Tag: सुधीर मुनगंटीवार पाठपुरावा

  • मुल तालुक्यातील सोमनाथ मंदिरास ‘तीर्थक्षेत्र-ब’ दर्जा – आमदार मुनगंटीवारांचा पाठपुरावा

    Somnath Temple Mul taluka : चंद्रपूर ९ डिसेंबर २०२५ (News३४) – मुल तालुक्यातील ऐतिहासिक श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिराला अखेर ‘तीर्थक्षेत्र ब दर्जा’ मिळाला असून हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ठोस पाठपुरावा आणि त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)

    मंदिर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि परिसराची ओळख राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक नकाशावर अधिक भक्कम व्हावी, या दृष्टीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या मंजुरीमुळे सोमनाथ मंदिर परिसराच्या विकासाला आता नवी दिशा आणि गती मिळणार आहे.

    रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी

    तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाल्यानंतर सोमनाथ मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उभारणी, परिसराचे नियोजित सौंदर्यीकरण, आधुनिक सुविधा विकास, पर्यटक केंद्र उभारणी तसेच स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. Somnath Temple Mul taluka

    सोमनाथ मंदिराला मिळालेल्या ‘तीर्थक्षेत्र-ब’ दर्जामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होईल. ब दर्जानंतर नंतर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर विशेष निधी मंजुरी, नवीन सुविधा उभारणी आणि मोठ्या विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगाने होणार आहे. त्यामुळे मुल तालुक्याचा एकूण विकास प्रवास आणखी गतिमान होणार असल्याने मुल तालुक्यातील नागरिकांनी ब दर्जा मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

    मुल तालुक्याचा सर्वसमावेशक विकास

    मुलच्या तालुक्यातील विकासाचा हा प्रवास केवळ शब्दांवर नाही तर ठोस कामांवर उभा आहे. मुख्य रस्त्यांचे उन्नतीकरण, आकर्षक इको पार्क, अत्याधुनिक स्टेडियम, जलतरण तलाव, आदिवासी वसतिगृह, व्यायाम शाळा, पत्रकार भवन, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तहसील कार्यालय इमारत, पंचायत समिती इमारत, कृषी महाविद्यालय, बसस्टँड, आठवडी बाजार, सुसज्ज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी, मुल पॉलिटेक्निक कॉलेजला नुकतीच मंजुरी, नवीन पोलिस स्टेशन, ओव्हरब्रिज, पट्टे वितरण उपक्रम, रेस्ट हाऊस आणि योगाभवन या सर्व प्रकल्पांमुळे मुल तालुक्यातील प्रगतीचा पाया आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अधिक भक्कम झाला आहे.

  • direct bank transfer paddy bonus । मुनगंटीवार यांचे प्रयत्न आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार बोनस

    direct bank transfer paddy bonus

    direct bank transfer paddy bonus : चंद्रपूर : शेतकरी हितासाठी सदैव सक्रिय असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस रक्कम लवकरच जमा होणार आहे. यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेली पहिल्या टप्प्यातील ६९ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, आता १३४ कोटी २ लक्ष ५४ हजार ६३६ रुपयांची रक्कम चंद्रपूर जिल्ह्याच्या पणन अधिकारी विभागाकडे जमा झाली आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. kharif season bonus payment

    व्हिडीओ व्हायरल, शासकीय कर्मचारी कार्यालयात खेळतो पत्ते

    खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस मिळावा, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत व मुख्यमंत्र्यांसमोर सातत्याने लावून धरली होती. ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शासनाने निर्णय घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५ मार्च रोजी अधिकृत शासन निर्णय जाहीर केला होता.

    राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

    विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी धान विक्री केली नसेल तरीही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे, असा ठोस निर्णयही आ. मुनगंटीवार यांच्या मागणीवरून घेण्यात आला होता. या निर्णयामुळे जिल्ह्याच नव्हे, तर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

    शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि सभागृहात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आमदार श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून याआधीही चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ कोटी रुपयांची पीक विमा रक्कम आणि बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या मिळाली आहे. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची ही सातत्यपूर्ण फलश्रुती शेतकरी हितासाठी निर्णायक ठरली आहे.

    शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच बोनस जमा होणार असून, या निर्णयाबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत.