Tag: शी बॉक्स पोर्टल

  • SHE Box portal for women harassment complaints । कामाच्या ठिकाणी छळ झाला? आता ऑनलाईन तक्रार करा – SHE Box आहे तुमच्यासोबत!

    SHE Box portal for women harassment complaints

    SHE Box portal for women harassment complaints : चंद्रपूर, दि. ८ जुलै : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३’ लागू करण्यात आलेला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणी साठी पीडित महिलेस ऑनलाईन स्वरूपात तक्रार नोंदवता यावी याकरिता मंत्रालयाने ‘शी बॉक्स’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले असून https://shebox.wcd.gov.in या पत्त्यावरून तक्रार सादर करता येते.

    चंद्रपूर शहरात रस्त्यांचे पुनर्बांधकाम सुरु

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी ही वेब लिंक त्यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, तसेच सदर दाव्याबाबत अधिकृत माध्यमांतून जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. how to file sexual harassment complaint online

    कामाच्या ठिकाणी १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील, तर अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे. संबंधित महिलांनी अशा ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाची तक्रार ही समितीकडे करावी. मात्र, जर आस्थापनात १० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असतील किंवा तक्रार थेट नियोक्त्याविरुद्ध असेल, तर ती जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीकडे दाखल करावी लागते.

    तर ५० हजार रुपये दंड

    या अधिनियमामध्ये नमूद केलेल्या कलम २६ नुसार जर कोणत्याही आस्थापनाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, तसेच कलम १३, १४ आणि २२ नुसार आवश्यक कार्यवाही न केली, अथवा अधिनियमातील व नियमांतील तरतुदी व जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत, तर संबंधित मालकास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास त्या आस्थापनाचा परवाना रद्द होणे किंवा दुप्पट दंड आकारला जाणे, अशी तरतूदही आहे.

    कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘शी बॉक्स’ हे पोर्टल अत्यंत उपयुक्त असून पीडित महिलांनी या पोर्टलचा लाभ घेऊन स्वतःच्या हक्कांचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

  • SHE BOX portal for sexual harassment complaints । कंपन्यांनो सावधान! महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियम; SHE BOX वर नोंदणी बंधनकारक!

    SHE BOX portal for sexual harassment complaints

    SHE BOX portal for sexual harassment complaints : चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी आस्थापना जिथे 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी (महिला व पुरूष मिळून) कार्यरत आहे, अशा ठिकाणी, महिलांचे लैंगिक छळापासून सरंक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून याबाबतची माहिती SHE BOX PORTAL वर नोंदविणे बंधनकारक आहे. sexual harassment complaints at workplace

    १२ वी नंतर काय? चंद्रपूर मनपाने आणिली शिका व कमवा योजना, जाणून घ्या

    आजच नोंदणी करा

    प्रत्येक खाजगी आस्थापना, कंपनी, एम.आय.डी.सी. मॉल, शैक्षणिक संस्था, दुकाने, बँक, अशासकीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री, करमणुक, क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे आदींनी त्यांच्या आस्थापनेवर तक्रार समितीची स्थापना करावी तसेच व त्याबाबतची माहिती पोर्टलवर नमुद करावी. सदर माहिती नोंदविण्याकरीता https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे Private Head Office Registration या Tab वर click करावे. आवश्यक सर्व माहितीचा तपशील भरून Submit या Tab वर click करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल.

    अन्यथा ५० हजारांचा दंड

    अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अ) अंतगर्त तक्रास समिती स्थापन केली नाही ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कार्यवाही केली नाही क) या अधिनियमातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्याचे पालन न केल्यास मालकास 50 हजार रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच हा प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतुद आहे.

    करीता सर्व, खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापना करून त्याबाबतीची माहिती SHE BOX PORTAL वर भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक. 011-23388074  किंवा ई मेल – techsupport-shebox@gov.in येथे संपर्क करावा, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.