Tag: विजेचा धक्का

  • sudden electric shock while drying clothes । 💥 अंगणातील तार ठरली मृत्यूचं कारण, महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    sudden electric shock while drying clothes

    sudden electric shock while drying clothes : राजुरा – मृत्यू हा कधी आणि केव्हाही येऊ शकतो, त्यासाठी एक निमित्त पुरे आहे, अधिक हृदयद्रावक घटना राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) गावात घडली. घरातील कामे आटोपते करीत असताना महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला, या धक्क्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या महिलांना अटक

    ४० वर्षीय सुवर्णा राजेश वांढरे असे त्या मृत महिलेचे नाव असून घरासमोरील अंगणात कपडे वाळू लावायला बाहेर आलेल्या सुवर्णा यांनी कपडे वाळविण्यासाठी अंगणातील लोखंडी तारांवर कपडे ठेवत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. हि घटना २० जुलै रोजी रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

    सर्व्हिस केबलमुळे विजेचा प्रवाह

    विशेष बाब म्हणजे त्या तारेला कटलेली विजेची सर्व्हिस केबल लागली होती त्यामुळे त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सुरु होता, याची कल्पना सुर्वणा यांना नव्हती नेहमीप्रमाणे त्या आपलं काम करीत होत्या मात्र आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल असे कुणालाही वाटलं नसेल.

    या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वांढरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

     

  • gopinath munde farmer accident insurance scheme । गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना – पात्रता, प्रक्रिया आणि फायदे एका क्लिकवर!

    gopinath munde farmer accident insurance scheme

    gopinath munde farmer accident insurance scheme : चंद्रपूर, दि. 15 : शेती करतांना होणारे अपघात तसेच अपघातामुळे उद्भवणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

    दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना

    राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील 10 ते 75 वयोगटातील एका सदस्याला अपघात विमा संरक्षण प्रदान करते. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत असून अपघाताच्या घटनेनंतर 30 दिवसांच्या आत विहित कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. gopinath munde yojana accident claim

    शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्यास त्याचे वारसदारांना रुपये दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच वरील अपघातात संबंधित शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत अनुज्ञेय आहे. apply online for farmer accident insurance scheme

    नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या/ प्रयत्न, कायद्याचे उल्लंघन करताना झालेल्या घटना, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली अपघात, उष्माघात, भ्रमिष्टपणा, शरिरातील रक्तस्त्राव, युद्ध, सैन्यातील सेवा, इत्यादी प्रकरणी तसेच अन्य कोणत्याही शासकीय विभागाच्या अपघात अनुदान योजनेचा लाभ घेतल्यास सदर योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही. 

    या अपघातांचा समावेश :

    योजनेंतर्गत रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू,  विषबाधा (जंतुनाशक किंवा अन्य कारणे), विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडणे, सर्पदंश / विंचूदंश, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू, जनावरांमुळे झालेला अपघात, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व इतर कोणताही अपघात प्रकारांसाठी लाभ मिळू शकतो. अनुदान मिळण्याकरीता पती/पत्नी, अविवाहित मुलगी, आई, मुलगा, वडील, सुन इतर कायदेशीर वारस या प्राधान्य क्रमानुसार असतील.

    आवश्यक कागदपत्रे :

     प्रस्ताव सादर करतांना 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, गावकामगार तलाठी द्वारा मंजूर वारसांची यादी (गाव नमुना 6 क), ओळखपत्र (आधार/पॅन/बँक पासबुक/मतदार कार्ड), वयाचा दाखला, अपघाताचा अहवाल (एफआयआर, पंचनामा, पोलिस पाटील अहवाल) इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असून  प्रस्ताव 30 दिवसांत सादर न झाल्यास एका साध्या कागदावर अपघाताची सविस्तर माहिती देऊन तात्पुरता अर्ज सादर करता येतो.

