Tag: महाविकास आघाडी

  • maha vikas aghadi leader : तर महाविकास आघाडी सर्वोत्तम पर्याय – खासदार प्रतिभा धानोरकर

    maha vikas aghadi leader विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कंबर कसली असून सर्व विधानसभा क्षेत्रात प्रचार सुरु केला आहे.

    maha vikas aghadi leader महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दौरा करीत आहेत.

    प्रचारादरम्यान नागरीकांशी चर्चा करुन सर्व सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी महाविकास आघाडी सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर व्यक्त केले आहे.

    अम्मा का टिफिन उपक्रमातून आमदार किशोर जोरगेवार यांची नवी ओळख, निराधारांचा आधार, किशोर जोरगेवार – देवेंद्र फडणवीस

    वरोरा विधानसभा क्षेत्राच्या विकासातील सातत्य टिकवण्याकरिता महाविकास आघाडीचे प्रविण काकडे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माजरी येथील छठ पुजन च्या कार्यक्रमात केले. तसेच दि. 09 नोव्हेंबर 2024 रोजी गोंडपिपरी तालुक्यात विविध गावातील भेटी दरम्यान राजूरा विधानसभा क्षेत्रातील विकासामुख महाविकास आघाडी चे उमेदवार सुभाष धोटे यांना प्रचंड बहूमताने विजयी करण्याचे आवाहन देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. maha vikas aghadi leader

    मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीने उत्तम कार्य केले असून कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेची केलेली सेवा लक्षात घेऊन भविष्यात सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर व्यक्त केले आहे.

  • Mahavikas Aghadi : पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनात निषेध

    Mahavikas Aghadi : पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनात निषेध

    mahavikas aghadi कलकत्ता, बदलापूर व नागभीड येथे झालेल्या अत्याचार प्रकरणविरोधात आज चंद्रपूर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फित लावत गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

    महाविकास आघाडीच्या वतीने आज 24 ऑगस्टला बंद पुकारण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद हा नियमबाह्य असल्याचे सांगितले.

    संतापजनक : मनोरुग्ण महिलेवर चंद्रपूर जिल्ह्यात सामूहिक अत्याचार


    देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे, यावर राज्यातील मुख्यमंत्री व गृहमंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहे, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात आली.


    Mahavikas Aghadi आयोजित निषेध आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार गट दीपक जयस्वाल, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, शिवसेनेचे प्रमोद पाटील, कुसुमताई उदार, सुनीता लोढिया, संगीता अमृतकर उपस्थित होते.

    कायदा व सुव्यवस्था : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू


    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली की देशात व राज्यात महिला अत्याचार सतत वाढत आहे याबाबत मविआ ने बंद पुकारला होता मात्र न्यायालयाने बंद नियमबाह्य असल्याचे म्हटले होते, शरद पवार यांनी संविधानाचा आदर करीत तोंडाला काळ्या फिति लावत निषेध आंदोलन करण्याचे सांगितले, त्यामुळे आम्ही संविधानाचा आदर करीत आंदोलन करीत आहो. राज्यात घडलेल्या या घटना संतापजनक आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा.

    राज्य सरकारचा निषेध


    आमदार सुभाष धोटे म्हणाले की 23 ऑगस्टला हिंदू समाजाच्या मोर्च्यात पालकमंत्री व स्थानिक आमदार उपस्थित होते त्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी एक शब्द सुद्धा उच्चारला नाही, यावर आम्ही त्यांचा निषेध करतो.
    आयोजित निषेध आंदोलनात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

  • सरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका

    सरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका

    News34 chandrapur

    नागपूर  :-राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे.  शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत.  हा कार्यक्रम टाळला असता तर शासन  शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने सरकारने शेतकऱ्याप्रती ही संवेदनशीलता दाखवली नाही. पण संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्ही चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमीका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
    आज नागपूर येथील रविभवन येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात  मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील  वाढता  रोष,  कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट, अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम करत आहे. यावरून सरकारचा संवेदनशिलपणा हरविल्याचे दिसून येते.
    छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी ओळख या महायुती सरकारने केली. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली झाल्या. महाराष्ट्रात २०२२ मध्ये दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही त्या वर्षातल्या देशातील सर्वाधिक नोंद असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहिती आहे. महायुती  सरकार आल्यावर राज्यात दंगली, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली. संत्रा नगरी असलेल्या नागपूरची ओळख आता चोरांची राजधानी अशी झाली आहे. जर महाराष्ट्राची ही ओळख होत असेल तर या राज्यात  गुंतवणूक कशी येणार? उद्योग कसे येणार? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. NCRB आकडेवारी नुसार २०२२ वर्षात राज्यात सगळ्यात जास्त नागपूर मध्ये २ हजार ५०३ चोरीच्या घटना झाल्या आहेत. महायुती सरकार आल्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासला आहे.
    नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवालानुसा महाराष्ट्र खुनाच्या घटनेत तिसरा, बलात्कारात चौथ्या क्रमांकावर, सायबर गुन्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. सर्वाधिक दुष्काळ. तरीही शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रचंड उधळपट्टी. ही उधळपट्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तिखट-मीठच सरकारने चोळले. उधळपट्टी ऐवजी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असुन सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाचे आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही हे खेदाने म्हणावे लागते. महाराष्ट्र हे फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी  विचाराचा वारसा जपणारे  राज्य असून या सरकारने मात्र जाती जाती मध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. मराठा व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत बोटचेपेपणाची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकार बद्दल प्रचंड रोष आहे.
    जनतेचे प्रश्न सरकारला सोडवता न आल्याने सरकारी तिजोरीतून आपली पाठ थोपठून घेण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या योजनेद्वारे सुरु आहे. यामध्ये राज्य सरकार जनतेची कामे न करता जाहिरातबाजीवर भर देत आहे. “शासन आपल्या दारी” योजनेचा फोलपणा दिसून येत आहे. आपल्या सरकारची कामगिरी खोटी असून प्रसिध्दी मात्र मोठी आहे. राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत  विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन  तेरा वाजले आहेत.  एकंदरीतच फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम आपल्या सरकार मार्फत केले जात आहे. चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था असल्याचा हल्लाबोल श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.