Tag: AI generated tiger video Maharashtra

  • Chandrapur tiger attack AI generated video । चंद्रपुरात वाघाचा हल्ला कॅमेऱ्यात कैद पण…

    Chandrapur tiger attack AI generated video

    Chandrapur tiger attack AI generated video : चंद्रपूर, दि. ०७ (News34) : चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्ष २०२५ मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत ३८ नागरिकांचा बळी गेला आहे, कधी शेतात, कधी रस्त्यावर तर कधी थेट गावात वन्यप्राणी धुमाकूळ घालत हल्ले करीत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ब्रह्मपुरी मध्ये वाघाने एका इसमावर हल्ला करीत त्याला उचलून नेले, या हल्ल्याचा व्हिडीओ सुद्धा समाजमाध्यमवर व्हायरल झाला आहे मात्र सदर व्हिडीओ हा बनावट असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले असून सदर व्हिडीओ बनविणाऱ्यावर कारवाईचा इशारा सुद्धा वनविभागाने दिला आहे.

    ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओबाबत चंद्रपूर वनविभागाने स्पष्ट केले आहे की, ब्रम्हपुरी वनविभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.

    Also Read : चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे कॉलेजचे जानेवारी महिन्यात लोकार्पण

    वनविभागाच्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) साहाय्याने तयार केलेला बनावट व्हिडीओ आहे. या व्हिडीओद्वारे समाजकंटकांकडून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि सत्यविरहित अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    वनविभागाचे स्पष्टीकरण

    अलीकडील काळात ब्रम्हपुरी परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या काही घटना घडल्या असल्या तरी, या बनावट व्हिडीओचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.मुख्य वनसंरक्षक (प्रा.) आर. एम. रामानुजम यांनी सांगितले की, “या व्हिडीओची निर्मिती व प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध विभागाने गंभीर दखल घेतली असून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.” AI deepfake dangerous tiger videos

    अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये. अशा माहितीची नोंद आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या वनविभाग किंवा पोलिस विभागास माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.