Tag: संरक्षण भिंत

  • high budget wall for private land protection । मित्रासाठी ₹95 लाखांची सरकारी भिंत!” – आमदारांच्या ‘पॉवर प्रोटेक्शन’वर ‘आप’चा हल्ला!

    high budget wall for private land protection

    high budget wall for private land protection : चंद्रपूर – सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशी एक म्हण आहे मात्र या सत्तेविरोधात चंद्रपूर आम आदमी पार्टीने नाल्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा मुद्दा चंद्रपुरातील नागरिकांच्या लक्षात आणला, चंद्रपुरात वारंवार येणाऱ्या पुराने नागरिक त्रस्त आहे मात्र त्याच निराकरण न करता स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मित्राच्या जागेवर पुराचं पाणी येऊ नये याकरिता शासकीय निधीचा वापर करीत तब्बल ९५ लक्ष रुपयांची संरक्षक भिंत उभारली. या मुद्द्यावर २ जुलै रोजी अधिवेशनात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्या भिंतीवरून मंत्री संजय राठोड व आमदार किशोर जोरगेवार यांना चांगलंच घेरलं. high budget wall for private land protection

    ७ टक्के नफा, चंद्रपुरात गुंतवणूकदारांची फसवणूक

    चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन रस्त्यावरील नाल्यालागत बांधलेल्या संरक्षण भिंतीमुळे आमदार किशोर जोरगेवार व भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलेला आहे. जोरगेवार यांनी शासकीय निधीचा वापर करून स्वतःच्या व मित्राच्या भूखंडासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा आरोप आहे. याच संदर्भात मुनगंटीवार यांनी आज पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. high budget wall for private land protection

    शहरातील हवेली गार्डन परिसरातील नाल्याच्या डाव्या बाजूला पुराचे पाणी वस्तीत येऊ नये यासाठी 140 मीटर लांबीची भिंत बांधण्यात आली आहे. ज्याचा खर्च जवळपास ९५ लाख रुपये आहे. पाटबंधारे विभागाकडून हे बांधकाम करण्यात आले असून महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र यासाठी घेण्यात आले नाही, व नाल्यात अतिक्रमण करून नियम तोडल्याचा आरोप आहे. ही भिंत फक्त दोन भूखंडाचे स्वरक्षण करते त्यापैकी एक जोरगेवार यांचे मित्र यांच्याशी संबंधित आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जास्त लोकवस्ती असताना कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी इतका खर्च का? असा प्रश्न उपस्थित करत आम आदमी पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे २५ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. आप च्या या गंभीर तक्रारीवर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारला. AAP exposes corruption in Chandrapur

    आ. सुधीर मुनगंटीवार

    याच प्रश्नाला घेऊन मुनगंटीवार यांनी विधानसभेत मंत्र्यांना धारेवर धरत बांधकाम करणाऱ्या अभियंताला निलंबित करणार का असा प्रश्न उपस्थित केलाय यामुळे चंद्रपूर भाजप मधील जोरगेवार व मुनगंटीवार यांच्यातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

    आ. विजय वडेट्टीवार

    याच प्रश्नाचा आधार घेत काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आ. वडेट्टीवार यांनी मंत्र्यांनी मोका चौकशी करावी ही भिंत फक्त निकटवर्तियांसाठी बांधण्यात आली असून फक्त एक व्यक्तीला व त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा ९५ लाखांचा निधी खर्च करण्यात आल्याचं सांगत दोषींवर कारवाई करणार आहात का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    संजय राठोड मंत्री जलसंपदा

    भिंत चुकीच्या ठिकाणी बांधली अस नाही आहे, माझ्याकडे गुगल मॅप लोकेशन आहे. दोन्ही बाजूने लोकवस्ती आहे. जिल्हा नियोजनातून पुन्हा कामे प्रस्तावित असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करू

    आ. किशोर जोरगेवार –

    Vo – हा प्रश्न माझ्या मतदारसंघातील आहे. या नाल्यावर नवीन तीन कामे प्रस्तावित आहे. ज्यांची निविदा सुद्धा निघाली आहे. ज्या ठिकाणी मागणी होत असते तिथं काम केलं जाते. त्याठिकाणी झोपडपट्टी धारकांनी मागणी केली होती. त्यानंतर सदर भिंतीचे निर्माण करण्यात आले. high budget wall for private land protection

    २ जुलै रोजी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत आमदार जोरगेवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली, राईकवार म्हणाले कि ज्याठिकाणी लोकवस्ती आहे तिथे हि संरक्षक भिंत बांधण्यात आली नाही, जोरगेवार यांनी मित्राच्या बंगल्याकरिता या भिंतीचे निर्माण शासकीय निधीतून केले आहे, विशेष बाब म्हणजे नाल्याची मूळ रुंदी हि ८ मीटर होती, संरक्षक भिंत नाल्यावर अतिक्रमण करीत बांधल्याने हा नाला आता ४ मीटर चा शिल्लक आहे, याबाबत आम आदमी पक्षाने जलसंधारण विभागात तक्रार दाखल केली होती, लोकवस्ती मध्ये दरवर्षी पावसाचे पाणी शिरते मात्र त्या दिशेला भिंतीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. Chandrapur flood risk due to wall

    शासकीय निधीचा गैरवापर करून सदर भिंतीचे बांधकाम करण्यात आले असल्याने या प्रकरणात सहभागी शासकीय व लोक प्रतिनिधी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, प्रकरणातील दोषींकडून ९५ लाख रुपये वसूल करण्यात यावे. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. आयोजित पत्रकार परिषदेत आप चे प्रदेश सह सचिव सुनील मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संगठन मंत्री संतोष बोपचे, शिक्षक जिल्हाध्यक्ष एकनाथ हांडेकर उपस्थित होते.

