Tag: विजय वडेट्टीवार

  • tendu leaves season danger । 8 दिवसांत 8 मृत्यू… चंद्रपूरच्या जंगलात तेंदूपत्ता म्हणजे मृत्यूची टांगती तलवार!

    tendu leaves season danger

    tendu leaves season danger : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली असून आतापर्यंत मानव वन्यजीव संघर्षात २१ नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक जंगलाकडे कूच करू लागले मात्र वाघाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला आहे. मे महिन्यात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याने ग्रामीण भागात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. tiger attack in chandrapur today

    देशी कट्टा व जिवंत काडतूस सहित २४ वर्षीय युवकाला अटक

    १८ मे रोजी जिल्ह्यातील नागभीड व मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत नागभीड तालुक्यातील ६३ वर्षीय मारुती नक्तू शेंडे हे पत्नीसोबत तळोधी रेंजमधील आलेवाही बीटमधील वनक्षेत्रात कंम्पार्टमेन्ट क्रमांक ६५७ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मारुतीवर हल्ला चढविला अचानक झालेल्या या हल्ल्यात मारुती यांच्या पत्नीने गाव गाठत नागरिकांना माहिती दिली, नागरिक घटनास्थळी दाखल झाले असता मारुतीच्या डोक्यावर वाघाने गंभीर घाव केले होते. गावकर्यांनी तात्काळ मारुतीला सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान मारुतीचा मृत्यू झाला. tiger attack in chandrapur today

    Powered by myUpchar

    दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील ७० वर्षीय ऋषी झुंगाजी पेंदोर हे जंगलात बकऱ्यासाठी चारा आणायला शनिवारी १७ मे रोजी जंगलात गेले होते, रात्र झाल्यावर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली, १८ मे रोजी वनविभागाने जंगलात पेंदोर यांचा शोध घेतला असता वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक १००८ मध्ये ऋषी पेंदोर यांच्या शरीराचे अवयव आढळून आले, संपूर्ण शरीर वाघाने खाल्ल्याने डोक्याचा भाग व हात शिल्लक होता. ऋषी हा मानसिक रोगी असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी १२ मे रोजी भांदुर्णी मध्ये भूमिका दीपक भेंडारे या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केले होते. tiger conflict in rural india

    ५ दिवसात ६ महिलांचा मृत्यू

    १० मे रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय कांताजी बुधाजी चौधरी, ३० वर्षीय शुभांगी मनोज चौधरी व ५० वर्षीय रेखा शालिक शेंडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ११ मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावात ६५ वर्षीय विमल बुधाजी शेंडे, १२ मे रोजी मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील भूमेश्वरी दीपक भेंडारे, १४ मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात ५४ वर्षीय कचराबाई अरुण भरडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सदर सर्व महिला तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. villager killed by tiger in forest

    वाघ तुमच्यामुळे वाढले तर बंदोबस्त करा – आमदार विजय वडेट्टीवार

    चंद्रपूर जिल्ह्यात ८ दिवसात ८ नागरिकांना वाघाने हल्ला करीत ठार केले, मात्र वनविभाग यावर अजूनही उपाययोजना करताना दिसत नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री यांनी यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना त्यांनी वारंवार वाघांची संख्या वाढल्याने आमच्यामुळे वाघ वाढले असा गवगवा केला मात्र आज वाघामुळे नागरिक दहशतीमध्ये आहे तर त्यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, वाघांना अधिवास कमी पडत आहे, ताडोबा बफर व कोर झोन मध्ये वाघांची संख्या वाढल्याने उर्वरित वाघांचा वनविभागाने बंदोबस्त करायला हवा. जर वनविभागाने वाघांचा बंदोबस्त केला नाहीतर आता वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांचे मृतदेह वनविभागाच्या कार्यालयापुढे ठेवणार, जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही हा आमचा वनविभागाला इशारा आहे. tiger attack in chandrapur today

    वनविभागाने केले आवाहन

    जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 75 तेंदूपत्ता घटकांपैकी 70 घटकांमध्ये संकलनाचे कार्य सुरू आहे. या कार्यातून दरवर्षी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो.

    जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन दरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

    दूपत्ता हंगाम – 2025 दरम्यान मे महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये ८ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे वनविभागाकडून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या ग्रामस्थांना खालील सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. tiger attack in chandrapur today

    • 1. वाघाच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा.
    • 2. संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी.
    • 3. सकाळी 8 वाजता पूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी 5 वाजता पूर्वीच जंगलातून बाहेर पडावे.
    • 4. एकट्याने जंगलात जाऊ नये. समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे.
    • 5. प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे.
    • 6. संकलन दरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात घालावा.
    • 7. वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी.

    वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे..

  • Vijay Wadettiwar on drowning tragedy । सुट्टीचा दिवस ठरला मृत्यूदिवस!, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – आमदार वडेट्टीवार

    Vijay Wadettiwar on drowning tragedy

    Vijay Wadettiwar on drowning tragedy : शनिवार दिवशी सुट्टी असल्याने वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथील सहा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सावली तालुक्यातील व्याहाळ (बूज) नजीकच्या वैनगंगा नदी पात्रावर सुट्टीचा आनंद घेण्याचा बेत आखला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नदी काठावर व्हॉलीबॉल खेळत असताना अचानक बॉल नदीत गेल्याने व तेथे खोल डोह असल्याने व्हॉलीबॉल काढण्याच्या नादात गोपाल गणेश साखरे वय (२०) वर्षे रा. चिखली जिल्हा बुलढाणा पार्थ बाळासाहेब जाधव  (२०) वर्षे राहणार शिर्डी जिल्हा अहिल्यानगर स्वप्निल उद्धवराव शिरे वय (२०) वर्षे राहणार छत्रपती संभाजी नगर हे तिघेही बुडाले. Gadchiroli river drowning incident

    त्या नरभक्षकी वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा – आमदार वडेट्टीवार

    याची माहिती मिळतात बचाव पथके यांनी शोधाशोध केली मात्र अंधार झाल्याने बचाव कार्य थांबले. आज पुन्हा बचाव पथकाने शोधमोहीम राबवली असता बुडालेल्या तीनही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. 

    तत्पूर्वी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील तेंदु पत्ता संकलनासाठी गेलेल्या तीन महिलांना वाघाने हल्ला चढवून ठार मारल्याची घटना काल  १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळतात आज राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता, विधिमंडळ पक्षनेते, लोकलेखा समिती अध्यक्ष तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत मृतक महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. Maharashtra medical students accident news

    तर लगेच व्याहाड (बूज)येथील वैनगंगा नदी पात्रात त बुडालेल्या तीनही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षणचाही विलंब न लावता  तात्काळ सावली येथील ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृत प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे गरीब घरचे हुशार व होतकरू विद्यार्थी होते.

    मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

    त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना सहानभूती पर आधार मिळावा याकरिता थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असे ही यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. याप्रसंगी नगराध्यक्ष लता लाकडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे ,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,नगरसेवक प्रितम गेडाम,नगरसेवक अंतबोध बोरकर,सामाजिक कार्यकर्ते गब्बर दुधे,कमलेश गेडाम पत्रकार उदय गडकरी, सूरज बोम्मवार आदी उपस्थित होते.

  • Vijay Wadettiwar on tiger attack victims । त्या नरभक्षक वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा – विजय वडेट्टीवार

    Vijay Wadettiwar on tiger attack victims

    Vijay Wadettiwar on tiger attack victims : सिंदेवाही – तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलेवर वाघीणीने प्राण घातक हल्ला चढविला व यात तीनही महिलांचा दुर्दैवी अंत झाला. सदर घटना काल दुपारी १२.३०  वाजताच्या सुमारास सिंदेवाही  वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपवनक्षेत्र डोंगरगाव मधील चारगाव कक्ष क्रमांक 252 येथे घडली. मृतकांमध्ये कांता बुधाजी चौधरी (65) शुभांगी मनोज चौधरी (28 ) रेखा शालिक शेंडे (50) यांचा समावेश असून तीनही मृतक महिला या सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील रहिवासी आहेत. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेंढा माल गावात शोककळा पसरली. tiger kills 3 women in forest

    रामबाग वाचलं, आमदार जोरगेवार यांची आक्रमक भूमिका

    सदर घटनेची माहिती मिळतात क्षेत्र दौरावर असलेले विधिमंडळ पक्षनेते तथा लोक लखा समिती अध्यक्ष व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज वाघल्यात मृत पावलेल्या तीनही महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन केले. tragic tiger attack on tendu workers

    tiger kills 3 woman in forest

    अंत्यसंस्कार आटोकताच उपस्थित वनविभागाची उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक राठोड तसेच उपस्थित गावकरी व वन विभाग कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा तसेच घडलेल्या घटनेचा गांभीर्याने विचार करून वृत्तकांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत रुजू करून घ्या. व मृताच्या कुटुंबीयांना विभागाकडून देय असलेला मोबदला तात्काळ देण्याची निर्देश यावेळी विधिमंडळ पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी  दिले.

