Tag: रामबाग मैदान चंद्रपूर

  • rambagh ground chandrapur । रामबाग मैदानाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी

    rambagh ground chandrapur

    rambagh ground chandrapur : रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावावर काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष रामबाग मैदानावर जाऊन पाहणी केली. त्यांनी मैदानात खोदलेल्या भागाची तपासणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना मैदान तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मैदान पूर्ववत करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. mla kishor jorgewar rambagh site visit

    चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात १७ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

    पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार म्हणाले, कालच्या बैठकीत प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली. रामबाग मैदान अबाधित ठेवण्याचा निर्णय हा जनतेच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा विजय आहे. आता इथे झालेली हानी तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे.

    तात्काळ खड्डा बुजवा

    रामबाग मैदानात खोदलेला खड्डा युद्धपातळीवर बुजवण्याचे काम त्वरित पूर्ण करा. मैदानाची जुनी रचना कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असेही आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

    आमदार जोरगेवार यांच्या पाहणीमुळे आणि कामाला मिळालेल्या गतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानिक रहिवासी, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी आमदारांचे आभार मानले. आमचा आवाज ऐकला गेला, हे खूप महत्त्वाचे आहे. आता मैदान पुन्हा आपल्या मुलांसाठी आणि खेळाडूंना उपलब्ध होईल, ही आनंदाची गोष्ट आहे,” असे नागरिकांनी सांगितले. mla kishor jorgewar latest news chandrapur

    mla kishor jorgewar rambagh site visit

    रामबाग मैदान हे चंद्रपूर शहराचे फुफ्फुस आहे. ते अबाधित राहावे, यासाठी सुरू असलेला संघर्ष आता यशाच्या दिशेने जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे व नागरिकांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले आहे. मैदानाच्या दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण होऊन ते पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पाहणीवेळी दशरथसिंह ठाकूर, मनोज पॉल, सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे यांच्यासह खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Save Ram Bagh Ground Chandrapur । रामबाग ग्राऊंड वाचवा! चंद्रपूरच्या नागरिकांनी बांधकाम बंद पाडले! 🏟️

    Save Ram Bagh Ground Chandrapur

    Save Ram Bagh Ground Chandrapur : चंद्रपूर: शहरातील निसर्गरम्य अशा रामबाग ग्राऊंडवर अचानक जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने स्थानिक जनता तसेच शहरातील खेळाडू व युवकांमध्ये संतापाची लाट उसळली. या मैदानावर काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक व खेळाडूंनी प्रशासनाला हे काम बंद करण्याची विनंती केली. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर या मैदानावर कंत्राटदाराने भला मोठा खड्डा खोदल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीचे बांधकाम बंद पाडले. Chandrapur citizens protest

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी गौडा यांचा सत्कार

    chandrapur citizens protest


    यावेळी मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व राजेश अडुर यांचेसह श्रीकांत भोयर,रविंद्र माडावार,दौलत साटोणे, नवनाथ देरकर, प्रवीण कुमार वडलोरी,माधव डोडाणी,तपन दास,कोमील मडावी,राहुल ठाकरे,प्रफुल बैरम,अक्षय येरगुडे,अमुल रामटेके,अमोल घोडमारे इत्यादी नागरिक व खेळाडू उपस्थित होते.

    उद्या रामबाग मैदानावर निर्णायक बैठक

    रामबाग ग्राऊंड 50 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हक्काचे ग्राउंड आहे, येथिल नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, इथे सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, इथे कोणत्याही इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही,नाही म्हणजे नाही असा दृढ संकल्प नागरिक व खेळाडूंनी केला आहे. याबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी उद्या दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता रामबाग मैदानावर निर्णय बैठक घेण्यात येणार आहे.

    सेव्ह रामबाग ग्राउंड

    ‘सेव्ह रामबाग ग्राऊंड, रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती’ च्या बॅनरखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, युवक-युवती व खेळाडूंनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले आहे.