Tag: स्पर्धा परीक्षा

  • free coaching for competitive exams । ‘अम्मा कि पढ़ाई’सारखी सुवर्णसंधी! गरीब मुलांना मोफत स्पर्धा कोचिंग

    free coaching for competitive exams

    free coaching for competitive exams : चंद्रपूर – मूल हुशार असते, त्यांच्या त्यांच्यात जिद्दी असते, ते अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन जगत असतात. मात्र परिस्थिती, गरिबी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आवश्यक साधनांची कमतरता यामुळे त्या स्वप्नांचा भंग होतो. मात्र आता अम्मा कि पढ़ाई केंद्र अशा विद्यार्थ्यांच्या पंखांना स्वप्नांची उडाण देणार आहे. आईच्या नावाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कित्येक आईंची स्वप्नं पूर्ण करणारा ठरणार आहे. उद्याचे अधिकारी अम्मा कि पढ़ाई केंद्रातून घडतील, असे दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा संकल्प असून, हा उपक्रम उद्याचे अधिकारी घडविणारे एक सक्षम केंद्र ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amma Ki Padhai initiative by MLA Kishor Jorgewar

    आणीबाणीचा काळ पुन्हा, चंद्रपुरात प्रदर्शिनी

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला अम्मा कि पढ़ाई हा उपक्रम गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. या उपक्रमांतर्गत आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परीक्षेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क, दर्जेदार व मार्गदर्शक शिक्षण देण्यात येणार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हाधिकारी विनय गौडा, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया, 

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, महसूल विभागाचे संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, प्रा. राजेश दहेगावकर, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, संजय बेले, अजय जयस्वाल, कुणाल घोटेकर, राजू वेलंकीवार, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. scholarship and coaching for underprivileged students

    माझ्या आयुष्यातील महत्वाचा क्षण

    या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज इथे ‘अम्मा कि पढ़ाई’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उभं राहणं  हे केवळ एका कार्यक्रमाचं उद्घाटन नाही, तर माझ्या आयुष्यातील खोल भावना व्यक्त करण्याचा क्षण आहे. आपल्या समाजातील गरीब, होतकरू, जिद्दी, मेहनती विद्यार्थ्यांचं स्वप्न अपूर्ण राहू नये, याच हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम मी माझ्या स्वतःच्या आईच्या नावाने आणि तिच्या प्रेरणेतून सुरू केला आहे.

    amma ki padhai program

    आमच्या घरीसुद्धा परिस्थिती कठीण होती. अशीच स्थिती हजारो घरांमध्ये आहे. त्या सर्व अम्मांसाठी आणि त्यांच्या लेकरांसाठी अम्मा कि पढ़ाई आहे. यामध्ये ३ हजार विद्यार्थ्यांपैकी चाचणी परीक्षा घेऊन २८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यामध्ये मार्गदर्शन, चाचणी परीक्षा, नोट्स, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध अभ्यास यांचा समावेश आहे. Amma Ki Padhai free classes for UPSC and MPSC

    हा केवळ उपक्रम नाही, तर घराघरात शिक्षणासाठी झगडणाऱ्या आईंच्या त्यागाला दिलेली एक सलामी आहे. या उपक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र दीक्षाभूमी इथे असलेल्या महाविद्यालयात होत आहे, हे आमच्यासाठी गौरवाचं आणि अभिमानाचं आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण आणि समतेच्या संदेशावर चालणारा हा उपक्रम त्यांच्या विचारांनाच वाहिलेली आदरांजली आहे, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. या वेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांना त्यांच्या आईविषयी अपार श्रद्धा आहे. free coaching for competitive exams

    त्यांनी यापूर्वीदेखील अनेक उपक्रम आईच्या नावाने सुरू केले असून अम्मा कि पढ़ाई उपक्रम हे त्याचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे.जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे समाजात परिवर्तन घडेल. आमदार  किर्तीकुमार  भांगडिया म्हणाले की, किशोर जोरगेवार यांनी आधी मतदारसंघात अभ्यासिका सुरू केल्या आणि आता अम्मा कि पढ़ाई सुरू करून अभ्यासिका ते अधिकारी बनण्याचा प्रवास शक्य केला आहे.या कार्यक्रमात इंडियन एअर फोर्समध्ये निवड झालेल्या प्रणल जनबंधू यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अम्मा कि पढ़ाई केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

  • शासन निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी रस्त्यावर

    News34 chandrapur
    चंद्रपूर – शासकीय नोकरीचे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात शिक्षण व नोकरी बचाव समितीने जन आक्रोश मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदविला.

     

    महाराष्ट्र शासनाने खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये आज चंद्रपुरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या स्वयंस्फूर्तीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात दीक्षाभूमी परिसरातून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

     

    यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित झाले होते. हातात फलक आणि घोषणाबाजी करत या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

     

    खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा निर्णय हा त्वरित मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी एकजूट झाले. सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या मोर्चात पाठिंबा दर्शवण्यासाठी सहभागी झाले.

     

    विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी काही राजकीय पक्षाच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा आमच्या पक्षाचा आहे असे दर्शविले होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाईने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

    शिक्षण व नोकरी बचाव समितीद्वारे आयोजित ह्या मोर्च्यात हजारोच्या संख्येत तरुणाई सामील झाली.

    आश्वासन नको, अध्यादेश काढावा

    कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेने चंद्रपुरातील आंदोलनकर्त्यांचे समाधान झालेले नाही. राज्यातील युवकांविषयी तळमळ असेल, तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधीचा शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच सप्टेंबर महिन्यात काढलेले सर्व शासन निर्णय, परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असेही सांगण्यात आले.

     

    तरुणाईची मुख्य मागणी

     

    उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकरी हा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणाचा हक्क आहे. मात्र, राज्य शासन बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण करण्याचे परवाने वाटप करीत आहे. शासनाने सदर आदेश तत्काळ रद्द करून सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्‍वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, एनपीएस रद्द करून शिक्षक-राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, एमपीएससी व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेचे शुल्‍क कमी करून १०० रुपये ठेवावे, आयबीपीएस, टीसीएस किंवा इतर खासगी संस्‍थामार्फत विविध पदाच्या स्‍पर्धा परीक्षा न घेता सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाद्वारे घेण्यात याव्‍या, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्‍पर्धा परीक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्‍पना रद्द करणे, राज्‍य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्‍त पदे व अनुदानित संस्‍थेमधील शिक्षक- प्राध्यापकांची रिक्‍त पदे तत्काळ भरावी आदी मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

    जन आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी राज्‍यातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, राज्‍य कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा अन्‍यथा शिक्षण-नोकरी बचाव समिती जिल्‍हा चंद्रपूरच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करून राज्‍यव्‍यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने देण्यात आला.

    जनआक्रोश मोर्चात शिक्षण – नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरचे सर्व सदस्य यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विविध विभागातील शासकीय कर्मचारी, विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर हे मोर्चात प्रामुख्याने सहभागी झाले होते.

    मोर्चातील मागण्यांवर विद्यार्थ्यांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला. त्यानंतर विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील युवक-युवतींच्या हस्ते निवासी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व सदर मागण्यांचे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शेवटी शपथ घेऊन राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.