Tag: वरोरा नाका चौक

  • Dr Babasaheb Ambedkar Deekshabhoomi Chowk । वरोरा नाका चौकाचे नाव बदलणार, आता हे नाव…

    Dr Babasaheb Ambedkar Deekshabhoomi Chowk

    Dr Babasaheb Ambedkar Deekshabhoomi Chowk : शहरातील महत्त्वाच्या दळणवळण केंद्रांपैकी एक असलेल्या वरोरा नाका चौकाचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक’ असे करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना देण्यात आले आहे.

    बेकायदेशीर दारू विक्री, आपचे निवेदन

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा अध्यक्षा छबू वैरागडे, विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, महामंत्री सविता दंढारे, तेजा सिंग, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, विमल कातकर, भाग्यश्री हांडे, आशु फुलझेले, राकेश बोमनवार, अक्षय धोटे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.
    चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. Historical significance of Ambedkar’s religious revolution

    तर सन्मान प्राप्त होणार

    नागपूरनंतर बाबासाहेबांनी चंद्रपूरमध्ये दुसऱ्यांदा धम्मदीक्षा दिली होती. त्यामुळे ही भूमी बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धास्थान मानली जाते. या दीक्षाभूमीपासून हाकेच्या अंतरावर असलेला वरोरा नाका चौक शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक असे केल्यास त्याला अधिक योग्य आणि सन्मानास्पद स्वरूप प्राप्त होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


    या नामकरणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव होईल. तसेच, त्यांच्या विचारांतून सामाजिक समरसता, बंधुता आणि ज्ञानाचा संदेश जनमानसात पोहोचेल. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या चंद्रपूर शहराला हे नामकरण ऐतिहासिक ओळखही प्राप्त करून देईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


    तसेच संबंधित ठिकाणी आकर्षक फलक, स्मृतिचिन्हे व माहिती फलक बसवून हे स्थान पर्यटकांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी बनवता येईल, असेही भारतीय जनता पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

  • चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील अति वर्दळीचा भाग व अपघात प्रवण स्थळ वरोरा नाका चौकात आज मोठी दुर्घटना घडली, या घटनेत ट्रक ने तब्बल 4 वाहनांना चक्काचुर केल्याची माहिती आहे.

    ट्रायस्टार हॉटेल ते वरोरा नाका चौकात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे, या मार्गावर होणाऱ्या अपघाताला हे अतिक्रमण सुद्धा कारणीभूत ठरले आहे.

     

    25 नोव्हेम्बरला शहरातील वरोरा नाका चौकातून ट्रक क्रमांक Mh04 DK 6344 हा मूल रोडच्या दिशेने निघाला मात्र बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावरून जाताना अचानक ट्रक चा रिव्हर्स गियर लागल्याने ट्रक अतिवेगात मागच्या बाजूने यायला लागला, मागे असलेल्या चारचाकी वाहन व दुचाकीला धडक देत तब्बल 100 मीटर अंतर ट्रक मागच्या दिशेने गेला, यामध्ये 3 चारचाकी वाहन व 1 दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

     

    ट्रक चालकाने समयसूचकता दाखवीत ट्रक मागच्या बाजूने सरळ नेला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

    मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत आहे, याला जबाबदार काही वाहतुकीचे नियम मोडणारे बेजबाबदार नागरिक तर मोठ्या प्रमाणात वाढत असलेले अतिक्रमण आहे.