Tag: मूल बस स्थानक

  • fast response by mul police । मूल पोलिसांचं कौतुकास्पद कार्याची सर्वत्र चर्चा, अवघ्या ३० मिनिटातचं!

    fast response by mul police

    fast response by mul police : चंद्रपूर (मूल २ जुलै) – प्रवास करताना आपल्या सामानाची काळजी स्वतः घ्यावी असे अनेक वाहतूक व्यावसायिक किंवा शासकीय एसटी महामंडळ प्रवाश्याना वारंवार सांगत असतात त्यानंतरही प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात. असाच एक प्रसंग मूल बस स्थानक परिसरात घडला मात्र पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात हरविलेले सामान प्रवाश्याला सुखरूप मिळाले.

    चंद्रपुरात मित्रासाठी ९५ लाखांची सरकारी भिंत

    ३० जून रोजी ३५ वर्षीय मंजुषा मनोज नैताम राहणार पडोली ह्या नातेवाईकांसह गडचिरोली वरून चंद्रपूकडे जात असताना वाटेत मूल बस स्थानक परिसरात त्यांची कथ्या रंगाची लेटर बॅग ज्यामध्ये विवो कंपनीचा मोबाईल किंमत ३० हजार व रोख रक्कम अडीच हजार सह ईटीएम कार्ड असे काही महत्वाचे दस्तावेज होते ती बस स्थानकी परिसरात हरवली. नैताम व त्यांच्या नातेवाईकांनी सदर बॅग चा सर्वत्र शोध घेतला पण ती बॅग न मिळाल्याने त्यांनी याबाबत मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. woman gets back lost valuables with police help

    पोलिसांचा जलद प्रतिसाद

    तक्रारीची दखल घेत मूल पोलिसांनी सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासात हरविलेली बॅग व त्यामधील सर्व सामान याचा शोध लावला व ती सुखरूपपणे मंजुषा नैताम यांना परत केले. पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादाने महिलेची बॅग काही वेळात मिळाल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक व मूल पोलिसांचे आभार मानले.

    सदरची कामगिरी मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात पोउपनि वर्षा नैताम, पोलीस कर्मचारी चिमाजी देवकते, शंकर बोरसरे व नरेश कोडापे यांनी केली.

  • gang stealing gold ornaments । ६ शहरांत गुन्हे करणाऱ्या महिला टोळक्याला मूल पोलिसांनी केली अटक

    gang stealing gold ornaments

    मूल बस स्थानकातून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला टोळीला अखेर गजाआड करण्यात आले आहे. या टोळीने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह विविध शहरांमध्ये चोरीच्या घटना घडवल्या होत्या. पोलिसांच्या सततच्या पाळतीनंतर ३० मे रोजी दोघींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चला, या धक्कादायक कारवाईबाबत अधिक माहिती घेऊया.

    gang stealing gold ornaments : काही दिवसांपूर्वी मूल बस स्थानक परिसरातून पाकिटमारांच्या टोळक्याला अटक करण्यात आली होती, आता मूल पोलिसांनी बस स्थानक परिसरात प्रवाश्यांचे सोने चोरणाऱ्या २ महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांकडून २ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    ६ मे रोजी सकाळच्या सुमारास मूल बस स्थानकात बस मध्ये चढून एका महिला प्रवाश्याच्या गळ्यातील १० ग्राम वजनाचा सोन्याचा गोप अज्ञातांनी चोरी केला, याबाबत मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    महावितरणची सेवा फक्त नावापुरतीच? आढावा बैठकीत काय ठरलं?

    गुन्हा दाखल होताच मूल पोलिसांनी बस स्थानक परिसरात सतत पाळत ठेवली, अखेर ३० मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान ३५ वर्षीय जमुना हितेश उरः संदीप नाडे उर्फ वाघमारे व ४० वर्षीय लक्ष्मी जगणु मानकर राहणार रामेश्वरी टोली नागपूर या दोघांना अटक करण्यात आली. gold theft at bus station

    महिलांवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल

    दोन्ही महिलांची चौकशी केली असता त्यांनी बस स्थानक परिसरातून सोन्याचे दागिने चोरी केली असल्याची कबुली दिली. विशेष बाब म्हणजे सदर आरोपी महिलांवर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती व हैद्राबाद येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. ६ मे व २० मे रोजी मूल बस स्थानकावर त्या महिलांनी प्रवाश्यांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबूल केले. female thieves caught on bus

    आरोपी महिलांकडून २५ ग्राम सोन सहित २ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोउपनि भाऊराव बोरकर, पोलीस कर्मचारी भोजराज मुडरे, जमीरखान पठाण, चिमाजी देवकाते, नरेश कोडापे व सीमा निषाद यांनी केली.

