Tag: वाळू माफिया

  • illegal sand mining Rajura Wardha River । ⚡ रेती माफियांना काँग्रेसचा इशारा – कठोर कारवाई नाही तर राजुरा हादरेल आंदोलनाने!

    illegal sand mining Rajura Wardha River

    illegal sand mining Rajura Wardha River : राजुरा :– राजुरा तालुक्यातील वर्धा नदी परिसरात धानोरा, आर्वी, विरूर स्टेशनसह विविध भागांत अवैध रेती उत्खनन व तस्करीचा महापूर उसळलेला असून शासनाला कोट्यवधींचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे. नियम, अटी-शर्ती आणि परवाना प्रक्रियेची पायमल्ली करत, काही लोकप्रतिनिधींच्या छुप्या आशीर्वादाने रेती माफिया क्रेन, शेकडो ट्रॅक्टर, टिपर व डंपरच्या मदतीने दिवसाढवळ्या रेती उपसा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेची कोंबडा बाजारावर धाड

    स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने माफियांना चक्क मोकळा रस्ता मिळाल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधारात सुरू होणारी ही वाहतूक केवळ नदीपात्रालाच नाही तर आजूबाजूच्या रस्त्यांनाही पोखरत आहे. भेंडाळा – विरूर स्टेशन – अमृतगुडा या मार्गावर प्रचंड खड्ड्यांमुळे खासगी तसेच शासकीय वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. नागरिक व विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यास बाध्य झाले आहेत. Wardha river sand extraction

    कारवाई करा, युवक कांग्रेसचे मागणी

    पुरातत्त्व व पर्यावरणीय नियमांनुसार, महत्त्वाच्या ठिकाणांच्या ३०० मीटर परिसरात कोणतेही उत्खनन निषिद्ध आहे. मात्र या नियमालाही पायदळी तुडवत रेती माफिया नदीवरील पूल, पक्के रस्ते आणि निसर्गाचा उघडपणे ऱ्हास करीत आहेत. प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक समाजघटक व पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
    या गंभीर पार्श्वभूमीवर, तालुका काँग्रेस कमिटी राजुरा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून तातडीने अवैध रेती उपसा व वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास जोरदार आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. Rajura sand mafia

    यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, रामभाऊ धुमणे, मंगेश गुरनुले, प्रणय लांडे, अभिजीत भुते, हेमंत झाडे यासह तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



  • Villagers demand helicopter । रस्ता नसेल तर हवेतून जायचं!, गावकऱ्यांनी मागितले थेट हेलिकॉप्टर

    Villagers demand helicopter

    Villagers demand helicopter : भद्रावती, (जि. चंद्रपूर): भद्रावती तालुक्यातील पिंपरी (दे) येथील ग्रामस्थांनी गावातील रस्ते खराब झाल्याच्या आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ एक अनोखी मागणी केली आहे. त्यांनी तहसिलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, मजूर आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी तात्काळ हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. illegal sand mining

    आई रागावली, मुलगी घर सोडून गेली आणि ६ वर्षांनी ती…

    या मागणीमागे एक गंभीर समस्या आहे. या निवेदनानुसार, गावात बेकायदेशीर रेती उत्खनन (अवैध रेती उपसा) सुरू आहे. 10 जून 2025 पासून रेती घाट बंद असतानाही पोकलेन आणि हायवा यांसारख्या अवजड वाहनांद्वारे रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे पिंपरी ते रेती घाट आणि पिंपरी ते भद्रावती या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकी वाहनांना ये-जा करणेही अवघड झाले आहे.

    या रस्त्यांवरून प्रवास करताना दररोज अपघात होत आहेत, ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे आणि जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. या स्थितीमुळे अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, शेतकऱ्यांनाही शेतीत बियाणे आणि इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

    अवजड वाहतुकीला कुणाची परवानगी

    ग्रामस्थांनी या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीला तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी कशी दिली जाते, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. PWD road damage due to sand trucks

