Tag: युवासेना

  • land record manipulation at midnight । 📢 पोंभुर्णा तहसील कार्यालयात अंधारात सुरु ‘ऑफ द रेकॉर्ड’

    land record manipulation at midnight

    land record manipulation at midnight : सायंकाळी ५ वाजता कि शासकीय कार्यालय बंद होतात मात्र जिल्ह्यातील पोंभुर्णा मध्ये रात्री १२ वाजता तहसील कार्यालय सुरु करीत राजपत्रात मजकुरात फेरफार करण्याचा प्रकार उघडकीस आला.

    आप जिल्हाध्यक्ष राईकवार यांची कॉपी पेस्ट बदनामी

    पोंभुर्णा येथील सर्वे क्रमांक ९७ आराजी ४६ ही शेतजमीन प्रकाश दगोडा श्रीगिरीवार व देवराव दगोडा श्रीगिरिवार यांच्या नावावर नोंद असून, ती सातबाऱ्यावर आहे मात्र या नोंदीतील देवराव दगोडा श्रीगिरीवार नावाचा कोणताही व्यक्ती अस्तित्वात नाही. याबाबत युवासेना पोंभुर्णा शहर प्रमुख महेश श्रीगिरिवार यांनी पत्रकार परिषद घेत न्याय देण्याची मागणी केली आहे. land ownership dispute with forged records


    महेश श्रीगिरिवार म्हणाले कि पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर नाव सातबाऱ्यावर कमी करण्याचे आदेश नुकतेच काढले. मात्र संबंधित आदेश झुगारून नायब तहसीलदार दीपाली आत्राम यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्याने दुसरे आदेश काढल्याचा प्रकार समोर आला.


    या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच आत्राम यांनी स्वतःच त्या बेकायदेशीर आदेशांना रद्द करण्याची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे महसूल खात्यातील गंभीर दुर्लक्ष आणि जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. fake revenue document correction process

    रात्रीस खेळ चाले

    दरम्यान देवराव गुडलावर यांचा मुलगा योगेश गुडलावार आणि तहसील कार्यालयातील ऑपरेटर पारुल यांनी रात्री बारा वाजताच्या सुमारास कार्यालयात येत राजपत्रातील मजकुरात फेरफार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

    या प्रकारामुळे महसूल कार्यालयातील दस्तावेजानवर रात्रीच्या अंधारात छेडछाड होत असल्याचे वास्तव्य समोर आले असून संबंधितांवर काय कारवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष बाब म्हणजे देवराव दगोंडा श्रीगिरिवार या मिळत्याजुळत्या नावाने बनावट राजपत्र तयार केल्याचे दिसून आले.

    बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने आदेश करणाऱ्या व्यक्ती व नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता पोंभुर्णा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

    आयोजित पत्रकार परिषदेत युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, संजयजी ठाकूर , पोंभुर्णा शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार व साहिल नैताम उपस्थित होते.

  • Independence Day : सामाजिक उपक्रम राबवित स्वातंत्र्य दिन साजरा

    Independence Day : सामाजिक उपक्रम राबवित स्वातंत्र्य दिन साजरा

    Independence day स्वतंत्रता दिवस व शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या भगवा सप्ताह चे औचित्य साधून 15 ऑगस्टला युवासेना काॅलेज कक्ष च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,शिवसेना- युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या आदेशानुसार,युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य प्रा निलेश दादा बेलखेडे यांच्या संकल्पनेतून, विस्तारक संदिप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निशुल्क बुक बॅंक च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य किट तसेच महिलांना वृक्ष रोपटे भेट देऊन स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.

    अवश्य वाचा : नवीन चंद्रपुरात 10 हजार घरांची योजना

    Independence day सदर कार्यक्रम काॅलेज कक्षाचे आदर्श लाडस्कर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी स्वतंत्रता सैनिक, महापुरूषांना अभिवादन करून विद्यार्थी, महिलांना स्वतंत्रता दिनाचे महत्त्व, सांगून उपस्थितींना सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होऊन एकमेकांना सहकार्य करावे हा संदेश सुद्धा देण्यात आले. यावेळी काॅलेज कक्षाचे रोशन टेंभरे,विकी मेश्राम,गणेश नक्षिणे ,टिकेश गेडाम ,प्रणय मोहितकर, अयान खान व हिमांशू तपासे यांची उपस्थिती होती.

    लाडकी बहीण योजना बंद होणार या अफवेवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण

    युवासेना कॉलेज कक्ष मागील अनेक दिवसांपासून सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो की सामाजिक बांधिलकी या कार्यात कॉलेज कक्ष नेहमी अग्रेसर असतो. सिनेट सदस्य व युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज कक्ष आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना व युवासेना मध्ये निलेश बेलखडे सक्रिय सहभाग घेत अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत आहे, सिनेट सदस्य निवडीच्या आधी त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे.

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चंद्रपूर युवासेना आक्रमक झाली आहे, जिल्ह्यात अश्या घटना वारंवार घडत आहे, विशेष म्हणजे ओळखी मधील असलेले या घटनेत कित्येकदा आरोपी असतात.

     

    जानकापूर नागभीड येथे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ही घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी घडलेली घटना आहे.

     

    घरी कोणी नसताना बघून त्यांच्याच ओळखीच्या 52 वर्षीय सुधाकर महादेव निमगडे या इसमाने वेळेची संधी साधून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या घरच्यांनी आरोपी विरोधात सावरगाव नागभीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

     

    युवासेना राज्य सहसचिव व युवासेना युवती जिल्हाधिकारी चंद्रपूर रोहिणी विक्रांत पाटील यांनी आज युवासेना युवतीकडून चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात आरोपीला कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी या संदर्भात डेप्युटी एस पी मॅडम यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

    यावेळी उपजिल्हा युवती अधिकारी धनश्री हेडाऊ, विपश्यना मेश्राम, उपजिल्हा समन्वयक संतुष्टी बुटले ,युवती विभाग अधिकारी काजल मडावी उपस्थित होते.