Tag: रोहिणी पाटील

  • The crime of culpable homicide । तुकूम अपघात – ट्र्क चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – युवतीसेना चंद्रपूर

    The crime of culpable homicide

    मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मृतक व जखमीला आर्थिक मदत द्या – रोहिणी पाटील

    The crime of culpable homicide : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील तुकूम येथे २ जून रोजी अनियंत्रित हायवा ट्र्क ने वाहनांना धडक देत २ तरुणींना चिरडले यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा हायवा ट्र्क चालक व मालकावर अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, यावर चंद्रपूर युवतीसेनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. ubt yuvatisena

    पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून सानिका कुमरे व काजल आत्राम या चंद्रपूरमध्ये राहत होत्या, २ जून रोजी अभ्यासिकेतून परत जाताना तुकूम येथे सानिका कुमरे ला हायवा ट्रक ने चिरडले. या अपघातात सानिका जागीच ठार झाली तर काजल गंभीर जखमी झाली होती. पोलीस बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या दोन्ही तरुणींचे स्वप्न धुळीस मिळाले. यावर ठाकरे गट शिवसेना युवासेनेच्या सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील यांनी याबाबत जखमी काजल आत्राम ची भेट घेत तिला धीर दिला. culpable homicide accidental death

    ठोस पुरावे तरीपण कारवाई नाही, आप ने दिला आंदोलनाचा इशारा

    युवतीसेना ने घेतला पुढाकार

    ६ जून रोजी रोहिणी पाटील यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत या घटनेला जबाबदार ट्रक चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेला जबाबदार ट्र्क चालकावर दारूचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षकांना दिली, जर घटनेच्या वेळी चालकाला फिट आली होती तर अनफिट चालकाला कामावर ठेवणाऱ्या मालकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. news chandrapur

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांची रोहिणी पाटील यांनी भेट घेत मृतक सानिका कुमरे व जखमी काजल आत्राम यांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच जखमी काजल आत्राम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला परंतु तिची चालण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती ही बाब जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली त्यांनी तात्काळ आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना हॉस्पिटलला जाऊन चौकशी करायला सांगितले. The crime of culpable homicide

    प्रोजेक्ट ऑफिसर विकास नक्षलवार यांनी स्वतः जखमी काजल आत्राम यांची परिस्थिती बघितली व त्यांनी हॉस्पिटल मधे डॉक्टरांशी बोलून परत काही दिवस जोपर्यंत ती ठीक होईल तोपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे सांगितले .दोघांच्या घरची परिस्थिती हि बेताची आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी याकरिता जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गौडा यांनी यावर सकारात्मकता दर्शवित याबाबत लवकर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

    जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटण्याकरिता गेलेल्या शिष्टमंडळात युवासेना सहसचिव, युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी धनश्री प्रभा हेडाऊ, युवती जिल्हा चिटणीस रोशनी ध्रुव गोलदार, सौरभ बोढे, सानिका फरकडे, पायल लसंते, शिव राठोड, लोचना वेलके, निधी झाडे, कुणाल मासिरकर, अतुल वांढरे, गौरव आव्हडे, अभिषेक त्रिशूले, निलेश वनकर, वैशू दादांजे, साहिल शेख, संदीप राठोड, आतिष टेकाम, सूरज मोरे, मनीष भोयर, संजना पेंदाम, दिलीप आत्राम, मुकेशकुमार इचारवार, गोविंदा मडावी, प्रीती सलाम व काजल वेलादी उपस्थित होते.

    २ जून रोजी तुकूम भागात झालेल्या या दुर्दैवी अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला, एक तरुणी जखमी झाली मात्र ट्र्क चालक हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु झाले. एकही राजकीय पक्ष या घटनेवर स्पष्ट बोलू शकत नाही आहे, कारण राजकीय दबाव, ती गरीबाची लेक होती म्हून तिला न्याय मिळणार नाही का? पोलीस बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आता न्यायासाठी मृत्यूनंतर सुद्धा तिला यातना सहन कराव्या लागत आहे. चंद्रपुरातील वातावरण हे गलिच्छ राजकारणामुळे नासून गेले.’

  • चंद्रपूर शहरातील शाळेत प्राचार्यांने विद्यार्थिनींना दिली संतापजनक शिक्षा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर येथील नटराज इंग्लिश स्कूलमध्ये एक भयावह घटना उघडकीस आली, जिथे मुख्याध्यापिका श्रीमती सरकार यांनी 23 शाळकरी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने शिक्षा म्हणून पूर्ण तासभर बाथरूममध्ये बंद केले. क्रूरता आणि निष्काळजीपणाच्या या कृत्यामुळे मुलींना तीव्र त्रास सहन करावा लागला, काहींना त्यांची सुटका झाल्यावर अस्वस्थ वाटू लागले काहींना उलट्या देखील झाल्या.

    अष्टभुजा प्रभागात असलेल्या नटराज इंग्रजी शाळेत 3 नोव्हेम्बरला हा प्रकार घडला, वर्ग 7 ते 10 वी च्या तब्बल 23 विद्यार्थिनींना शाळेच्या बाथरूम मध्ये डांबण्यात आले होते.

     

    जेव्हा मुलींनी धैर्याने या कृत्याची तक्रार शिक्षकांसोबत सामायिक केली, तेव्हा त्यांना समर्थन आणि सहानुभूतीऐवजी हास्य आणि उपहासात्मक वागणूक मिळाली. मात्र, न्याय मिळवण्याच्या निर्धाराने मुलींनी त्यांच्या पालकांना घडलेल्या या प्रकाराची हकीकत सांगितली, त्यांनी तातडीने ही घटना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांना कळवली.

     

    तक्रार मिळताच जिल्हाप्रमुख सहारे व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणी पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करत शाळेला भेट देऊन या लज्जास्पद कृत्याचा जाब विचारला. प्राचार्य सरकारकडून सुरुवातीला नकार मिळाला आम्ही जे केलं ती त्यांना शिक्षा म्हणून केलं, युवा सेनेच्या अथक प्रयत्नांमुळे अखेरीस प्राचार्य सरकार यांना चूक मान्य करून पश्चात्ताप करण्यास भाग पाडले.

     

    या संतापजनक घटनेची प्रतिक्रिया म्हणून विक्रांत सहारे आणि रोहिणी पाटील यांनी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार आल्याची माहिती दिली. या बेजबाबदार वर्तनामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. सोबत या संतापजनक कृत्य केल्याने शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करू अशी मागणी आम्ही प्रशासनाला करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी युवासेना पदाधिकारी यांनी दिली.

     

    यावेळी युवासेना शहर प्रमुख शहबाज शेख, युवा सेना उपशहर प्रमुख संगदीप रामटेके, युवती सेना उपजिल्हाधिकारी धनश्री हेडाऊ, अनुष्का खनके, रोशनी गोल्डर,सूरज रॉय व गोविंदा असोपा उपस्थित होते.

     

    नटराज इंग्रजी शाळेच्या प्राचार्य सरकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बाथरुम मध्ये विद्यार्थिनी सॅनिटरी पॅड ची विल्हेवाट लावत नसल्याने त्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी आम्ही त्यांना शिक्षा दिली, जर विद्यार्थी दुखावले असतील तर मी त्यांची माफी नक्की मागणार.