Ravindra Shinde assault complaint after election
Ravindra Shinde assault complaint after election : भद्रावती ४ सप्टेंबर २०२५ – शिवसेना उबाठा मधून भाजपवासी झालेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांनी भद्रावती मधून कांग्रेस व उबाठा ला हद्दपार करीत आहे, अश्यातच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सत्ता शिंदे यांच्या नेतृत्वात ३ सप्टेंबर रोजी आली. कांग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र डोंगे बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान झाले. मात्र हि निवड प्रक्रिया संपताच उबाठा समर्थक ज्ञानेश्वर डुकरे यांनी रविंद्र शिंदे विरुद्ध मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा
३ सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी भाजपकडून राजेंद्र डोंगे तर त्यांच्याविरुद्ध ज्ञानेश्वर डुकरे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला, डुकरे यांचा तब्बल १३ मतांनी पराभव झाला. निवड प्रक्रिया झाल्यावर भास्कर ताजने सोबत ज्ञानेश्वर डुकरे चर्चा करीत असताना सीडीसीसी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे त्याठिकाणी आले आणि डुकरे यांना शिवीगाळ करीत तू आमच्या विरोधात अर्ज का दाखल केला असे म्हणत गालावर झापड मारली अशी तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये डुकरे यांनी शिंदे विरोधात दाखल केली. APMC election Bhadrawati BJP
आरोप फेटाळले
यावर रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि माझ्यावर केलेला मारहाणीचा आरोप खोटा आहे, असा प्रकार त्याठिकाणी घडलेला नाही. लोकशाही मध्ये कुणीही अर्ज दाखल करू शकतो त्यावर आक्षेप घेण्यासारखं काय?
शिवसेना मधून शिवसेना वेगळी झाल्यावर रविंद्र शिंदे यांनी शिवसेना उबाठा ला वरोरा विधानसभा क्षेत्रात नवसंजीवनी देण्याचे काम केले, विशेष बाब म्हणजे आपल्या नेतृत्वात त्यांनी बाजार समिती निवडणूकित विरोधकांची धोबीपछाड करीत एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र कालांतराने राजकीय समीकरणे बदलली आणि शिंदे भाजपात गेले व थेट मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. अश्यात त्यांच्यावर मारहाणीसारखे आरोप हे राजकीय आकसापोटी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.