    पोलिसांचं आवाहन

    यावेळी मूल पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि बस स्थानकात बस मध्ये चढत-उतरत असताना आपल्या दागिन्यांची व मोबाईलची काळजी घ्यावी किंवा शक्यतो प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने घालण्याचे टाळावे.

  • Ladies toilet : मूल बस स्थानकावरील महिला प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य

    Ladies toilet : मूल बस स्थानकावरील महिला प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य

    Ladies toilet गुरु गुरनुले मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन गृहाची दुरावस्था बघून महामंडळाच्या अधिका-यांच्या प्रयत्नावर पाणी फेरल्या जात असल्याचा प्रकार येथील बस स्थानकामध्ये दिसुन येत आहे.

    अवश्य वाचा : मूल शहरात शिवसेनेचा भव्य रोजगार मेळावा

    Ladies toilet चंद्रपूर जिल्हयाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले येथील बस स्थानक सदैव प्रवाशी आणि बसेसच्या गर्दीने भरलेले असते. दररोज हजारो प्रवाशी येथून ये-जा करतात. त्यामूळे येथील बस स्थानकावर पुरेश्या प्रमाणात शौचालयाची व्यवस्था असावी. या मागणीची दखल घेवून महामंडळ प्रशासनाने शौचालयात पुरेश्या प्रमाणांत मुता-या निर्माण केल्या. निर्माण केलेल्या शौचालयात स्वच्छता आणि दुर्गधी येवू नये म्हणून पाण्याच्या व्यवस्थेसह देखरेख ठेवण्यासाठी महामंडळाने येथील शौचालयाचा कंत्राट नागपूर येथील राजकुमार नामक व्यक्तीला देण्यात आला. कंत्राट आदेशातील अटी आणि शर्ती नुसार कंत्राटदाराने प्रारंभीच्या काळात शौचालयाची निगा आणि देखरेख ठेवण्याचा प्रयत्न केला.

    कालांतराने मात्र कंत्राटदाराचे शौचालयाच्या स्वच्छता आणि व्यवस्थेकडे दुर्लक्ष होवू लागल्याने मागील कित्येक महिण्यांपासून येथील महिला शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने शौचालयात दुर्गधी पसरली असून तोंड आणि नाकावर कापड ठेवून महिला प्रवाश्यांना अडचण भागवावी लागत आहे. महिलांकरीता निर्माण केलेले हिरकणी कक्ष महिला शौचालयाला लागून असल्याने शौचालयातील अस्वच्छता आणि दुर्गंधीमूळे हिरकणी कक्ष असुन नसल्या सारखे झाले आहे. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमूळे स्थानकातील महिला प्रसाधन गृहात घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठया प्रमाणांत दुर्गधी येत असली तरी नाईलाजाने प्रसाधनगृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामूळे महिला प्रवाश्यांमध्यें येथील प्रसाधन गृहाच्या दुरावस्थे विषयी प्रचंड असंतोष पसरला आहे. संबंधीत विभागाने महिलांच्या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी केल्या जात आहे.

    अवश्य वाचा : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांला चंद्रपूर पोलिसांची चपराक

    येथील महिला प्रसाधन गृहातील दुरावस्था, अस्वच्छता आणि दुर्गंधी बाबत अनेक महिलांनी तक्रारी केल्या. त्याबाबत वरीष्ठांना कळविले सोबतचं शौचालयाच्या कंत्राटदारालाही सांगीतले. परंतू कोणीही प्रसाधन गृहाची दुरावस्था दुर करण्यासाठी सहकार्य करीत नाही. त्यामूळे आमचाही नाईलाज आहे.
    वाहतुक नियंत्रक,
    बस स्थानक मूल

    नेहमीप्रमाणे बस स्थानकामधील मंदिरात दर्शना करीता गेलो असता महिला प्रसाधन गृहातील दुरावस्थेविषयी काही महिलांनी सांगीतले. ही बाब अत्यंत संतापजनक असून महिलांच्या भावनांशी खेळण्याचा आहे. तातडीने येथील महिला आणि पुरूष प्रसाधनगृहाची स्वच्छता आणि देखरेखीचा निर्णय घेण्यात यावा. अन्यथा काॅंग्रेसच्या वतीने महिलांच्या सोयीसाठी आंदोलन करावे लागेल.
    संतोषसिंह रावत,
    अध्यक्ष जि.म.स.बॅंक चंद्रपूर