Tag: राजुरा पोलीस

  • illegal diesel storage । 🛢️ “फक्त १०,८०० चं डिझेल, पण धोका हजारोंच्या जीवाला!” – राजुरातील धक्कादायक प्रकार उघड

    illegal diesel storage

    illegal diesel storage : राजुरा – चंद्रपुरातील पडोली मध्ये मोठ्या प्रमाणात डिझल चोरांचा सुळसुळाट आहे, मात्र आजवर या चोरांवर कसलीही ठोस कारवाई पोलिसांमार्फत झालेली नाही. काही महिन्यापूर्वी चंद्रपुरात अवैध पद्धतीने डिझल साठवणूक करीत एका ठिकाणी ठेवले असता त्याला भीषण आग लागली होती, असेच एक प्रकरण राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले, राजुरा पोलिसांनी आपल्या हद्दीत असणाऱ्या डिझल डिझल साठवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करीत तब्बल १२० लिटर डिझल जप्त केले.

    आयएमए विरोधात एकटवले होमिओपॅथिक डॉक्टर्स

    तर असंख्य जीवाला धोका

    १२ जुलै रोजी राजुरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पौनी जिल्हा परिषद शाळेजवळ एका पडीत रूम वर पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी ४ मोठया प्लास्टिक कॅन मध्ये १२० लिटर डिझल किंमत एकूण १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर डिझेल अवैध अवैध पद्धतीने साठवण्यात आले होते. जर या डिझल चा भडका उडाला असता तर परिसरातील असंख्य जीवाला धोका निर्माण झाला असता.

    डिझल साठवणूक करणाऱ्या २८ वर्षीय अमृतकुमार राजकुमार राजभर राहणार राजुरा याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर कलम २८७ अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सपोनि हेमंत पवार, पोउपनि चाटे, परिविक्षाधीन पोउपनि सुवर्णा काळे, पोलीस कर्मचारी संजय व पोले यांनी केली.

  • tobacco smuggling news update । बाबुपेठ येथील युवकाकडून लाखोंचा तंबाखू जप्त

    tobacco smuggling news update

    tobacco smuggling news update : राजुरा – ५ जून रोजी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी ५ लक्ष ९९ हजारांचा सुगंधित तंबाखू सहित एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. police tobacco seizure

    आज ५ जून रोजी राजुरा पोलिसांनी संविधान चौकात नाकेबंदी केली होती, यादरम्यान ऑटो क्रमांक MH३४ D ६३३९ ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ईगल हुक्का, होला हुक्का, विमल पान मसाला असा एकूण ५ लक्ष रुपयांच्या मालासहित गुन्ह्यात वापरलेला ऑटो एकूण किंमत ५ लक्ष ९९ हजार ३२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    महिलांनो सावध व्हा- भद्रावतीमध्ये चैन स्नॅचिंग ची घटना

    यावेळी पोलिसांनी ऑटो चालक अविनाश आबाजी शेंडे राहणार बाबुपेठ चंद्रपूर याला ताब्यात घेतले आहे.आरोपीविरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

    प्रशासनाचे दुर्लक्ष

    वर्ष २०१२ पासून राज्यात प्रतिबंधित असणारा सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे विकल्या जात आहे, चंद्रपूर शहरातील प्रत्येक चौकात खर्रा यामध्ये हा सुगंधित तंबाखू मिक्स करण्यात येतो. मात्र अन्न व औषध प्रशासन या माफियांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी पांडुरंग हाके, विक्की निवार्ण, प्रभाकर कोराम, जुमनाके, महेश बोलगोडवार,अविनाश बांबोळे, शफिक शेख, आनंद मोरे व शरद राठोड यांनी केली.

  • चंद्रपूर पोलीस दलातील श्रीमंताने मृत्यूला कवटाळलं

    चंद्रपूर पोलीस दलातील श्रीमंताने मृत्यूला कवटाळलं

    News34 chandrapur

    राजुरा : शहरातील पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत तरुण पोलीस कॉन्स्टेबलने भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव श्रीमंत कदम (वय- 32) असून ते राजुरा पोलीस स्थानकामध्ये कार्यत होते.

     

    मयत कॉन्स्टेबल राजुरा पोलिस स्टेशनमध्ये मागील चार वर्षापासून कार्यरत होते. शहरातील चुनाभट्टी वॉर्डातील एका भाड्याच्या घरामध्ये मागील चार महिन्यांपासून एकटाच राहत होता. त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या मोठ्या भावाला सांगितले होते.

     

    सकाळी दार उघडत नसल्याने त्यांच्या भावाला बोलाविण्यात आले मात्र भाऊ पोहचण्याअगोदरच त्याने घरातच गळफास घेतली होती. भाऊ आल्यानंतर दार काढून बघितले असता त्यांनी आपले जीवन संपविले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या पश्च्यात पत्नी, दोन वर्षाची मुलगी, आई आणि भाऊ असा आप्त परिवार आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

     

    राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.

     

    तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. लगेच सदर घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार योगेश पारधी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

     

    राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर येथीलच आरोपी निघाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल, कोळसा व भंगार चोरीचे प्रकरण समोर येत आहेत. तसेच या ठिकाणी जुगार व सट्टा चालतो. या परिसरातील युवक अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. याच प्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे. मृतक संदीप निमकर यांच्या घराशेजारी असलेल्या साई मंदिर समोर मोठ्या प्रमाणत अवैद्य धंदे सुरू आहेत. जुगार, सट्टा चालतो. माथरारोडवरील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कोळसा, डिझेल चोरीसह जुगार खेळल्या जात आहे.

     

    राजुरा शहर हे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून अस्तित्वात येत आहे, गोळीबार प्रकरण असो की गांजा तस्करी, कमी वयाची मुले आता बंदूक खेळण्यासारखे जवळ ठेवतात, विशेष म्हणजे राजुऱ्यात कोळसा तस्करांचे मोठे नेटवर्क आहे, दिवसाढवळ्या या ठिकाणी कोळशाची तस्करी केल्या जाते, पण कायद्याचे रक्षक सुद्धा यावर कारवाई करणे टाळतात.