Tag: हत्या

  • Chandrapur Brutal Crime | चंद्रपुरात जिल्हा हादरलं, 💥 “त्याला जिवंत सोडणार नाही!” – धमकी दिल्यावर दुसऱ्या दिवशीच हत्या

    Chandrapur Brutal Crime

    Chandrapur Brutal Crime राजुरा – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात सास्ती गावात भावाने भावाचा खून केल्याची घटना 15 जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली अशी माहिती आहे.

    चंद्रपुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे भाजपात


    मृतकाचे नाव 45 वर्षीय मारोती भाऊजी भिवनकर तर आरोपीचे नाव 40 वर्षीय दत्तू भाऊजी भिवनकर असे आहे.

    घटनेच्या पूर्वी जीवे मारण्याची धमकी

    मृतक व आरोपीला दारूचे अतिव्यसन असल्याने दोघांच्या पत्नी त्यांच्या सोबत राहत नाही, दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे, 14 जुलै रोजी दोन्ही भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, भांडण सोडविण्यासाठी आई मालन भिवनकर या गेल्या मात्र आरोपी दत्तू ने तिला ढकलून दिले. मारोती कशाला घरी राहतो, त्याला मारून टाकल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दत्तू ने दिली होती. Latest crime news


    दुसऱ्या दिवशी आई मालन ही तब्येत बरी नसल्याने मुलीने त्यांना दवाखान्यात नेले होते.

    15 जुलै रोजी घरी कुणी नसल्याने दोघा भावात पुन्हा वाद झाला, या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, लहान भाऊ दत्तू ने लाकडी दांड्याने मोठ्या भाऊ मारोतीच्या डोक्यावर जोरदार वार केला, या हल्ल्यात मारोती जागेवर कोसळला आणि गतप्राण झाला.


    घरी आल्यावर बहिणीला मारोती रक्तबंबाळ अवस्थेत दिसला, याबाबत राजुरा पोलिसांना माहिती दिली असता राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
    मारोतीची हत्या केल्यावर दत्तू घटनास्थळावरून पसार झाला.
    राजुरा पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

  • murder case in Rajura । 📢 घरगुती वाद, भीषण शेवट – राजूरा खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई!

    murder case in Rajura

    murder case in Rajura : चंद्रपूर: राजुरा तालुक्यातील हरदोना (बुज) गावात एका धक्कादायक घटनेत, एका भावाने आपल्याच सख्ख्या भावाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ जून रोजी रात्री ९ वाजता घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि मुलाला अटक केली आहे.

    चंद्रपूर मनसेत विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

    प्रदीप मनोहर चिलमुले (२४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर राजुरा पोलिसांनी वडील मनोहर बक्का चिलमुले (५०) आणि मोठा भाऊ प्रफुल्ल मनोहर चिलमुले (२८) यांना अटक केली आहे.

    पत्नीसोबत भांडण आणि खुनी संघर्ष

    मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री प्रदीप त्याचे पत्नीसोबत भांडण करत होता आणि तिला मारहाण करत होता. हे पाहून मोठा भाऊ प्रफुल्ल भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थीला गेला. मात्र, प्रदीपने त्याला काठीने मारले. त्यानंतर त्यांचे वडील मनोहर चिलमुले यांनीही मध्यस्थी केली, पण प्रदीप कुणाचेच ऐकत नव्हता. chandrapur crime

    या रागातून प्रफुल्लने प्रदीपला खाली पाडले आणि त्याचा गळा दाबला. त्याच वेळी वडील मनोहर यांनी घरातून दोरी आणून त्याचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्लने गळा दाबल्यामुळे प्रदीप अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात वडील आणि भावाविरुद्ध कट रचून खुन केल्याप्रकरणी अप. क्र. ३०५/२०२५, कलम १०३(१), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते हे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

  • Chandrapur Murder Series : चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरूचं

    Chandrapur Murder Series : चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरूचं

    News34 chandrapur

    कोरपना – 21 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा हत्येची घटना उघडकीस आली आहे. या सत्रात कोरपना तालुक्यातील लोणी गावातील मुलाने कौटुंबिक वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला गेला. या हल्ल्यात आई कमलाबाई सातपुते या जागीच ठार झाल्या तर वडील पांडुरंग सातपुते हे गंभीर जखमी झाले आहे.

     

    आरोपी मुलगा मनोज सातपुते ला कोरपना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे आणि कोरपना पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.

     

     

    या दुःखद घटनेने गावातील लोकांना धक्का दिला आहे आणि त्यांच्या सुरक्षेची गरज वाढविली आहे.

     

    या घटनेने जिल्ह्यातील लोकांना हादरविले आहे आणि त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात घडलेली ही 5 वि हत्येची घटना आहे.

  • बल्लारपुरात हत्येचा थरार

    News34 chandrapur

    बल्लारपूर – बल्लारपूरमध्ये, केवळ 1500 रुपयांची एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक युवक गंभीर जखमी झाला.

