Tag: मामा तलाव

  • Malgujari Talav । पावसाळ्यापूर्वी माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    Malgujari Talav

    Malgujari Talav : चंद्रपूर – गतवर्षी अतिवृष्टीमुळे तलाव फुटून बोर्डा व चिचपल्ली गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी पावसाळ्यापूर्वी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचाई विभागास दिले.

    चंद्रपुरातील महाकाली मंदिरात शिरले दहशतवादी, चंद्रपूर पोलिसांनी काय केलं?

    नियोजन भवन येथे मामा तलाव व लपा तलावासंदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार श्री. मुनगंटीवार बोलत होते.बैठकीस कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभागाचे संदीप खांबाईत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सुरज पेद्दूलवार आदी उपस्थित होते.

    यंदा दक्षता घ्या

    आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील विविध तलाव दुरुस्ती कामांना गती देण्याचे निर्देश दिले. कसरगट्टा (₹६.२५ लाख), बोर्डा बोरकर (₹६.३० लाख) आणि चेक आंबेधानोरा (₹१० लाख) या दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली असून, तिन्ही कामांसाठी तीन दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून तात्काळ कामे सुरू करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.मागील वर्षी बोर्डा व चिचपल्ली येथे तलाव फुटून पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा विशेष दक्षता घेण्यावर भर देण्यात येणार आहे.

    दाबगाव मक्ता व आलेवाही येथील मामा तलावांच्या (Mama Talav) दुरुस्तीचे अंदाजपत्रक तत्काळ तयार करावे. तसेच दाबगाव तुकूम, आलेवाही नवरगाव (सर्वे नं. १०), कांतापेठ रयतवारी (सर्वे नं. ३५), चिचपल्ली, मुरमाडी (सर्वे नं. ३१), विहीरगाव येथील मामा तलावांच्या दुरुस्ती कामांसाठी कार्यादेश आधीच जारी करण्यात आले आहेत.काही कामांना सोमवारपासून कार्यारंभ आदेश देण्याचे सुचविण्यात आले आहे.मामला तलाव गेट दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे.सर्व उर्वरित कामांना २७ मे पर्यंत मंजुरी मिळवण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी दिले.

    अंदाजपत्रकाची माहिती सादर करा

    विभागाने बल्लारपूर मतदारसंघातील सर्व तलावांची यादी तयार करून, त्यांच्या सिंचन क्षमतेसह दुरुस्तीची गरज, खोलीकरण इत्यादी बाबींचे सविस्तर निरीक्षण करून संबंधित विभागाचे रीमार्क्स घावेत. प्रत्येक तलावाची एकत्रित सिंचन क्षमता व खर्चाचे अंदाजपत्रकाची माहिती सादर करावी.

    niyojan bhavan

    चिचाळा–कवडपेठ दरम्यान नव्याने बांधलेल्या तलावाच्या वेस्ट वेअरची उंची जास्त असल्यामुळे यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. बोर्डा तलावाचे अंदाजपत्रक सोमवारी तयार होणे अपेक्षित आहे.मोलझरी तलावासाठी यापूर्वी ₹३ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. उर्वरित कामांसाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

  • mama talav : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर, पाळीला पडले मोठे भगदाड

    mama talav : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर, पाळीला पडले मोठे भगदाड

    Mama talav मुल तालुक्यातील काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर असून त्याठिकाणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने आज भेट दिली आणि प्रशासनाला इशारा देत मोठा अनर्थ टाळायचा असेल तर त्वरित कारवाई करावी.

    मामा तलावांच्या देखरेखीचे काम योग्य प्रकारे न केल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक गावचे तलाव जसे चिचपल्ली दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतीचे आणि लोकांच्या वस्तीचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच आठवण येथील तलावाच्या पाळीला सुद्धा मोठे भगदाड पडलेले आहे आणि तो तलाव जर फुटला तर शेतीच्या आणि वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी असा इशारा भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने प्रशासनाला दिलेला आहे.

    अफवा : जिल्ह्यात उडाली अफवा, लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट नंतर बंद होणार, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिलं स्पष्टीकरण


    Mama talav या घटनेमुळे मामा तलावांच्या देखरेखितेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे, मुसळधार पाऊस आला, पूर आला की मामा तलावांतील पाणी फुटतात आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना भोगावा लागतो हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ही भूमिपुत्र टीम ने यावेळी केली आहे.

    आधीच पिंपळगाव व चीचपल्ली येथील मामा तलाव फुटल्याने स्थानिक नागरिकांची भर पावसात वाताहत झाली होती, नागरिकांचे अन्न धान्य सुद्धा वाहून गेले होते, प्रशासनाने त्या घटनेनंतर याबाबत जिल्ह्यातील मामा तलावाची दुरुस्ती होत आहे का? याकडे लक्ष देणे गरजेचे होते मात्र काटवन येथील मामा तलाव बघितल्यावर प्रशासन सध्या मुकदर्शक झाला की काय असे चित्र पुढे आले आहे.

  • loss of agriculture : शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान

    loss of agriculture : शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान

    Loss of agriculture गुरू गुरनुले मुल – गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने मुल तालुक्यातील दाबगाव तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा साचल्याने जांगलालगत असलेल्या मामा तलावाची मोठी पाळ फुटल्याने तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत गेल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली. अनेकांचे खरीप पिक धानाचे रोवणे वाहून गेले. पऱ्हे, आवत्यां वाहून गेले. शेकडो हेक्टर शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे.

    अवश्य वाचा : भर पावसात मुनगंटीवार पोहचले पूरग्रस्त भागात

    तलावाखाली लागून असलेला गरीब शेतकरी महादेव थरकर व रत्नमाला थेरकर या शेतकऱ्यांच्या सात एकर शेतीत पूर्ण रेती साचलेली आहे.पाळी फुटून गेले,यावर्षीचे पूर्ण पीक वाया गेल्याने शेतातील रेतीचा पूर्ण उपसा केल्याशिवाय पुढील वर्षी शेती कसण्यासाठी कमी येणार नाही. असे कांग्रेस कमिटीच्या पदाधिकारी यांना सांगताना धसाधस रडायला लागला.किंबहुना मी वाचून का करु आताच तुमच्यासमोर आत्महत्या करतो म्हणत पाण्याकडे जायला निघाला तेवढ्यात कांग्रेस पदाधिकारी यांनी त्याला रोकुन हिम्मत दिली. उपस्थित असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या नुकसान बाबत चर्चा केली.

    अवश्य वाचा : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर यांनी संसद गाजवली

    Loss of agriculture नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोशसिंह रावत यांचे मार्गदर्शनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर घडसे यांनी शेतीवर जाऊन नुकसान ग्रस्त शेकऱ्यांसमोर सभापती राकेश रत्नावार व अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम व तहसीलदार मृदुला मोरे यांचेशी फोनवर बोलून समस्या मांडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे निवेदन आपल्याकडे देऊन चर्चा करणार असे सांगितले. याप्रसंगी दाबगाव उपसरपंच अतुल बुरांडे, यांचेसह तलावाच्या पाण्याखाली ज्या शेतकऱ्यांची शेती आली व नुकसान झाली असे सर्वच शेतकरी बांधव व गावातील अन्य शेतकरी उपस्थित होते.