Tag: वन्यजीव अपघात

  • Ballarshah gondia railway wildlife deaths । 110 किमी वेगाची रेल्वे, आणि मृत्यूपथावर वन्यजीव!, अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

    Ballarshah gondia railway wildlife deaths

    Ballarshah gondia railway wildlife deaths : बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरत आहे. पोल नंबर 1203 जवळील कक्ष क्रमांक 535 मध्ये अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक वन्यजीवांना रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला. वारंवार अशा घटना घडत असूनही, रेल्वे प्रशासन उपशमन योजना (Mitigation Measures) राबविण्यास गंभीर दिसत नाही, हे अत्यंत चिंताजनक आहे.

    आता तर आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या मार्गावर दुसरी रेल्वे लाईन प्रस्तावित आहे. जर हे घडले, तर बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल. हा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग आधीच बाधित झाला आहे आणि दुसऱ्या लाईनमुळे तो पूर्णपणे संपुष्टात येईल. सध्या या मार्गावर एक्सप्रेस गाड्या जवळपास 110 किमी प्रतितास वेगाने धावतात. दुसरी लाईन झाल्यास, रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होईल आणि वन्यप्राण्यांना रेल्वे लाईन ओलांडणे अधिक कठीण जाईल. त्यामुळे वन्यजीवांना वाचवण्यासाठी तातडीने उपशमन योजना राबवणे अत्यंत आवश्यक आहे. chandrapur railway

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची चौकशी होणार

    महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? । wildlife deaths

    हा रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळून जातो आणि हा वाघांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग आहे. याशिवाय, नव्याने घोषित झालेले कन्हाळगाव अभयारण्य, कावल अभयारण्य आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या भ्रमणमार्गातही हा रेल्वे मार्ग येतो. विशेष म्हणजे, याच मार्गाचा पुढील भाग मध्य प्रदेशातील बालाघाट-नैनपूरमधून जातो. तेथील रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी अंडरपासेस (Underpasses) आणि ओव्हरपासेस (Overpasses) बांधले आहेत. मग महाराष्ट्रातील रेल्वे प्रशासन वन्यजीवांसाठी अशा उपाययोजना का करत नाही, हा मोठा प्रश्न आहे. wildlife deaths

    हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटी लँडस्केप रिसर्च अँड कंझर्वेक्षण फाऊंडेशन (Habitat Conservation Society Landscape Research & Conservation Foundation) ही संस्था वन्यजीवांच्या अपघातांची नियमितपणे नोंद ठेवते आणि वनविभाग, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाशी पत्रव्यवहार करून वन्यजीवांसाठी आवश्यक उपाययोजना सुचवत असते, जेणेकरून या निष्पाप जीवांचे प्राण वाचवता येतील. Ballarshah Gondia Railway Line

    या दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी संजीवणी पर्यावरणचे तन्मय झिरे, पशुवैद्यकीय अधिकारी छोणकर साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी वेलमे, क्षेत्र सहाय्यक खनके आणि वनरक्षक ठाकूर यांनी भेट दिली. आता गरज आहे ती रेल्वे प्रशासनाने तातडीने जागे होण्याची आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची. आणखी किती वन्यजीवांना या रेल्वे लाईनवर आपला जीव गमवावा लागणार आहे?