Tag: महानगरपालिका निवडणूक

  • BJP meeting former councillor for civic polls । चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ताकद एकत्र, जोरदार तयारी सुरू!

    BJP meeting former councillor for civic polls

    BJP meeting former councillor for civic polls : चंद्रपूर – आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जनसंपर्क वाढविण्याच्या तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना केल्या. Kishor Jorgewar election strategy Chandrapur

    मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीम माहिती

    या बैठकीला महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप नेते अशोक जिवतोडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, दशरथ सिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, रवी जोगी, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्नील डुकरे, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य तुषार सोम, वनिता कानडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते.

    या बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रभागातील स्थानिक समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. civic issue resolution in municipal elections

    संघटितपणे काम करा

    यावेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, आपण केलेले काम आता प्रभावीपणे प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवा. पक्षाचे विचार प्रत्येक घरी पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. व्यक्तिकेंद्रित काम न करता पक्ष म्हणून संघटितपणे काम करा. पक्ष, जनसंपर्क आणि परिश्रम हा निवडणूक जिंकण्याचा मंत्र आहे, असे आवाहन त्यांनी सर्व माजी नगरसेवकांना केले.

    समस्या व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घ्या

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, आजची ही बैठक केवळ निवडणूक तयारीची नाही, तर आपल्या एकत्रित ताकदीचा आणि पक्ष संघटनेच्या दृढतेचा संकल्प करण्यासाठी आहे. आपल्या प्रत्येक प्रभागातील समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा या सगळ्या आपण प्रत्यक्ष जाणून घेतल्या पाहिजेत. लोकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडवणे हीच आपल्या कामाची खरी ओळख आहे. आपण एकसंघ राहून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल तुषार सोम यांचा सत्कार करण्यात आला.

  • upcoming local body elections | चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू

    upcoming local body elections

    upcoming local body elections :  चंद्रपूर 20 जून – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरु झाली असुन प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक गुरुवार (19 जून) रोजी चंद्रपूर मनपा राणी हिराई सभागृहात घेण्यात आली.


       आगामी निवडणुकांमध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण  करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य व्हावे,सर्व पात्र मतदारांना मतदान करता येऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा उपविभागीय दंडाधिकारी  संजय पवार, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा तालुका दंडाधिकारी विजय पवार,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रावार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

    शिक्षकांच्या वेतन प्रक्रिया बाबत आमदाराने अधिकाऱ्याला धरले धारेवर

    प्रस्तावित प्रभागाची माहिती


       आगामी निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पुर्ण केली जात आहे. या बैठकीत शासनाकडून निर्गमित प्रभाग रचना आदेशावर सविस्तर करण्यात आली. नव्याने प्रस्तावित प्रभागांची माहिती, मार्गदर्शन तसेच नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी नियोजन या विषयांवर चर्चा झाली. ward restructuring for local elections

    विशेष मोहीम

    प्रशासनामार्फत मतदार जनजागृती व्यापक प्रमाणात होणार असुन येत्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे तसेच नावात दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व उपलब्ध संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. voter list update


        निवडणुक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले की, ‘मतदार यादी अद्ययावतीकरण ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे. सर्व पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करून लोकशाही हक्क बजावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस जनजागृतीसाठी सर्व पक्षांनी सक्रीय सहभाग द्यावा.’ बैठकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पारदर्शक, सुसूत्र व शांततेपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.