Tag: AI robotics solar training by government

  • skill development courses by government । राज्यातील 75 हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

    skill development courses by government

    skill development courses by government : चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर २०२५ (News३४) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस असून कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे 75 हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरू राहणार असून 1 ऑक्टोबरला राज्यातील 419 आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

    आदि कर्मयोगी प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन

    कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन  वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही.  skill development courses

    अशा होतकरू युवकांना आणि युवतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.

    राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच  अतिशय अल्पदरात युवक आणि युवतींना रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

    येथे करा नोंदणी :

      https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राज्यातल्या प्रत्येक  जिल्ह्यात सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधीबाबत आणि स्वयंरोजगाराची माहितीही संबंधित आयटीआय संस्थेत दिली जाणार आहे. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवकांनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.