Tag: मोकाट जनावरे

  • stray cattle control campaign Chandrapur । 🐄 मनपाची मोठी कारवाई! 58 जनावरे पकडून गोशाळेत पाठवली!

    stray cattle control campaign Chandrapur

    stray cattle control campaign Chandrapur : चंद्रपूर ९ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम जोमाने सुरु करण्यात आली असुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 58 गायी / म्हशी पकडुन त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशनची गोशाळा येथे करण्यात आली आहे.  

    चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात २० अभ्यासिकेचे होणार निर्माण

        मोकाट जनावरे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.

    या कारणामुळे कारवाई

    समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कारवाई करण्याची सुरवात करण्यात आली आहे.    


       मागील महिन्यापासुन मनपाच्या पथकाने नागपूर रोड, राष्ट्रवादी नगर, तुकूम, बंगाली कॅम्प, बागला चौक, गांधी चौक बाजार,दाताला रोड रामसेतु इत्यादी परिसरात कारवाई करत मोकाट असलेली 58 जनावरे पकडण्यात आली आहे. त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशन येथे करण्यात आली सर्व मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  • how to report stray cattle in Chandrapur city । “7038882889 वर फोन करा… आणि जनावरं हटवा!” – चंद्रपूर मनपाची मोहीम!

    how to report stray cattle in Chandrapur city

    how to report stray cattle in Chandrapur city : चंद्रपूर –  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असुन जनावरांना मोकाट सोडुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. traffic hazard due to cattle

    बल्लारपूर ते सोलापूर विशेष रेल्वे सुरु करा – खासदार धानोरकर


         शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले होते,यापुर्वी अश्या 33 मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली होती.  

    आता थेट फौजदारी कारवाई

          जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा यापुढेही सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जात आहे. तसेच मोकाट जनावरे दिसल्यास नागरिकांना तक्रार करता यावी म्हणुन मनपातर्फे 7038882889 हा संपर्क क्रमांकसुद्धा देण्यात आला असुन यावर तक्रार केल्यास कारवाई केली जाणार आहे.  

  • चंद्रपुरात वाहतुकीस अडथळा, मनपाने 10 जणांविरुद्ध केले गुन्हे दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील विविध भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार करून गुन्हे दाखल केले आहेत.

     

    शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्‌तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला डोकेदुखी ठरत असल्याने मोकाट जनावरांविषयीचा प्रश्न आयुक्त विपीन पालीवाल यांनी गांभीर्याने घेतला असुन सध्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

     

    शहर व लगत परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत. जनावरांचे काही मालक हे जनावरे सकाळी मोकाट सोडून देतात. सोडून दिलेली ही मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. बहुतांशी मुख्य रस्ते,चौक येथे मोकाट जनावरांनी रस्ता अडविलेला असतो. यातून अनेकदा गंभीर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवते.

     

    याबाबत प्राप्त तक्रारीनुसार मनपाकडून कारवाईही केली जाते. मात्र, अलीकडे जनावरांचे कोंडवाडा राहिलेले नाहीत. गोशाळांमध्ये ही जनावरे जमा केल्यानंतर मालक तेथून ती सोडवून आणतात आणि पुन्हा ती जनावरे रस्त्यावर मोकाट फिरतात. त्यामुळे मनपाने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु केली आहे.

     

    मोकाट जनावरे पकडुन पोलीस तक्रार करण्याची  मोहीम यापुढेही सुरु राहणार असुन ती अधिक तीव्र करण्यात येणार असुन पशुपालन करणाऱ्या संबंधितांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकळे न सोडण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.