिवस थांबा असे सांगितले. सुशांत काही दिवस थांबला मात्र वाहन नसल्याने त्याचे कामे खोळंबले. त्याने वेळ न गमावता आरोपीबाबत माहिती घेणे सुरु केले. Chandrapur latest crime updates

    आपलं वाहन कुणी चोरी केले? त्याचा पत्ता सुशांतने १२ दिवसांच्या कालावधीत लावला, सीसीटीव्ही फुटेज काढत आरोपीची ओळख सुशांत ने पटवली. त्याचा मोबाईल क्रमांक सुद्धा सुशांत ने शोधून काढला. आरोपी बाबत संपूर्ण माहिती व सीसीटीव्ही फुटेज त्याने पोलिसांना दिले, प्रथमच फिर्यादीने पोलिसांचे काम केले. तब्बल १४ दिवसांनी पोलिसांनी सुशांत ची तक्रार घेतली. मात्र आरोपीने आपला मोबाईल बंद केला. criminal activities in Chandrapur

    CCTV footage bike theft

    आरोपी अजूनही पोलिसांच्या अटकेबाहेर आहे. पोलिसांनी जर वेळीच दुचाकी चोराची माहिती काढली असती तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असता अशी भावना सुशांत ने News३४ समोर व्यक्त केली आहे. मी आरोपी बाबत संपूर्ण माहिती आणि पुन्हा एक दुचाकी वाहन चोरत असताना त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले मात्र यावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही अशी खंत सुद्धा सुशांतने यावेळी व्यक्त केली.