amma chowk naming controversy
amma chowk naming controversy : चंद्रपूर – फुटपाथवर टोपल्या विकत आपला संसार सावरणाऱ्या आणि अनेक लढ्यांतून फुटपाथ विक्रेत्यांना न्याय मिळवून देणाऱ्या गंगुबाई जोरगेवार अम्मा या संघर्षशील महिलेला सन्मान देण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाच्या जागेला ‘अम्मा चौक’ नाव देण्याची मागणी फुटपाथ असोसिएशनने केली आहे. मात्र, दुर्दैवाने या प्रस्तावाला काही राजकीय व्यक्तींकडून विरोध करण्यात आला असून, ही भूमिका निंदनीय असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. street vendor memorial proposals
कायद्याला न जुमानणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी दाखविला हिसका
गंगुबाई अम्मा यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे, तर फुटपाथ विक्रेत्यांसाठीही आपले आयुष्य झिजवले. प्रशासनाकडून फुटपाथ हटाव मोहीम राबवली जात असताना, अम्मा नेहमी या विक्रेत्यांच्या बाजूने उभी राहिल्या. त्यांच्या संघर्षामुळे अनेकांचा रोजगार टिकून राहिला. कष्ट आणि प्रामाणिकता हा मंत्र देत त्यांनी जीवनभर ज्या परिस्थितीत मुलांना घडवले, त्या परिस्थितीला वंदन करण्याची वेळ आज आली आहे.
आज जोरगेवार कुटुंब व्यवसाय आणि राजकारणात आपला ठसा उमटवत असतानाही, त्या संघर्षाचे मूळ अम्मा यांच्या त्यागात आणि सातत्यात आहे. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या असंख्य छोट्या विक्रेत्यांसाठी त्या एक प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. त्यामुळे त्या व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी ‘अम्मा चौक’ म्हणून ओळख निर्माण व्हावी, अशी भूमिका असोसिएशनने घेतली आहे. Amma Chowk Proposal and Legacy of Gangubai Joragewar
गांधी चौकाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “गांधी चौकापासून 100 मीटर अंतरावर ‘अम्मा चौक’ म्हणून एक प्रेरणादायी स्थळ निर्माण व्हावे, जे भविष्यात कष्टकरींसाठी स्मरणीय ठरेल,” असेही त्यांनी म्हटले आहे.
अनेक छोटे विक्रेते हलाखीच्या परिस्थितीत व्यवसाय सोडून हमाली वा रोजंदारीच्या नोकऱ्या पत्करू लागले आहेत. ज्या व्यक्तींनी मालक म्हणून व्यवसाय केला, त्या आज नोकरशाही स्वीकारत आहेत. ही परिस्थिती हृदयद्रावक असून, संघर्ष करणार्यांसाठी एक प्रेरणास्थान निर्माण व्हावे, ही मागणी केवळ भावनिकच नव्हे तर सामाजिक गरज असल्याचे फुटपाथ असोसिएशनने म्हटले आहे.

राजकारण करू नका
कष्ट, प्रामाणिकता आणि आत्मसन्मानाचे प्रतीक असलेल्या अम्मा यांचे स्मरण म्हणून त्यांच्या स्मृतीला या चौकाच्या रूपाने अजरामर करावे,” असे आवाहन फुटपाथ असोसिएशनच्या वतीने करण्यात आले असुन अम्मा आणि राजकारणाचा संबध नाही. त्या कष्ट आणि सेवेच्या प्रतिक होत्या. त्या नसतांना त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करणे योग्य नसल्याचेही फुटपाथ असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.