    ग्रामस्थांनी तहसिलदार साहेबांना या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन, विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. तसेच, अवैध रेती वाहतुकीला मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणीही केली आहे. या मागणीमुळे या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    अन्नदाता एकता मंचचे संस्थापक अनुप कुटेमाटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
    यावेळी रवींद्र कुटेमाटे,सुमित मडकाम,संदीप कुटेमाटे,महेश अस्कर,रुचिता कुटेमाटे ,सीमा कुटेमाटे,मदन कुटेमाटे, निकेश मत्ते,सुभाष कडुकर,शंकर नगराळे,राजेंद्र कुटेमाटे,निखिल धुळे,राहुल देऊलकर,दुर्वास उपरे,कार्तिक कुटेमाटे,पंकज डोंगे,संस्कार येवले ,अमित डोंगे तसेच शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • revenue officer action on sand mining । “रेतीचा डोंगर, बिना नंबरची पोकलेन!” महसूल अधिकाऱ्यांची कारवाई

    revenue officer action on sand mining

    revenue officer action on sand mining : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षांपासून अवैध वाळूचे उत्खनन सुरु आहे मात्र यावर चंद्रपूर जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे. वाळू घाटाचा एकदा लिलाव झाला तर त्याठिकाणी कश्याप्रकारे उत्खनन होते हे सुद्धा प्रशासनाकडून बघितले जात नाही. चंद्रपुरात मात्र अधिकारी थेट मध्यरात्री घाटावर पोहचत कारवाई केली.

    चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस मधील नकोडा रेती घाटावर मध्यरात्री दीड वाजता अवैध रेती उत्खनन व साठवणुकीची माहिती मिळाल्यावर नायब तहसीलदार सचिन खंडाळे व मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे यांनी चौकशी केली असता तिथे त्यांना मोठं घबाड आढळलं. पण या कारवाईत प्रशासनाला बेवारस मुद्देमाल जप्त करावा लागला. poklen seized during illegal mining Chandrapur

    नोकरीसाठी विकलं मंगळसूत्र पण झाली फसवणूक

    वर्धा नदी पात्राजवळील नकोडा घाटात वाळूचे अवैध उत्खनन सुरु असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती, माहितीच्या आधारे तहसील विभागातील अधिकारी घाटाजवळ पोहोचले असता त्याठिकाणी दोन बोटीने नदी पात्रात वाळू उत्खनन होत असल्याचे समजले, अधिकाऱ्यांना बघताच काम करणारे मजुरांनी धूम ठोकली. बोट आणि तीस ब्रास वाळू जप्त करीत पंचनामा करण्यात आला. तहसील परत जात असताना पंप हाऊस च्या रोडवरील अंदाजे 100 ब्रास रेती साठवून करून असल्याचे दिसून आले व त्या रेतीवर एक पोकलेन मशीन दिसून आली सदर स्टॉक आणि पोकलेन मशीन अवैध असल्याचे कळल्यानंतर त्यावर जप्तीची कारवाई करून व मोका पंचनामा करण्यात आला सदर मशीन जप्त करण्यात आली व रेती स्टॉक पण जप्त करण्यात आला. unclaimed sand stock seized Chandrapur

    वाळू व पोकलेन कुणाची?

    विशेष बाब म्हणजे कारवाई केल्यावर अजूनही वाळू उत्खनन, बोट व पोकलेन मशीन कुणाची याचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही, यावर नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी माहिती दिली कि सदर माल कुणाचा याबाबत माहिती मिळालेली नाही, सोबतच जप्त करण्यात आलेली पोकलेन मशीन कुणाची हे सुद्धा समजले नाही कारण मशीन वर नम्बर प्लेट नव्हता, पुढील कारवाई साठी प्रादेशिक परिवहन विभागाला याबाबत कळविण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदविण्यात आली आहे.

    Somayya institute of technology

    सदरची यशस्वी कारवाई उपविभागीय अधिकारी चंद्रपूर संजय पवार, विजय पवार तहसीलदार चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सचिन खंडाळे नायब तहसीलदार यांनी केली सदर कारवाई करत असताना प्रकाश सुर्वे मंडळ अधिकारी घुगुस ,तलाठी मनोज कांबळे ,तलाठी मनोज शेंडे, तलाठी नवनाथ गोडघासे, परशुराम पेंदोर कोतवाल,पोलीस पाटील प्रणय कांबळे नकोडा हे उपस्थित होते.

