Tag: विक्रांत सहारे जिल्हाप्रमुख युवासेना

  • minor assault company case । खंडणीचा खोटा गुन्हा? युवासेनेच्या सहारे यांनी उघड केली कंपनीची लबाडी!

    minor assault company case

    अल्पवयीन मुलाला कामावर घेऊन मारहाण; कंपनीचा घाणेरडा चेहरा उघड!

    minor assault company case : अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्याप्रकरणात कावेरी सी ५ जेव्ही या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर अल्पवयीन मुलाचे प्रकरण उचलल्याने याच कंपनीने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जिल्हा बाल संरक्षण समितीच्या आदेशानंतर प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हे दाखल झाल्याने सहारे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. Shiv Sena youth leader news

    गडचांदुरातील सट्टापट्टी वर पोलिसांची कारवाई, news३४ चा दणका

    डिसेम्बर २०२४ मध्ये अल्पवयीन मुलाला रोजगार देतो म्हणून तत्कालीन एचआर गिरी सिद्धापल्ली याने २० हजार रुपये घेत अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर ठेवले. कावेरी कंपनी वेकोलीमध्ये माती उत्खनन करण्याचे काम करते. काही दिवसांनी प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी हे सुट्टीवरून परतल्यावर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला कार्यालयात बोलावून घेतले व त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हि बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी त्या मुलाला दिली. minor abuse case in company

    अल्पवयीन मुलाला रेड्डी यांनी कामावरून कमी केली मात्र त्याला कामाचा मोबदला दिला नाही, याबाबत अल्पवयीन मुलाने जिल्हा बाल संरक्षण समितीकडे दाद मागितली होती. याबाबत मुलगा व त्याच्या आईचे बयान नोंदविण्यात आले, संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यावर जिल्हा बाल संरक्षण समितीने कावेरी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला. district child protection committee action

    ३ मे ला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकासे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुर्गापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१ (२), ३ (५), अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ कलम ७५, ७९, बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन कायदा १९८६ कलम ३ (A), १४ अंतर्गत एचआर हेड गिरी सिद्धापल्ली व कावेरी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. Juvenile Justice Act

    नेमकं प्रकरण काय?

    अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर रुजू केले, त्यानंतर त्याला व्यवस्थापक रेड्डी यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, पीडित मुलाच्या आईने न्यायासाठी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांचे दार ठोठावले, सहारे यांनी आई व मुलाला सोबत घेत कंपनी व्यवस्थापक रेड्डी यांना जाब विचारला असता तुम्हाला जे करायचं आहे ते करा असे सुनावले, सहारे यांनी कामगार आयुक्त व बाल संरक्षण समितीकडे तक्रार दाखल केली.

    तक्रार का दाखल केली म्हणून रेड्डी यांनी सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला, मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्याने खंडणीचा कसलाही प्रकार घडला नसल्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केल्याने रेड्डी यांची गोची झाली. यानंतर सहारे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत अल्पवयीन मुलाला न्याय देण्यासंदर्भात प्रयत्न केले, अखेर ३ मे रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर गुन्हे दाखल झाले. minor abuse case in company

    माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न – विक्रांत सहारे

    अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणात रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हा सत्याचा विजय आहे, आम्ही प्रकरण उचलले म्हणून माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला मात्र आम्ही मागे हटलो नाही, सतत पाठपुराव्याचे फलित उशिरा का होईना अखेर मिळाले, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा हा एक प्रयत्न होता, पण प्रयत्न फसला, याबाबत आता न्यायालयही लढाई आम्ही लढणार असून अल्पवयीन मुलाला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

  • Chandrapur Yuvasena : चंद्रपुरातील युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

    Chandrapur Yuvasena : चंद्रपुरातील युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

    Chandrapur yuvasena चंद्रपूर – राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची परिस्थिती बघता युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढत आहे. 

