Tag: मुसळधार पावसाचा इशारा

  • Chandrapur red alert rainfall । चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट! पावसामुळे निर्माण होणार पूरस्थिती?

    Chandrapur red alert rainfall

    Chandrapur red alert rainfall : चंद्रपूर – बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार,  दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. monsoon flood alert

    २६ जुलै रोजी मुसळधार पाऊस

    पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे.  सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे. Chandrapur heavy rain

    नोकरीसाठी मंगळसूत्र विकले आणि झाली फसवणूक

    Somayya institute of technology

    25-26 जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

  • chandrapur orange alert heavy rain warning । चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान शक्यता! प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना!

    chandrapur orange alert heavy rain warning

    chandrapur orange alert heavy rain warning : चंद्रपूर – नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

    • संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या.
    • मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दुर रहा.
    • रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा .
    • खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा.
    • पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा.
    • फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्‍या तारोपासून दुर रहा. heavy rain alert chandrapur

    ७ ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन गोव्यात


    वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये
    • विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.
    • जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
    • आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
    • तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. what to do during lightning and thunderstorms


    • आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.
    • शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
    • विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.


    • उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
    • धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
    • जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

    जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे व मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये उचित काळजी घ्‍यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्‍यात आलेला आहे.