sarpanch election obc reservation demand
sarpanch election obc reservation demand : चंद्रपूर – ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी नव्याने सोडत काढून 27 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी आज दिनांक 20 जून 2025 ला मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री आणि मुख्य निवडणुक अधिकारी यांचे कडे आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक अधिकारी चौधरी साहेब यांचे कडे निवेदन देऊन केली आहे. OBC reservation in gram panchayat elections
जेसीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रपूरच्या दौऱ्यावर
4 एप्रिल 2025 अन्वे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम 1964 मधील नियम पोट नियम (3), (4 ),(5 ),व (6 )मधील तरतूद नुसार अनुसूचित जाती /जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग व स्त्री प्रवर्गातील सरपंच पदे तसेच सर्वसाधारण जागा व स्त्री यासाठी आरक्षित करायची पदाची कारवाई ग्रामविकास विभागाने मार्च 2025 ला सरपंच पदाची आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.
एकही सरपंच पद ओबीसी करीता राखीव नाही
चंद्रपुर जिल्ह्यात दिनांक 23 एप्रिल 2025 ला चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 92 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सोडत काढल्या होत्या, त्यात चिमूर तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकही सरपंच पद राखीव ठेवण्यात आले नाही. दिनांक 6 मे 2025 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण 27 टक्के मान्य केले असल्याने ,महाराष्ट्रातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दिनांक 23 एप्रिल 2025 ला काढलेली सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण करण्यात यावे.
या साठी निवेदन देण्यात आले या वेळी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदूकिशोर वाढई, ॲड देवा पाचभाई, सरपंच्या इंदुबाई पोले ,स्नेहा साव संध्याताई पाटील ,नर्मदा बोरेकर निर्मला दडमड , सोनाबाई हनवते मंगला कलेवाड इत्यादी सरपंच आणि दीपक पिंपळशेंडे, वैभव क्षीरसागर सुरज देवाडकर ,संतोष झाडे,उपस्थित होते.