  • sand tipper escapes during tehsildar raid । 🚨 थेट तहसीलदारांसमोर रेती टिप्पर पळवला! वाचा काय घडलं त्या रात्री!

    sand tipper escapes during tehsildar raid

    sand tipper escapes during tehsildar raid : चंद्रपूर – तहसीलदार यांच्यासमोर वाळू तस्करांनी वाळूने भरलेला टिप्पर पळविल्याची घटना २१ जून ला रात्री घडली, या घटनेमुळे वाळू तस्कर महसूल विभागाला जुमानत नसल्याचे दिसून आले. याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. tehsildar stops illegal sand transport

    चंद्रपूर पोलीस दलात मोठे फेरबदल

    २१ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास तहसीलदार विजय पवार हे शासकीय वाहनाने वाहन चालक विनोद द्विवेदी सोबत गस्तीवर होते, त्यावेळी पोंभुर्णा मार्गे वाळूने भरलेला टिप्पर जुनोना गावामार्गे चंद्रपूरच्या दिशेने येत होता, तहसीलदार पवार यांनी सदर वाहन थांबविले, टिप्पर चालकाची चौकशी करीत वाहनात काय आहे असे विचारले तर त्याने वाळू असल्याचे सांगितले. वाळूचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.

    तहसीलदार पवार यांनी वाळूने भरलेला टिप्पर क्रमांक MH ३४ BG १९२९ चा रीतसर जप्तीनाम्याला सुरुवात केली, यावेळी वाहन चालक रहेमान आतिफर खान याने सांगितले कि सदर सदर वाहन हे सोनू सिंग व अंकुश वर्मा यांचे असून हि रेती थेरगाव घाटातून आणली असल्याचे सांगितले. illegal sand mining in chandrapur

    आधी वाहन अडविले आणि नंतर पळविले

    वाळू परवाना नसल्याने वाहन चालकाला पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे नेण्यास सांगितले, अष्टभुजा वार्ड नाना नाणी पार्कजवळ टिप्पर पोहचताच पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH ३४ BR ६५०५ ने तहसीलदार पवार यांच्या वाहनासमोर वाहन आडवे लावले. चारचाकी वाहन धारकाने टिप्पर चालकाला इशारा करताच सदर टिप्पर वेगात समोर गेला. सोबतच ते चारचाकी वाहन सुद्धा भरधाव वेगाने निघून गेले काही क्षणात दोन्ही वाहन दिसेनासे झाले.

    तहसीलदार पवार समोरच वाळू माफियाने मुजोरी करीत वाहन पळविले. याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

    विशेष बाब म्हणजे मागील काही वर्षांपासून वाळू घाटाचे लिलाव झाले नव्हते या काळात कोट्यवधी रुपयांच्या वाळूची तस्करी जिल्हाभरात सुरु होती, तशीच परिस्थिती चंद्रपूर शहरात पण होती मात्र आजपर्यंत महसूल प्रशासनाने अशी कारवाई करताना कुठे दिसले नाही. या काळात राजकीय पुढाऱ्यांनी वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली मात्र राजकीय दबावापोटी कारवाई झाली नाही.

  • sand smuggling at night । रेती माफियांचं ‘नाईट प्लॅन’: चंद्रपूरात काय चाललंय?

    sand smuggling at night

    sand smuggling at night : चंद्रपूर – राज्यात वाळू घाटाचे लिलाव प्रक्रिया सुरु आहे मात्र हि प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी वाळू माफियांनी नदी-नाले पोखरून काढत आहे. वाळू घाट सध्या वाळू माफियांकरिता सुरु आहे, मोठे असो कि लहान बांधकाम यासाठी चोरीच्या रेतीचा वापर होताना दिसत आहे.

    वाळूमाफियांचा गोरखधंदा

    चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे, राजकीय वेशातील वाळू माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. प्रशासनासोबत हातमिळवणी करून राजकीय वेशातील वाळू माफियांचा गोरखधंदा मागील कित्येक महिन्यापासून सतत सुरु आहे. प्रशासन कारवाईच्या नावावर केवळ ट्रॅक्टर चालकांना निशाणा बनवीत आहे मात्र राजकीय वाळू माफियांचे हायवा प्रशासनाच्या नजरेतून वाचत कसे आहे? हा प्रश्न आता काही नागरिक विचारू लागले आहे. political sand mafia

    चंद्रपुरात मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, अम्मा कि पढाई

    जिल्ह्यात घरकुल धारकांसाठी काही वाळू घाट राखीव करण्यात आले आहे, तरी सुद्धा रात्रीच्या अंधारात वाळू माफिया तस्करी करीतच आहे, २८ मे रोजी चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील CDCC बॅंकेजवळ रात्री १२ वाजेदरम्यान वाळू ची अनलोडींग सुरु होती.

