Tag: वाहतूक व्यवस्था

  • Chandrapur Transport System : चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    Chandrapur Transport System : चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    Chandrapur Transport System चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅलीमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यादरम्यान रहदारीला कोणताही अडथळा तसेच जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

    Chandrapur transport system या बदलानुसार कोहिनूर ग्राउंड – दस्तगीर चौक- गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक -जटपुरा गेट- कस्तुरबा रोडने कोहिनूर ग्राउंड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच हा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

    नागपूरकडून शहरांमध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज पठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर -संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कूल -सवारी बंगला चौक नगिनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.

    शेतकऱ्यांना वीज मोफत

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वणी, घुग्गुस , गडचांदूर कडे जाणाऱ्या प्रवाशांनी रहमतनगर, नगीना बाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा तसेच बल्लारशा व मूल कडून येणारी वाहनांना शहरांमध्ये जावयाचे असल्यास बस स्टॅन्ड, एलआयसी ऑफिस, बगड खिडकी मार्गे किंवा जूनोना चौकातून शहरांमध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.

    जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतूक व्यवस्थेचे सर्व नागरिकांनी पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.


  • Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जगविख्यात ताडोबा अभयारण्यातील वाघ तर आपण बघितले असणारचं आता या वाघाची विविधता बघण्यासाठी वनविभागाने 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. Tadoba festivals

     

    1 मार्च ते 3 मार्च दरम्यान शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आयोजित महोत्सवाचे उदघाटन सिने अभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सव दरम्यान वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. Tadoba sanctuary

     

    आयोजित महोत्सव कार्यक्रम दरम्यान चांदा क्लब मैदान परिसरात नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. Chandrapur district

     

    1 ते 3 मार्च दरम्यान दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरोरा नाका चौक ते मित्रनगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा ताडोबा महोत्सव करीता येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांसाठी बंद राहील. वरील दोन्ही मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. Wildlife enthusiast

     

    नागरिकांनी पोलीस प्रशासनाने सूचित केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. नागपूर कडून शहराकडे जाणारे वाहन वरोरा नाका उड्डाण पूल ते सिद्धार्थ हॉटेल, बस स्टॅण्ड, प्रियदर्शिनी चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान ते मित्र नगर चौक, संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश केल्या जातील. शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपूरा गेट ते प्रियदर्शिनी चौक ते बस स्टॅण्ड ते सिद्धार्थ हॉटेल मार्गे उड्डाण पूल वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक मित्र नगर चौक ते जिल्हा स्टेडियम मार्गे जिल्हाधिकारी निवासस्थान हुन बाहेर जातील.  Chandrapur vehicle parking

     

    ताडोबा महोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने वाहनतळ नियोजित केले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चांदा क्लब मैदान समोरील न्यू इंग्लिश/दरगाह मैदान, चर्च मैदान, कृषी भवन जवळील ट्रॅव्हल स्टॅण्ड जवळ नागरिकांनी आपले वाहन पार्क करावे. नागरिकांनी सदर आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

  • चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपुर शहरात 23 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिरापासुन नवरात्रोत्सवानिमित्त रॅली निघणार आहे. सदर रॅली माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली पर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.

     

    त्याअनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951 च्या कलम-33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी सदर रॅलीकरीता असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास व गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणेबाबतची अधिसुचना पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमीत केली आहे.

     

    दि. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक-जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली मंदिर पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. तसेच हा मार्ग “नो पार्कंग झोन आणि नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे.

     

    या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा :

    बल्लारपूरकडून येणाऱ्या तसेच बाबुपेठ, बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गाचा वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चारचाकी वाहनांने बाहेर जाण्यासाठी किंवा परत येण्यासाठी लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट-बिनबागेट या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर ईतरत्र जाण्यासाठी कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा. नागपूर व मुलकडून शहरामधील पंचशिल चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपुरा परिसर वार्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरीकांनी (जड वाहने वगळून) वरोरा नाका-संत केवलराम चौक-विदर्भ हाउसिंग चौक -रहेमतनगर – बिनबा गेट मार्गाचा वापर करावा. तसेच नागपूर व मुलकडून शहरामधील रामाळा तलाव, बगड खिडकी, गंजवार्ड, भनापेठवार्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरीकांनी (जड वाहने वगळुन) सावरकर चौक-बस स्टॅन्ड चौक-आर.टी.ओ. ऑफिस- रयतवारी कॉलरी या मार्गाचा वापर करावा.

     

    यात्रेकरीता बाहेरून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था : (नियोजीत वाहनतळ)

    डी.एड. कॉलेज बाबुपेठ, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज, श्री. बागला यांची खाजगी जागा (बागला चौकीजवळ), बैल बाजार (माता महाकाली मंदिरासमोर), श्री. चहारे यांची जागा (चहारे पेट्रोलपंपच्या मागे), श्री. कोठारी यांची खाजगी जागा (महाकाली मंदिरासमोर), श्री. पटेल यांची खाजगी जागा (महाकाली मंदिरासमोर) आणि कोहीनुर तलाव ग्राउंड (अंचलेश्वर गेटजवळ) ही नियोजित वाहन स्थळे असून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरीकांनी निर्देशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

  • चंद्रपुरातील रस्त्यावर वाहन धारकांची दादागिरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या चिंतेची बाब बनली आहे, शहरातील मुख्य मार्गावर नागरिक कमी आणि वाहने जास्त फिरत असल्याचे चित्र नजरेत पडत आहे.

     

    चंद्रपूर शहरात वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णतः कोलमडली आहे, मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला वाहनांची गर्दी आपल्या नजरेत रोज पडते, मात्र हे मानवाद्वारे केलेले अतिक्रमण वाहतूक विभागाला दिसत नाही काय?

     

    अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट दरम्यान हजारो वाहने दररोज ये-जा करतात, सकाळी 11 व सायंकाळी 5 वाजेदरम्यान मुख्य मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, वाहनांना गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्या जाते.

     

    वाढत्या अनियंत्रित वाहतुकीवर सध्या शासन प्रशासनातील अधिकारी गंभीर दिसत नाही, मुख्य मार्ग तर सोडा शहरातील ज्युबिली शाळा चौक ते जयंत टॉकीज या मार्गावर 4 चाकी वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला असतात, हा मार्ग आपत्कालीन सेवेसाठी वापरला जातो, विशेषतः शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला हा एकमेव सोपा मार्ग आहे मात्र यावर सुद्धा वाहन धारक अतिक्रमण करून ठेवतात.

     

    या वाहन अतिक्रमनावर वाहतूक विभागाने कारवाई करीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, चंद्रपुरातील रस्ते कुणाचे हा News34 चा पहिला भाग आहे, शहरातील अनेक समस्या आता आम्ही आपल्यासमोर घेऊन पुन्हा नक्की येऊ….तोपर्यंत नियमित वाचत रहा News34…