    सोबतच अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये याकरिता विशेष उपाययोजना करण्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित वनअधिकाऱ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार , सिंदेवाही नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मेंडामाल कांग्रेस कमिटी शाखाध्यक्ष वामनराव कोकोडे, गुरुदासजी बोरकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार, नथूजी सोनुले प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Smart prepaid meter | स्मार्ट प्रीपेड मीटर वरून आमदार वडेट्टीवार आक्रमक

    Smart prepaid meter

    Smart prepaid meter : निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने ,फसव्या योजना व भूलथापांची वचने देऊन महायुती सरकार सत्तेवर आली. सत्ता प्राप्त होताच सरकारने व्यवसायदारांचे हित जोपासण्यासाठी राज्यातील वीज वापर करणाऱ्या जनतेच्या मानगुटीवर आर्थिक भुर्दंड लादणारे व दीड पट अधिक गतीने चालणारे स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने लावणे सुरू केले असून जनतेने सरकारच्या या अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करीत असून प्रीपेड स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करा.

    चंद्रपूर मनपाचा पूजा कॅटरर्स ला दणका

    अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. असा सज्जड इशारा राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

    ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने केवळ सत्ता प्राप्तीसाठी प्रलोभने देऊन जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजवर केले आहे. देशासह राज्यात महागाई, बेरोजगारी यामुळें सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच विवीध जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून सर्व सामान्यांना जिवन जगणे अवघड झाले आहे. अशातच गेल्या वर्षभरापूर्वी विज वितरण कंपनी कडून विज ग्राहकांचे विद्युत मीटर बदलाविण्यात आले होते. मात्र वर्ष लोटताच आता सरकारने स्मार्ट मीटर च्या नावाखाली वेठीस धरण्याचा सपाटा सुरू केला आहे.

    सिडीसीसी बँकेत नोकरी हवी, तर मोजावे लागेल 25 ते 40 लाख

    या संदर्भात विरोधी बाकावरून स्मार्ट मीटर ला कडाडून विरोध करीत आम्ही जनहिता करिता आवाज उचलला असताना मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यावरून आता तुमच्या केले असून जनतेला दिलेले स्मार्ट फिटर न लावण्याचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. तर स्मार्ट मीटर हे दीड पट अधिक गतीने चालणारे मीटर असुन हे प्रीपेड असल्याने यात अगोदर रिचार्ज कारणे अनिवार्य आहे.

    मोबाईल प्रमाणेच रिचार्ज संपला की विज पुरवठा आपोआप बंद होईल. म्हणजेच जनतेला रात्रौ बेरात्री लहान मूल,अभ्यासक मुले तसेच इतर सर्व कार्यासाठी चक्क अंधारात रात्र काढावी लागणार आहे.

     देशांतील व राज्यातील महायुती सरकार हे गोरगरिबांसाठी नसून केवळ व्यापारी हीत जोपासणारे सरकार असुन स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) योजने अंतर्गत जनतेची अर्थिक लूट करु पहाणाऱ्या या लुटारू सरकारच्या अन्यायकारक धोरणाला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रखरपणे विरोध करणे गरजेचे असुन जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर आहे.

    आपण सर्व विज ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शवावा. तसेच विज वितरण कंपनी कडून कुठल्याही ग्राहकाकडे  बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न होत असल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखिल काँग्रेस नेते, राज्याचे माजी विरोधी विरोधी पक्षनेते,तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

  • Brahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    Brahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    Brahmapuri Assembly Constituency ब्रम्हपुरी मतदारसंघात केलेल्या “विकासक्रांतीमुळे’ वडेट्टीवारांचे पारडे जड

    Brahmapuri Assembly Constituency २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे नुकतेच बिगुल वाजले. सर्व राजकीय पक्ष होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागून उमेदवार चाचपणीत व्यस्त झाले आहे. अशातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात राज्याचे विरोधी पक्षनेते,काँग्रेस पक्षनेते तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास क्रांतीमुळे त्यांचे पारडे जड असुन भाजप व अन्य पक्षाला या विधानसभा क्षेत्र निवडणूकीत तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली आहे.