    विशेष बाब म्हणजे या भागात प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारीवर्ग या ठिकाणी राहतात, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू माफिया आपलं काम करीत आहे. चंद्रपूर शहरात राजकीय वेशातील अनेक वाल्मिक या वाळू तस्करीमध्ये गुंतलेले आहे, पण प्रशासन यापर्यंत आजही पोहचू शकले नाही.

    🟦 H2: FAQs About Sand Smuggling at Night

    Why is sand smuggling mostly done at night?

    👉 To avoid detection by authorities and public.

    Who is behind the sand smuggling in Chandrapur?

    👉 Reports suggest involvement of local political-backed mafias.

    How can the public report sand smuggling?

    👉 Citizens can report through district administration portals or helplines.
  • Ghuggus sand mafia trucks seized । रेती माफियांना झटका! घुग्घुसमध्ये 3 ट्रक पकडले! 🚜

    Ghuggus sand mafia trucks seized

    Ghuggus sand mafia trucks seized : बुधवारी, दिनांक ०७ मे रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास रेती माफियांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई केली. या कारवाईत तीन मोठे ट्रक जप्त करून घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. Sand royalty violation Chandrapur

    ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन – हंसराज अहिर

    महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घुग्घुस परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नायब तहसीलदार डॉ. सचिन खंडाले, घुग्घुसचे मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, पिपरीचे तलाठी श्याम खराते आणि शेणगावचे तलाठी यांनी संयुक्तपणे धाड टाकून तीन मोठे ट्रक जप्त केले.

    जप्त केलेल्या वाहनांमध्ये १६ चाकी ट्रक क्रमांक MH २९ BD ५४०० चा समावेश आहे. या ट्रकमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी घाटाच्या ७ ब्रास रेतीची रॉयल्टी होती, परंतु प्रत्यक्षात १२ ब्रास रेती भरून वाहतूक केली जात होती. इतर दोन १४ चाकी ट्रकमध्ये MH २७ BX ७२०९ आणि MH ३२ AJ ४४४२ प्रत्येकी १०-१० ब्रास रेती वाहतूक करत होते आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैध रॉयल्टी नव्हती. या ट्रकमध्ये पिपरी घाटाची रेती भरलेली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल्टी असलेला ट्रक यवतमाळ जिल्ह्यातील आहे, तर इतर दोन ट्रक कडम तालुक्यातील मेतीखेडा गावाशी संबंधित आहेत.

    पहिला ट्रक टेम्पो क्लबजवळ तर बाकीचे दोन ट्रक राजीव रतन रेल्वे क्रॉसिंगजवळ सापडले.

  • उपविभागीय अधिकारी मेश्राम यांची वाळू माफियावर कारवाई

    उपविभागीय अधिकारी मेश्राम यांची वाळू माफियावर कारवाई

    Marathi News

    गुरू गुरनुले
    मुल – वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला मूल तालुक्यातून हायवामधून वाळू वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी आहे.

     

    हे आदेश न जुमानता मूल नदीतून वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळू मूल तालुक्यातून गेलेल्या उमा नदी पत्रातून हे वाळूमाफिया रात्रीच्या वेळेला पोकलँड साहाय्याने वाटेल तेवढी अवैध रेती मंगळवारी रात्री अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक मुल येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी पकडली रेती भरलेली गाडी 16 जानेवारी पहाटे अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास मिळालेल्या
    गोपनिय माहीतीच्या आधारे उपविभागीय अधिका-यानी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा सापळा लावून एक टक हायवा रेती भरलेले वाहन जप्त केले व वाहतूक करणाऱ्या हायवा मालकावर 3 लाख 25 हजार रुपये तात्काळ दंड ठोठावण्यात आलेले आहे.