     

    6 नोव्हेम्बरला रात्री साडेदहा च्या सुमारास विद्यानगर वार्ड पंचशील चौकात दोन महिलांमध्ये आपापसात उधार घेतलेल्या पैशाच्या व्यवहाराबाबत वाद सुरू होता, त्यानंतर बचावासाठी गेलेल्या 2 युवकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलांनी युवकांवर हल्ला केला, लाठी काठ्यांनी दोन्ही युवकांवर वार करण्यात आला, या हल्ल्यात 32 वर्षीय ललित उर्फ नागेश रमेश तोडसाम चा जागीच मृत्यू झाला तर 24 वर्षीय अमोल देवगडे हा गंभीर जखमी झाला.

    20 वर्षीय शीतल ऋतिक गवई व आकांक्षा नामक महिलेकडून 1500 रुपये उधार घेतले होते, मात्र शीतल ते पैसे परत करीत नव्हती, सोमवारी रात्री आकांक्षा चा भाऊ चैतन्य पंचशील चौकातून जात असताना त्याला शीतल गवई भेटली त्यावेळी त्याने माझ्या बहिणीचे पैसे तू का देत नाही अशी विचारणा केली असता शीतल चा पती रितिक ने चैतन्य ला शिवीगाळी केली, त्याचवेळी ललित व अमोल त्याठिकाणी आले असता त्यांनी रितीक ला समजावले असता दोघात धक्काबुक्की झाली.

     

    परिसरातील नागरिकांनी सुरू असलेला वाद सोडविला, त्यानंतर रितीक घरी गेला त्याने घडलेला प्रसंग आई आशा गवई यांना सांगितला असता त्यांनी आपल्या सोबत सौराब खान यांना घेत माझ्या मुलाला का मारहाण केली म्हणून अमोल व ललित वर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आशा गवई यांच्या सोबत असलेले रितीक गवई, शीतल गवई, सौराब खान, बंडू नगराळे यांनी सुद्धा अमोल व ललित वर काठी व दगडाने वार केला, यामध्ये ललित चा जागीच मृत्यू झाला तर अमोल हा गंभीर जखमी झाला, सध्या अमोल वर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

     

    बल्लारपूर पोलिसांनी तोडसाम हत्या प्रकरणात 5 आरोपीना अटक केली आहे, ज्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.

  • विजयादशमीला चंद्रपुरात हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विजयादशमीला चंद्रपुरातील नगीनाबाग मध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रामनगर पोलिसांनी हत्याकांडात 3 आरोपीना अटक केली आहे.

    नगिना बाग प्रभागात राहणारे 52 वर्षीय नीलकंठ चौधरी असे मृतकाचे नाव आहे, आरोपी मध्ये मृतकाची पत्नी, मुलगी व मेव्हण्याचा समावेश आहे.

     

    विजयादशमी ला सकाळी 8 वाजता मंगला चौधरी यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ विलास लटारु शेंडे रा. सुशी दाबगाव तालुका मूल वरून आला होता, घरी आल्यावर नीलकंठ चौधरी यांनी विलास ला अश्लील शब्दात शिवीगाळी करीत भांडण सुरू केले, वाद वाढत गेला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

    त्यावेळी मुलगी शिल्पा ने लोखंडी रॉड व मंगला यांनी बांबू ने नीलकंठ यांच्या डोक्यावर वार केला, ही नेहमीची कटकट आहे, याला मारून टाका असे उदगार विलास ने काढले असता नीलकंठ चा जबर मारहाणीत मृत्यू झाला.

     

    याबाबत रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

    यावेळी तपास अधिकारी स्वप्नील गोपाले यांनी माहिती दिली की मृतक नीलकंठ मजुरीचे काम करायचा, त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी कुटुंबासोबत भांडण व पत्नी मंगला ला मारहाण करायचा, पत्नी कडील नातेवाईक घरी आले की त्यांना नीलकंठ हाकलून लावायचा, या नित्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी, मुलगी व मेव्हण्याने नीलकंठ ची हत्या केली.

    याबाबत तिघांवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

     

    राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.

     

    तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. लगेच सदर घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार योगेश पारधी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

     

    राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर येथीलच आरोपी निघाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल, कोळसा व भंगार चोरीचे प्रकरण समोर येत आहेत. तसेच या ठिकाणी जुगार व सट्टा चालतो. या परिसरातील युवक अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. याच प्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे. मृतक संदीप निमकर यांच्या घराशेजारी असलेल्या साई मंदिर समोर मोठ्या प्रमाणत अवैद्य धंदे सुरू आहेत. जुगार, सट्टा चालतो. माथरारोडवरील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कोळसा, डिझेल चोरीसह जुगार खेळल्या जात आहे.

     

    राजुरा शहर हे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून अस्तित्वात येत आहे, गोळीबार प्रकरण असो की गांजा तस्करी, कमी वयाची मुले आता बंदूक खेळण्यासारखे जवळ ठेवतात, विशेष म्हणजे राजुऱ्यात कोळसा तस्करांचे मोठे नेटवर्क आहे, दिवसाढवळ्या या ठिकाणी कोळशाची तस्करी केल्या जाते, पण कायद्याचे रक्षक सुद्धा यावर कारवाई करणे टाळतात.