  • Ramala lake Chandrapur development news । संरक्षण भिंतीमुळे रामाळा तलावाला नवसंजीवनी, आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

    Ramala lake Chandrapur development news

    Ramala lake Chandrapur development news : चंद्रपूर : चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी 30 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या संरक्षण भिंत बांधकामाची आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी काल रविवारी पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या कामामुळे तलावाचे जतन, सौंदर्यीकरण आणि परिसरातील सार्वजनिक सुरक्षिततेची खात्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. lake protection wall construction benefits

    ताडोबा पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, चंद्रपूर ते थेट मोहर्ली बस सेवा सुरु

    यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेचे अभियंता शिडाम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे, प्रशांत चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बंडू हजारे, रामाळा तलाव बचाव संवर्धन संघर्ष समितीचे जुगल सोमानी, सुधीर बजाज, विनोद सोन, राशिद हुसेन, नकुल वासमवार, संजय बोरघाटे, कार्तिक बोरेवार, आदी उपस्थित होते.

    mla kishor jorgewar visit ramala lake

    ३० कोटींची संरक्षण भिंत

    रामाळा तलाव (ramala lake) हा शहराच्या मध्यवर्ती भागात असून, शतकानुशतकं पासून नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडित आहे. तलावाच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने शासनाच्या 30 कोटी रुपयांच्या निधीतून संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे काम दर्जेदार, मजबूत आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या भावना या तलावाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या कामात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

    रामाला तलाव चंद्रपूरचे भूषण

    भिंतीच्या बांधकामामुळे तलावाच्या किनाऱ्यांचे संरक्षण होईल आणि तलावात गाळ जाण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी, तलावाचे पाणी शुद्ध  राहील आणि परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळणार आहे. तलावाच्या संरक्षणाच्या या प्रकल्पामुळे केवळ चंद्रपूरच्या ऐतिहासिक ओळखीचेच नव्हे, तर जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मोठी मदत होईल. रामाळा तलाव हे चंद्रपूरचे भूषण आहे. या तलावाचे जतन करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी अधिकारी आणि अभियंते सातत्याने प्रयत्नशील आहेत. नागरिकांची अपेक्षा आणि तलावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

    What is the latest update on Ramala lake Chandrapur development news?

    👉 As of June 2025, a ₹30 crore project is underway to build a protection wall and enhance the lake’s safety, beauty, and biodiversity.

    Who is leading the Ramala lake Chandrapur development project?

    👉 The project is being closely monitored by MLA Kishore Jorgewar along with local authorities and Chandrapur Municipal Corporation.

    Why is Ramala lake development important for Chandrapur?

    👉 Ramala lake is a historical and cultural landmark in Chandrapur. Its development ensures environmental protection, tourism boost, and public safety.

    How will the protection wall benefit Ramala lake?

    👉 The wall will prevent silt from entering the lake, protect the banks, and help maintain clean water and biodiversity around Ramala lake.
  • संरक्षण भिंत तोडून घरात घुसला अनियंत्रित ट्रक

    News34 chandrapur

    बल्लारपूर (रमेश निषाद)

    शुक्रवारच्या रात्री एक भरधाव हायवा ट्रक बल्लारपूर- आलापल्ली मार्गावरील येनबोडी येथील एका घरात संरक्षण भिंत तोडून घरात घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरमालक हेमंत भगत यांची संरक्षण भिंत तुटल्याने आणि अंगणात ठेवलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

     

    शुक्रवारच्या मध्यरात्री बल्लारपूरकडून आलापल्ली जाणारा हायवा क्रमांक एमएच ३३ टी ४४१० सुसाट वेगात होता. येनबोडी जवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्ता दुभाजक ओलांडून आणि सुरक्षा जाळी तोडून ट्रक हेमंत भगत यांच्या घरात घुसला अंगणात ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच ३४ बिएन ७७१३ चा चुराडा करीत ट्रक घराच्या भिंतीवर जाऊन आदळला.

     

    सुदैवाने रात्रीची घटना असल्याने मोठी दुर्घटना टळली. येनबोडी येथे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. घटनेच्या वेळी भगत कुटुंबीय गाढ झोपेत होते. पंरतु, आवाजाने त्यांनी घराबाहेर धाव घेतली, शेजारीही धावून आले. घटनेनंतर चालकाने पळ काढला होता. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली.

     

    ठाणेदार उमेश पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. लोहखनिज वाहून नेणाऱ्या ट्रकांमुळे या मार्गावर अपघात वाढले असून, यापूर्वी रस्त्यालगच्या घरांमध्ये ट्रक घुसल्याच्या घडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे दिवसेंदिवस अपघाताच्या मालिकेत वाढ होत आहे. या मार्गावर रोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत.