Tag: Aap party news

  • high voltage cable | हाय व्होल्टेज केबलमुळे वाढलं नागरिकांचं टेंशन

    high voltage cable

    high voltage cable : चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून डॉ. आंबेडकर नगर प्रभागामध्ये विद्युत प्रवाह बंद असलेले हायहोल्टेज केबल लोम्बकाळत असून अनेक पोल पडण्याचा अवस्थेत आहे.

    भविष्यात यामुळे मोठी जीवित हानी होऊ नये म्हणून याबाबत पीडित जनतेनी आम आदमी पक्षाचे राजू कुडे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी प्रशासनाला १५ दिवसात केबल, तार, पोल हटवण्यासंदर्भात निवेदनातून अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. Aap party news

    बडतर्फ पोलीस कर्मचारी निघाला खुनी

    विशेष बाब म्हणजे अनेक वर्षांपासून विद्युत प्रवाह बंद असलेले तार त्याठिकाणी लोम्बकळत आहे, यावर महावितरण विभागाने आधीच लक्ष द्यायला हवे होते.

    Aap nivedan

    जर चुकून त्या विद्युत तारा मध्ये विजेचा प्रवाह आला तर भविष्यात मोठी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही, याकरिता महावितरण ने तात्काळ ते विद्युत तार काढत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी कुडे यांनी केली.

    यावेळेस आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, महानगर संघटनमंत्रीसंतोष बोपचे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, महानगर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, प्रशांत रामटेके इत्यादी उपस्थित होते.