Tag: राजुरा पोलिस

  • illegal weapon seizure by Rajura police । 📢 शहरात दहशतीच्या उद्देशाने बाळगली तलवार! राजुरा पोलिसांकडून कारवाई

    illegal weapon seizure by Rajura police

    illegal weapon seizure by Rajura police :चंद्रपूर / राजुरा – जिल्ह्यातील राजुरा शहरात तलवार बाळगणाऱ्यावर पोलीस कारवाई सत्र राबवित असून २७ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे वसाहत समोरील परिसर, सोनिया नगर मध्ये तलवार सहित एकाला अटक करण्यात आली.

    दुचाकी वाहनांचा लिलाव

    २ दिवसात राजुरा पोलिसांनी दोन जणांवर अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई केली आहे, ४२ वर्षीय पवन किरण वनकर राहणार आंबेडकर वॉर्ड याला ताब्यात घेत त्याचे जवळून ८६ सेंटीमीटर लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीवर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

    दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

    जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, गुन्हे करण्याच्या उद्देशाने आधीच अवैध शस्त्र स्वतःजवळ बाळगून गुन्हेगार दहशत निर्माणक करण्याचे काम करीत आहे, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हा घडण्यापूर्वी आरोपी व शस्त्र जप्त करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहे.

    Somayya institute of technology

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहार, शफिक शेख, महेश बांबोळे व राजीव दुबे यांनी केली.

  • chandrapur love affair murder । प्रेमात अडथळा, चंद्रपुरात एकाची हत्या

    chandrapur love affair murder

    chandrapur love affair murder : सुमठाणा (राजुरा): पत्नीच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच पतीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि. २५ एप्रिल) सुमठाणा येथे उघडकीस आली. नितेश किसन निमकर (वय ३३) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी राजुरा पोलिसांनी नंदकिशोर चरणदास सोयाम (वय २५, रा. सुमठाणा) याला अटक केली आहे. rajura police murder investigation

    पार्टीचं आमिष देऊन बोलावलं…

    मृतक नितेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपी नंदकिशोर सोयाम याने नितेशला फोन करून पार्टीचे आमिष दाखवले व घराबाहेर बोलावले. नितेश एमएच ३४ एई ६३२८ या क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र तो परतलाच नाही.

    आमचं पवित्र स्थळ परत करा, चंद्रपुरात भव्य शांती मार्च

    शरीर रक्ताच्या थारोळ्यात, डोक्यावर घातक प्रहार

    दुसऱ्या दिवशी गावाबाहेरील रस्त्यालगत नितेशचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याच्या डोक्यावर घातक वस्तूने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.

    प्रेमसंबंध होते कारण…

    आरोपी नंदकिशोर सोयाम याचे नितेशच्या पत्नीशी गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. तो सातत्याने नितेशच्या घरी येत असे. मृतकाचे वडील किसन निमकर यांनी पोलिसांना सांगितले की, एकदा त्यांनी स्वतः आरोपीला त्यांच्या घरी पकडले होते. chandrapur husband killed by lover

    प्रथम अपघात, मग उलगडला खूनाचा कट

    सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र राजुरा पोलिसांनी संशयाच्या आधारे तपास सुरू ठेवला असता या घटनेमागे प्री-प्लॅन्ड मर्डर असल्याचे उघड झाले.

    गुन्हा दाखल, आरोपीला अटक

    या प्रकरणात आरोपी नंदकिशोर सोयाम याच्याविरुद्ध कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश नन्नावरे करीत आहेत.