     

    गाडी क्रमांक एम एच 33 -4485 असून मुल येथे प्रशासकीय भवन समोर जमा करण्यात आला आहे. याप्रसंगी सोबत महसूल विभागातील पथक नायब तहसिलदार राम नैताम अ. का. श्री तुनकलवार, विशाल जिडगिलवार व प्रवीण गेडाम शिपाई उपस्थीत
    होते. यांच्या नंतरही असीच कार्यवाही सुरू राहणार नदीपात्रात जाऊन बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या
    वाहनांवर कारवाई केल्यामुळे अवैध्य रेती उपसा करणाऱ्याचे माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

  • अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

    अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

    News34 chandrapur

    चिमूर : – गुणवंत चटपकार

    11 जानेवारी रोजी सायंकाळी ०७:३० ते ०८:३० चे सुमारास उपविभागीय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांचे मार्गदर्शनात तलाठी कालिदास तोडासे, चंद्रकांत ठाकरे, प्रसाद गोडघासे, प्रविण ठोंबरे व कोतवाल अकिब शेख यांनी अवैधरित्या रेतीने भरलेली मुकेश दडवे शंकरपूर तसेच पवन गायकवाड किटाळी मक्ता यांचे दोन ट्रॅक्टर वाहने मौजा मेटेपार – कवडशी डाक येथे पकडून तहसील कार्यालय चिमूर येथे जमा करण्यात आले.

     

    तसेच दिनांक.१२/०१/२०२४ ला मध्य रात्री १२ ते १२:३० वाजताच्या सुमारास नेरी उसेगाव च्या मधोमध असलेल्या पांदण रस्त्याच्या काही अंतरावरील उमा नदी पात्रात सत्ताधारी पक्षाच्या प्रतिष्ठित महिलेचे दोन रेतीने भरलेले ट्रॅक्टर तलाठ्यांच्या पथकाने पकडले असता आर्थिक चिरीमिरी करून दोन्ही ट्रॅक्टर हेतुपुरस्सर सोडून दिल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर चिमूर तालुक्यात सुरू आहे.

     

    यामुळे रेतीमाफियांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.मोठ्यांचे ठेवायचे झाकून आणि छोट्यांचे बघावे वाकून या म्हणीप्रणे हि गत या महसूल अधिकाऱ्यांची झालेली दिसून येत असल्याने रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • चंद्रपूर शहरातील हे वाळूचे डोंगर कुणाचे?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – खनिज संपत्तीने संपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात या खनिजांची सर्रास लूट सुरू आहे, मग ते कोळसा असो की रेती प्रशासनाची नजर चुकवून आज जिल्ह्यात अनेक राजकीय रेती माफिया तयार झाले आहे.

     

    सध्या वाळू घाटाचे लिलाव झाले नसले तर अवैध रित्या अनेक ठिकाणी वाळूचा उपसा सुरू आहे, यावर प्रशासन कारवाईच्या नावावर मौन पाळून बसली आहे.

    वाळू माफियामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्याचे पात्र वळविण्यात आले, याचा फटका अनेक नागरिकांना सुद्धा बसला आहे, 10 जून पर्यंत वाळू उपसा सुरू होता मात्र त्या काळात वाळू माफियांने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत शहरातील अनेक भागात वाळूची अवैध साठवणूक करून ठेवली आहे.

    चंद्रपूर शहरातील पागल बाबा नगर या परिसरात आपल्याला अनेक ठिकाणी अवैध वाळूचे लहान मोठे पहाड सहज दिसून येतील, सध्या तरी खनिकर्म व तहसील प्रशासनाने वाळूच्या साठवणुकीची कुणालाही परवानगी दिली नसली तरी वाळू माफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे अवैध काम करीत आहे.

     

    ज्या प्रमाणे पुष्पा चित्रपटात रक्त चंदनाची तस्करी करीत मोठे सिंडिकेट तयार करीत अवैध व्यापार दाखविला त्या प्रमाणे चंद्रपुरात वाळू माफियांनी सुद्धा आपलं वेगळं सिंडिकेट तयार केलं आहे, रात्रौ नंतर हे वाळू माफियांचे सिंडिकेट आपल्या घोषित जागेवर वाळूची साठवणूक करतात आणि सकाळ होताच त्या वाळू ला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येते.

     

    पागलबाबा नगर परिसरात अनेक वाळू माफियांनी विविध प्लॉटवर अवैध वाळूची साठवणूक करून ठेवली आहे, यावर प्रशासनाने आपले बांधलेले हात मोकळे करीत त्यांच्यावर कारवाई करीत शासनाचा बुडालेला महसूल वसूल करावा. विशेष म्हणजे हे वाळूचे डोंगर शहरात व ग्रामीण भागात सुद्धा आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी.

    याबाबत तहसीलदार विजय पवार यांची भेट घेतली असता त्यांनी माहिती दिली की सध्या कुणालाही वाळूची साठवून करण्याची परवानगी दिलेली नाही.