Tag: वीज ग्राहक

  • MSEDCL security deposit deduction policy । 💥 महावितरणचा नवा दणका! तुमची जमा ठेवीच कापली जाणार?

    MSEDCL security deposit deduction policy

    MSEDCL security deposit deduction policy : चंद्रपूर :- 23 जुलै – दोन महिने ज्यांचे वीज देयक थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल असा नवीन नियम महावितरणने 15 जुलैपासून लागू केला आहे. सर्व संवर्गातील ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत आहे.

    अवैध बांधकामाची आता करा ऑनलाईन तक्रार

    यामुळे महावितरण ही वीज कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात वीज ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे. ही रक्कम एकदा कपात झाली की नंतर वीज ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल. what happens if electricity bill is unpaid for 2 months

    महावितरणकडून प्रत्येक वर्षी वाढीव वीज देयकानुसार पाठवले जात असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम ज्या ग्राहकांनी भरली नसेल त्याला ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाचे शिल्लक देयक भरता येईल ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वीची सुरक्षा ठेव, देयकाची थकबाकी भरावी लागेल.

    विज जोडणी शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येऊ शकेल.
    हा नियम लागू होण्यापूर्वी दोन महिन्यांचे देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात पंधरा दिवसांची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही देयक न भरल्यास वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात होता. कायम विजपुरवठा खंडित झाल्यावर मात्र सुरक्षा ठेवीतील रक्कम थकबाकीतून वळती केली जात होती.

    नियम

    • 15 जुलैपासून महावितरणाचा नवा नियम लागू
    • दोन महिने वीज बिल न भरल्यास, तिसऱ्या महिन्यात ठेवीतून वसुली
    • नंतर सुरक्षा ठेव पुन्हा भरावी लागणार, अन्यथा सेवा प्रभावित होणार
    • महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वीज खंडित करण्याची जबाबदारी होणार कमी
    • मोठ्या थकबाकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न
    • कंपनीच्या आर्थिक स्थेर्याला बळकटी देण्यासाठी निर्णय
  • Abhay Scheme in maharashtra : वीज ग्राहकांना मिळणार अभय

    Abhay Scheme in maharashtra : वीज ग्राहकांना मिळणार अभय

    abhay scheme in maharashtra महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. वीज कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत, थकीत वीजबिलावरचे व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार आहे. सदर योजना 1 सप्टेंबर पासून राज्यात लागू करण्यात आली आहे.

    Abhay scheme in maharashtra महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु करण्यात आलीय. १ सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येतेय.
    राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय.
    वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे.
    याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत.
    या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधीत वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल.
    महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल.

    काय आहे ही योजना?

    अभय योजना ही महावितरणची नवीन योजना आहे. या अंतर्गत ग्राहकांना थकीत वीजबिल भरण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. (Abhay scheme in maharashtra) जे ग्राहक आपल्या थकीत वीजबिलाचे भरण करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

    अभय योजना
    • कालावधी: १ सप्टेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४.
    • लाभार्थी: घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहक.
    • व्याज आणि विलंब शुल्क माफी: थकीत वीजबिलावरील एकूण १,७८८ कोटी रुपये माफ.

    महावितरणच्या वेबसाईट  (www.mahadiscom.in/wss/wss) किंवा मोबाइल ॲपवर अर्ज करता येईल. ग्राहक टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकतात.

    • टोल फ्री क्रमांक: १९१२, १८००२३३३४३५, १८००२१२३४३५

    ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सदर योजना लागू करण्यात आली असून लाखो वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळविता येणे शक्य होणार आहे, थकीत वीज बिल भरून पुन्हा वीज कनेक्शन या योजनेमुळे पुन्हा मिळणार आहे. हे सर्व महायुतीच्या कल्याणकारी सरकारमुळे सदर योजना अंमलात आली आहे.

  • वर्षभरात चंद्रपूर महावितरणचे 43 हजार 833 नवे वीज ग्राहक

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात एप्रील २२ ते २० ऑक्टोबर २०२३ या वर्षभराच्या कालावधीत विविध वर्गवारीतील नविन ४३ हजार ८३३ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात २४ हजार २७५ तर गडचिरोली मंडळातील १९ हजार ५५८ ग्राहकांना वीजजोडण्या देत महावितरणच्या माध्यमातून प्रकाश पोहोचला.

    देण्यात आलेल्या या लघूदाब वीजजोडण्या
    चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर मंडळात घरगुती २६ हजार ८४२, वाणिज्यिक ६ हजार २५३, औदयोगिक ५४१, सरकारी कार्यालये ९४०, पाणिपुरवठा १५१, पथदिवे ९६, कृषिपंप ७ हजार ६३१, कुक्कूटपालन ६१, इतर लघूदाब २०८ व तात्पुरत्या १ हजार १०७ अशा एकंदरीत ४३ हजार ८३३ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या
    चंद्रपूर मंडळात घरगुती १४ हजार ८४०, वाणिज्यिक ४ हजार ४५६, औदयोगिक ३३५, सरकारी कार्यालये ५९१, पाणिपुरवठा ७७, पथदिवे ४०, कृषिपंप ३ हजार ५९१, कुक्कूटपालन ३१, इतर लघूदाब १४७, व तात्पुरत्या १६४ अशा एकंदरीत २४ हजार २७५ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या.

     

    गडचिरोली मंडळात घरगुती १२ हजार २, वाणिज्यिक १ हजार ७९७, औदयोगिक २०६, सरकारी कार्यालये ३४९, पाणिपुरवठा ७४, पथदिवे ५६, कृषिपंप ४ हजार ४० , कुक्कूटपालन ३०, इतर लघूदाब ६१, व तात्पुरत्या ९४३ अशा एकंदरीत १९ हजार ५५८ वीजजोडण्या गडचिरोली मंडळात देण्यात आल्या.

    तसेचं उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहे.

    केंद्र शासनाच्या अतिमहत्वाकांक्षी अशा उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत या योजणेच्या सुरुवतीच्या वर्षापासून म्हणजे २०१८ पासून ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या देण्याचे निर्धारीत लक्ष पूर्ण करीत चंद्रपूर मंडळात २ हजार ५५१ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून २ हजार ५८४ वीजजोडण्या देण्यात आल्या. तर गडचिरोली मंडळात, १ हजार ४५८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून १ हजार ४७२ वीजजोडण्या देण्यात आल्या.
    उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

     

    ग्राहकांप्रति कर्तव्य पार पाडित आपली जबाबदारी ओळखून महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना सुरळीत सेवा प्रदान करण्यास नेहमी तत्पर असतात. देण्यात आलेल्या वीजजोडण्यामुळे ग्राहकांच्या जीवनात प्रकाश पडला आहे. परंतु थकबाकीमुळे महावितरणला ग्राहकांच्या दारात वसुलीसाठी जावे लागत आहे. तेव्हा ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणा करुन महावितरण्ला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.