    त्या दलालांविरुद्ध अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार

    Chandrapur yuvasena चंद्रपुरातील वडगाव येथील अनेक युवकांनी रविवारी शिवसेना प्रणित युवासेनेत प्रवेश केला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम शिवसेना कार्यालयात पार पडला.

    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे उपशहर प्रमुख स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वात वडगाव येथील युवकांनी जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला, यावेळी सहारे यांनी उपस्थित युवकांच्या गळ्यात दुपट्टा टाकत स्वागत केले.

    यावेळी राहुल वाढई, मयूर येरगुडे, प्रतीक कोकांडे, शिवम बलकी, श्रेयश देवाळकर, मोहम्मद शेख, आकाश बलकी, महेश देरकर, सौरभ भोयर, अंकित वैद्य, गिरीश रामटेके, आर्यन निमकर, सूरज बलकी, प्रतीक बोरीकर, रोहित मडावी व शुभम बलकी यांनी प्रवेश केला.

    आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात युवासेना शहर प्रमुख शाहबाज शेख, गणेश ठाकूर, शाहरुख शेख, चेतन भाऊ व अनिकेत चंदनखेडे यांची उपस्थिती होती.

    चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळे राजकीय पक्ष आहे, मात्र त्या पक्षांना सोडून युवक युवासेनेत प्रवेश करीत आहे, राजकारणात युवकांनी मोठ्या संख्येत सहभाग घ्यायला पाहिजे त्यानंतर प्रस्थापित नेत्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल. संदीप गिर्हे यांनी शिवसेना पक्षात जीव ओतून काम करीत एक चांगल संगठना उभी केली, त्यांनतर युवासेना मध्ये विक्रांत सहारे हे दिवसेंदिवस पक्षात नवनव्या युवकांचा पक्ष प्रवेश घेत आहे, त्यामुळे पक्षाची ताकद नक्कीच वाढणार.

  • चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांनी केला पक्षप्रवेश

    चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांनी केला पक्षप्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना प्रणित युवासेना मध्ये युवकांची ओढ निर्माण झाल्याने विविध पक्षातील युवक आज युवासेनेत प्रवेश करीत आहे.

     

    12 जानेवारीला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पायली गावातील असंख्य युवकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला.

    चंद्रपूर शहरात युवासेनेने हजारो युवकांना पक्षात सामील केल्यावर आता ग्रामीण भागातील संघटनात्मक बांधणी जिल्हाप्रमुख सहारे यांच्या मार्गदर्शनात जोमात सुरू आहे.

     

    आज झालेल्या पक्षप्रवेशात बल्लारपूर युवासेना उपतालुका प्रमुख पदावर विवान रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली.

     

    यावेळी रामटेके यांच्यासहित अंकित कातकर, करन साव, रितीक रायपुरे, मयूर मडावी, विजय मेसरे, अश्विन रामटेके, पवन कातकर, विशाल कातकर, मंगेश रायपुरे, विनीत कातकर, अर्जुन रामटेके, अंशु रायपुरे, अनुष रामटेके, अभय गायकवाड, राहुल विश्वकर्मा, बादल मडावी, पन्नू पेंदोर, आझाद आसुटकर, शुध्दोधन आसुटकर, आदित्य रत्नपारखी, सुजल साव, सागर रायपुरे, शुभम गेडाम, अमन गेडाम, अनुराज मडावी, राहुल राहुलगडे, मुवेश साव, पियुष उराडे, राहुल चौबे, करन रामटेके, मनीष भगवा, आशिष गेडाम यांनी प्रवेश घेतला.

     

    पक्ष प्रवेश कार्यक्रम वेळी माजी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विकास विरुटकर, वसीम शेख, सिक्कीभाई खान, युवासेना शहर प्रमुख शाहबाज खान, ज्ञानेश्वर लोनगाडगे, उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार, उपसरपंच सिनाला सूरज शेंडे व प्रज्वल आवळे यांची उपस्थिती होती.