Tag: शिवसेना

  • Shivsena Mashal : ग्रामीण भागातील युवकांच्या हाती शिवसेनेची मशाल

    Shivsena Mashal : ग्रामीण भागातील युवकांच्या हाती शिवसेनेची मशाल

    shivsena mashal विरई येथील ग्रामपंचायत सदस्य संजयजी मोहूर्ले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, मूल येथील राज ठाकरे व आदींची यावेळी उपस्थिती होती.

    Shivsena mashal बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा जनसंपर्क सातत्याने वाढत असून यासोबत त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत असून जनसामान्य युवक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे.

    अवश्य वाचा : मूल शहरात भीषण आग, 5 दुकाने खाक

    Shivsena mashal यावेळी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी म्हणाले की, शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारा पक्ष आहे. आपणही समाजकार्य करीत असता त्यामुळे आपणास या पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करता येईल व सामान्य नागरिकांना मदत करता येईल. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा असेल, पिक विमा संदर्भात आंदोलन,प्रसंगी सामान्यांना मदत केली. तर शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर वारंवार आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला.

    शेतकरी वीजबिल मुक्त

    विरई येथील ग्रामपंचायत सदस्य संजयजी मोहूर्ले,यांच्या नेतृत्व आदित्य वाढई,भाविक निकोडे,रुपेश ववाके,अजय ढोले,मनोज रस्से,वनपाल ववाके,कैलास जराने,अमोल कटारे,आकाश जेंगळे,शुभम ववाके, परमानंद चौधरी, कमलाकर गेडाम,अजय भोयर, रोहित भोयर, तेजस दंडिकवार,ऋषभ वाढई मंगेश वाढई,आकाश सोनुले,निहाल जांभुळे,भोजराज जांभुळे,सचिन वाढई, सचिन जांभळे, क्रिश निकोडे,सौरभ मुवेडवार,साहिल शेंडे,प्रलय वाढई, रोहित नले,अनिकेत शेंडे,राकेश मोहुरले,रंजीत शेंडे,साजिद शेख,वेदांत लेंगुनरे,तेजस सोनुले, किरण भोयर,प्रफुल सोनुले,आकाश ढोले,रोहित चटारे व इतर युवकांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा घालून शिवसेना पक्षात त्यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी गावातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Mega Job Fair : शिवसेनेचा भव्य रोजगार मेळावा

    Mega Job Fair : शिवसेनेचा भव्य रोजगार मेळावा

    mega job fair : राज्यात वाढत असलेली बेरोजगारी आता चिंतेचा विषय बनला आहे, 100 नोकरी जिथे असेल त्याठिकाणी लाखो बेरोजगारांचे अर्ज येतात, गुणवत्ता आणि पात्रता असून सुद्धा योग्य उमेदवाराला नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे.

    अवश्य वाचा : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक, कारागृहात केले स्थानबद्ध


    Mega job fair चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच अवस्था आहे, मात्र आता ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाती रोजगाराची मशाल देण्याचं काम शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे हे आपल्या माध्यमातून करीत आहे.
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजतापासून नवभारत विद्यालय मूल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


    विशेष बाब म्हणजे आयोजित मेळाव्यात देशातील 50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहे, शिक्षित व कुशल तरुण-तरुणींना या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
    आयोजित मेळाव्यात 5 हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना थेट नियुक्ती पत्र सुद्धा दिल्या जाणार आहे.
    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी सदर रोजगार मेळाव्यातून युवाशक्तीचे हात सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
    आयोजित रोजगार मेळाव्यात शिक्षित बेरोजगार युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संदीप गिर्हे यांनी केले आहे.