    महत्त्वाचे : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले हे महत्वाचे आवाहन

    राज्याच्या राजकारणात राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून विजय वडेट्टीवार हे नाव कानाकोपऱ्यात पोहचले आहे. वनविकास महामंडळ अध्यक्ष ते राज्याचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारतांना अनेक कठीण परिश्रम घेणाऱ्या वडेट्टीवारांनी जनतेच्या मूलभूत गरजा, क्षेत्राच्या अडचणी, क्षेत्रात सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, व सामजिक गरजा लक्षात घेत सर्व धर्म, सर्व समाज यांना न्याय देऊन मतदारांची मने जिंकली. (Brahmapuri Assembly Constituency)

    चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यांतील करंजी हि त्यांची जन्म भूमी असली तरी वडिलांचे छत्र हरपल्या नंतर गडचिरोली येथे त्यांच्या कुटुंबाचे स्थानांतर झाले. अगदी कमी वयात लोकसेवा करण्यासाठी दुर्गम गडचिरोली जिल्हा पिंजून काढून अनेक प्रश्नांना घेऊन त्यांनीं आंदोलने केली. व जनतेसाठी तुरुंगवास देखील भोगला. यानंतर त्यांनीं चिमूर विधानसभेवर विजय मिळवला. तर मागील दहा वर्षापासून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करीत आहे. (Brahmapuri Assembly Constituency)

    झुडपात खेळ सुरू, 7 जणांना अटक


    राजकारणा पुरते राजकरण मात्र उर्वरित वेळेत क्षेत्राचा सर्वांगिण विकास , जनतेच्या मूलभूत समस्या, आरोग्याच्या समस्या, शुद्ध पेयजल, उच्च प्रतीचे प्रवास मार्ग, सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांच्या हाती काम, आरोग्य शिबिरे,शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाचनालये, क्रीडा पट्टू साठी क्रीडा मैदाने व ईतर गरजा पूर्ण करीत क्षेत्राचा विकास साधण्यात त्यांनीं कुठलीही कसर सोडली नाही.

    २०१४ च्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना व खुद्द मोदी हे ब्रम्हपुरी येथे प्रचार सभेसाठी आले असतांनाही जनतेनी पुर्ण ताकदीनिशी वडेट्टीवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजयश्रीची माळ त्यांच्याच गळ्यात घातली. आज घडीला काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कुठला उमेदवार द्यावा असा पेच विरोधकांपुढे उभा ठाकला आहे.

    गेल्या १० वर्षात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातून मुबलक पाणी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिले. यामुळें ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली, ब्रम्हपुरी, व सिंदेवाही या तीनही तालुक्यांतील ८० टक्के शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊन समृद्ध शेती कडे वाटचाल सुरू आहे. या सर्व विकासात्मक दूर दृष्टिकोना मुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांचेच पारडे जड असुन विरोधी पक्षांच्या उमेदवारांना येथे आगामी निवडणुकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हे तेवढेच सत्य…!

  • Political criticism : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे – विजय वडेट्टीवार यांची टीका

    Political criticism : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे – विजय वडेट्टीवार यांची टीका

    Political criticism उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान माजविले आहे, त्यांच्या क्षेत्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली असून महायुतीने राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात टाकलेलं आहे असे चित्र आपल्यापुढे तयार झाले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली, चंद्रपुरात कांग्रेसच्या आढावा बैठकीपूर्वी वडेट्टीवार प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 100 कोटीचं भगदाड

    Political criticism वडेट्टीवार पुढे म्हणाले की नागपूर जिल्हा गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, मात्र गृहमंत्री फडणवीस यावर दुर्लक्ष करीत आहे, गृहमंत्री फडणवीस राज्यभर दौरे करीत असताना नागपूर जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यँत 6 हजार 883 गुन्ह्यांची नोंद झाली, त्यामध्ये खून 165, बलात्कार 268, महिलांवर अत्याचाराचे प्रकरण 300 च्या पुढे आहे, कायदा व सुव्यवस्था यावर गृहमंत्री दुर्लक्ष करीत आहे, ही सर्व आकडेवारी माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे.