  • livestock killed by power lines । वादळानंतर शेतात मृत्यूचे तांडव – ८ जनावरांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू!

    livestock killed by power lines

    livestock killed by power lines : सावली – मानसूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे प्रवाहीत तारे तुटून शेतात पडल्याने 8 जनावरांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज 24 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता सावली तालुक्यातील उसेगाव येथे घडली आहे.

    अचानक वादळ आले आणि…

    नेहमीप्रमाणे आजही उसेगाव येथील जनावरे शेतात चरत होते. त्यामध्ये 6 बैल आणि 2 गाईंचा समावेश होता. शेतात चरत असताना अचानक आलेल्या वादळामुळे विजेचा खांब कोसळला आणि त्यावरून तारे तुटून खाली पडल्या. या तारांना स्पर्श झाल्याने जनावरारे विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले. ही घटना उद्धव रोहणकर यांच्या शेतात घडली.

    राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकीय भूकंप

    घटनेची माहिती मिळताच गावकरी शेतात दाखल झाले. महावितरण कंपनीला याची माहिती देण्यात आली. कंपनीने त्वरित सूचना दिली की कोणत्याही जनावरांना हात लावू नका, कारण तारा अजूनही प्रवाहित होत्या. काही वेळातच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ विजेचा प्रवाह खंडित केला.

    या अपघातात कालीदास पाल, देवाजी भोयर, मानिक गोहणे, बालूजी ठुसे, भोजराज गोहणे आणि अरुण भोयर यांचे प्रत्येकी एक बैल तसेच संतोष भोयर आणि हिराजी गोहणे यांची प्रत्येकी एक गाय असा एकूण 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

    या गंभीर घटनेनंतर पशुपालकांनी महावितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी तसेच सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. Mahavitaran responsibility in livestock deaths

  • man dies due to electric wire । सायलवरून जाताना चाकात अडकला मृत्यू, चंद्रपुरात भयावह दुर्घटना

    man dies due to electric wire

    man dies due to electric wire : चंद्रपूर: आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यामुळे रस्त्यावरून सायकलने जाणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.

    शॉर्ट सर्किट आणि मृत्यू


    सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार जाते. काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोठे वादळ आले. परंतु त्याच्या 1 तास आधीच जवळपास सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट सारखा आवाज झाला व ही 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली.

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रॉ

    काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली.4 वाजून 59 मिनिटांनी तक्रार केल्याची नोंद आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही. पडलेली तार सुद्धा उचलली नाही. तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मात्र सायंकाळी 6 वाजता तक्रारीचा निपटारा झाल्याचा ऑनलाइन मेसेज महावितरणकडून पाठविण्यात आला. electricity department negligence case

    सायकलच्या चाकात विजेचा तार अडकला


    यादरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. live wire accident due to storm

    नागरिकांचे आंदोलन

    देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

    महावितरणच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जनविकास सेनेची मागणी


    नागपूर व दाताळा मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याने हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर दीड तास 11 केवी विजेची जिवंत तार पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.

  • वाघाच्या मृत्यूसंदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांनी घेतली महत्वाची बैठक

    News34 chandrapur

    नागपूर /चंद्रपूर – विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिव, वने व राज्यातील वरिष्ठ वनाधिका-यांना नागपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत निर्देश दिले.

     

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शिकारीचे प्रमाण शुन्यावर आले असले तरी विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात जनजागृती, कायदेशीर तरतूदी, प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे व असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी नियोजनपुर्वक प्रयत्न करावे असेही निर्देश यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

    गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली येथील वाघाच्या मृत्यू संदर्भात वनमंत्र्यांनी तपास करुन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार वन विभागाने जलद गतीने तपासाची सूत्रे हलवून सर्व आरोपींस अटक करण्यात आली असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी सांगितले.

     

    यावेळी वनमंत्री यांनी वन विकास महामंडळाच्या विविध कामांचा आढावा घेऊन ही कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

    या बैठकीस प्रधान सचिव (वने) श्री. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. महिप गुप्ता, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास गुप्ता, वनसंरक्षक गडचिरोली श्री. रमेश कुमार इ. अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.