    जोरदार टीका

    गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे उडत आहे, तर राज्यात काय अवस्था आहे, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय? राज्यात दररोज 5 महिला शोषणाच्या बळी पडत आहे, 15 लोकांची रोज हत्या होत आहे, हे महाराष्ट्र राज्याचं विदारक चित्र आहे. महायुती सरकारने कायदा व सुव्यवस्थेला पूर्णतः उध्वस्त केले असून राज्याला खड्ड्यात टाकलं आहे.

  • Join Congress : हजारो युवकांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

    Join Congress : हजारो युवकांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

    join congress सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला असुन सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सोबतच युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे युवकांचा कल आता काॅंग्रेसकडे वाढलेला दिसून येत आहे.

    Join congress महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकाळात सुरु असलेला ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील विकास बघता मोठ्या प्रमाणात ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील नागरिक सुखावले असुन काॅंग्रेस पक्षाला समर्थन देत आहेत. ब्रम्हपूरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभागांच्या सर्व सोयीसुविधा युक्त नवीन इमारती उभ्या झाल्या आहेत. तर अनेक विकासकामे निर्माणाधीन आहेत. या सर्व विकास कामांमुळे प्रभावित होऊन व विधानसभा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा काॅंग्रेसचे सचिव तथा माजी न.प.सभापती विलास विखार व जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध गावांतील हजारो युवकांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

    अवश्य वाचा : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    ब्रम्हपूरी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध पक्षातील हजारो युवकांनी पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये हळदा, मुडझा, चिचगाव, जुगनाळा, चिटकबोदरा, रुई, पाचगाव, वायगाव, पारडगाव, बोडधा या गावांचा व शहरातील विविध प्रभागातील युवकांचा समावेश आहे.

    गुन्हेगारी – हाजी हत्याकांड आणि राजकीय कनेक्शन

    यावेळी युवा व्याख्याते बेधुंदकार गोविंद पोलाड, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेसचे सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सुमीत उनाडकर, युवा नेते निनाद गडे यांसह अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले. तर आभारप्रदर्शन जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे यांनी केले.

    विविध पदांवर नियुक्ती

    यावेळी पक्षसंघटना मजबुत करणाऱ्यासाठी कार्य युवकांना युवकांची विविध पदांवर नियुक्ती करून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी शुभम कावळे व एन.एस.यु.आयच्या शहराध्यक्ष पदी हिमांशू नंदुरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
    सोबतच यावेळी सुप्रसिद्ध युवा व्याख्याते बेधुंदकार गोविंद पोलाड यांचा प्रबोधन कार्यक्रम देखील पार पडला.

  • Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष,श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय युवा नेते खासदार राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार व काँग्रेसचे पॉवर फुल नेते विधान सभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वात व जिल्ह्यातील कांग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व जिल्हा महासचिव राकेश रत्नावार, माजी सभापती, संचालक तथा जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, ग्रामीण नेते राजू पाटील मारकवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा किसान सेल अध्यक्ष दीपक पा. वाढई, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, महासचिव दशरथ वाकुडकर, बंडू गुरनुले, सुमित आरेकर, यांचे सह अनेक ग्रामीण कांग्रेस पदाधिकारी यांचे उपस्थितीत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांची निवड त्या -त्या विभागाकडून करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. Congress party

     

    महाराष्ट्र ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी कांतपेठ येथील राजेंद्र वाढई यांची नियुक्ती झाल्याने नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच मुल तालुका अनुसूचित जाती(एस.सी.) विभाग तालुका अध्यक्ष पदी चिखली येथील संजय गेडाम, अनुसूचित जमाती. (एस टी.)सेल तालुका अध्यक्षपदी दहेगाव येथील काँग्रेसच सक्रिय किशोर पेंदाम यांची नियुक्ती तर आदिवासी विभाग मुल शहर अध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावान, होतकरू संगीत विशारद नेतृत्व असलेले अशोक येरमे, विमुक्त जाती भटकी जमाटी विभाग (एन. टी.) सेल तालुका अध्यक्षपदी गणेश गेडाम मुल यांची निवड झाली. तर मुल तालुका महिला कांग्रेस पदाधिकाऱ्यांनाही ना.वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. Vijay wadettiwar

     

    यात ग्रामीण मुल तालुका आदिवासी सेल विभाग तालुका अध्यक्षपदी मरेगाव सरपंच सौ. जोत्सना पेंदोर, मुल शहर महिला कांग्रेस अध्यक्षपदी संयमी निगर्वी संघटन नतृत्वगुन संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व सौ. नलिनी आडपवार , मुल शहर उपाध्यक्षपदी माजी नगर सेविका सौ.लीना फुलझेले, मुल शहर महिला सचिव पदी, कांग्रेस निष्ठावान धडाडीच्या पुढाकार घेणाऱ्या वक्तृत्व गुण असलेल्या सौ. शामला बेलसरे यांनी निवड झाली.

     

    तर शहर महिला कोषाध्यक्ष पदी नियमित सक्रिय कार्यरत असलेल्या सौ.राधिका बुक्कावार, शहर उपाध्यक्षपदी धडाडीच्या सौ.समता बनसोड, यांची निवड, तर मुल शहर सचिव पदी सौ. अल्का कामडे, सहसचिव सौ. फर्जना शेख, इत्यादींची निवड करण्यात आली असून महिला तालुका व शहर महासचिव पदावर काही होतकरू सक्रिय नियमित येणाऱ्या महिलांची नियुक्ती तातडीने करण्यात येणार आहे. यांच्या नियुक्तीचे वर्तमान काळात काँग्रेस मोठ्या प्रमाणात व संख्येने उभी करावी व कांग्रेस संघटन मजबूत करावे. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे सर्वांनी पार पाडवी अशी अपेक्षा व्यक्त केले असून उपस्थित सर्व कांग्रेस नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

  • संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

    संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी तुम्हा आम्हाला गुलाम बनवून आपल्यावर राज्य केल होत. मात्र आता देशात आता एका विशिष्ट विचारधारेचे गुलाम बनविण्याचे काम सुरू असुन हे प्रचंड विघातक आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना संविधानाने बहाल केला आहे. एकंदरीत आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या संविधानाचा कवच तोडण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. पण आपल्याला तो प्रयत्न हाणुन पाडायचा आहे. कारण संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले.

     

    चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित श्रीमंत देवाजीबापु खोब्रागडे यांच्या 125व्या जयंती निमित्त आयोजित प्रबोधन सभा कार्यक्रमात ते बोलत होते.
    यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन नेते अशोक निमगडे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील आंबेडकरी विचारवंत रंजित मेश्राम व भिमराव वैद्य हे हे होते.
    प्रमुख अतिथी म्हणून प्रविण खोब्रागडे, अॅड. राम मेश्राम, रोहीदास राऊत, मारोतराव खोब्रागडे, नंदु खणके, दौपदा डोर्लीकर यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
    पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवाजीबापु खोब्रागडे हे चंद्रपूरातील एक धनाढ्य व्यक्तिमत्त्व होते. पण त्यासोबत त्यांच्या सामाजिक बांधिलकीची श्रीमंती मोठी होती. म्हणूनच त्यांना चंद्रपुरचे पहीले आमदार, बल्लारपूरचे पहीले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान प्राप्त झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याच्या प्रारंभापासून त्यांच्या महापरिनिर्वाण पर्यंत ते निष्ठेने सोबत राहिले.
    त्यांनी आपला मुलगा राजाभाऊ खोब्रागडे यांना बॅरिस्टर बनवून बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आदेशित केले. एकंदरीत खोब्रागडे पितापुत्रांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपुरात 16 आॅक्टोंबर 1956 रोजी धम्मदीक्षा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवाजीबापु खोब्रागडे हे होते. त्यावरून त्यांची महानता अधोरेखित होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  • ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत केले आहे.

     

    महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10, 11 व 12 डिसेंबर 2023 रोजी 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 2 री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतुन जवळपास 600 महिला कुस्तीगीर या स्पर्धेसाठी येणार असुन भव्यदिव्य स्वरुपात ह्या स्पर्धेचे आयोजन ब्रम्हपूरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगणात करण्यात येणार आहे.
    सदर स्पर्धेचे प्रायोजक राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे असणार आहेत.
    स्पर्धेचे उद्घाटन 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सायंकाळी 6 वाजता होणार असून सदर महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूर चे आमदार अभिजीतजी वंजारी, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकरजी अडबाले , शहरातून निघणाऱ्या प्रमुख रॅलीचे आकर्षण सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणारे शिवराजजी राक्षे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार, नगराध्यक्ष रीताताई उराडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोकजी रामटेके, डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. देवेशजी कांबळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाशजी फुंड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
    @कार्यक्रमावली
    10 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली, सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 6 वाजता उद्घाटन समारंभ होईल.
    11 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पासून कुस्तीला सुरुवात
    12 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.