Tag: महसूल विभाग

  • Vacancies in Revenue Department । ⚡ “महसूलमंत्रीच नागपूरचे आणि तिथेच दिरंगाई? धानोरकरांचा संतप्त सवाल!”

    Vacancies in Revenue Department

    Vacancies in Revenue Department : चंद्रपूर नागपूरचे असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच विभागात नायब तहसीलदार पदांच्या पदोन्नतीला दिरंगाई का होत आहे, असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोकण विभागातील पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीची प्रक्रिया रखडल्याने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

    फळांच्या बियांनी भरले चंद्रपुरातील जंगल

    नागपूर महसूल विभागात अंदाजे ४५ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक ठिकाणी एका नायब तहसीलदाराकडे दोन ते तीन सर्कलचा अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी, जनतेची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास विलंब होत आहे. revenue department promotion delay

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी अव्वल कारकून, मंडळ अधिकारी यांच्या निवडसूची २०२४-२५ नुसार विभागीय पदोन्नती समितीद्वारे मंजूर केलेली निवडसूची मार्च २०२५ मध्येच शासनाकडे सादर केली आहे. असे असूनही, गेल्या दोन महिन्यांपासून ही फाईल मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित आहे, ही चिंतेची बाब आहे. pending promotion file deputy tehsildar

    कोकण विभागातील अशाच प्रकारच्या पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागाच्या पदोन्नती प्रक्रियेला विलंब का होत आहे, आणि विशेषतः महसूलमंत्री स्वतः नागपूरचे असताना हा अन्याय का, असा सवालही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.

    निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्देशांचाही संदर्भ दिला, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने निवडणुकीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

    कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत रिक्त पदे भरण्याची ग्वाही

    याव्यतिरिक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात सर्व विभागांतील रिक्त पदे १०० दिवसांच्या कार्यक्रमानुसार भरण्याची ग्वाही दिली होती. या ग्वाहीकडे महसूल विभागाने लक्ष देऊन तातडीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आग्रह केला आहे की, या महत्त्वाच्या पदोन्नती प्रक्रियेला गती देऊन जनतेची कामे वेळेवर मार्गी लागावीत आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी महसूलमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे.

  • Chandrapur district administration new vehicles । 📸 आपत्कालीन व्यवस्थेसाठी चंद्रपूर तयार! प्रशासनाच्या ताफ्यात नवे ‘बोलेरो’ वाहन

    Chandrapur district administration new vehicles

    Chandrapur district administration new vehicles : चंद्रपूर (२१ जून २०२५ ) – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

    चंद्रपुरात योगा चा महासंगम


    नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अजय चरडे, रविंद्र माने, तहसीलदार विजय पवार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

    यांना मिळणार नवे वाहन

    जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना, त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूर, गोंडपिपरी, मुल, वरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

  • उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

    उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

    News34 chandrapur

    चिमूर – (गुणवंत चटपकार)
    चिमूर शहर व तालुक्याची जिवन वाहीनी असलेल्या उमा नदीचीचे पात्र रेती तस्करां करीता संजिवनी ठरली आहे. सोनेगाव सिरास गावा जवळील उमा नदीच्या घाटातुन मागील पंधरा दिवसा पासुन रात्रोच्या सुमारास रेतीचा उपसा करून रोज चिमूर व नेरी येथील पंचेविस ते तिस ट्रॅक्टर द्वारे तस्करी केल्या जात आहे.ज्यामुळे शासणाचा लाखो रूपयाचा महसुलास रेती तस्करांनी चुना लावलेला आहे.

    चिमूर तालुक्यात सर्व पक्षीय रेती तस्करांकडून रेतीचा उपसा व वाहतुक करून बक्कळ पैसा कमविल्या जात आहे.या तस्करांना राजकिय व प्रशासकिय आधार मिळाल्याने त्यांची मुजोरी वाढली असुन सामान्य नागरीकांना कुणीही जुमानत नाही.

     

    शेतकऱ्यांना,गावकऱ्यांना धमकावुन व प्रशासनाशी आर्थिक हितसंबध जोपासुन यांचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु आहे. चिमूर तालुक्यात उमा नदीच्या सोनेगाव सिरास जवळील पात्रात स्थळावर मोठ्या प्रमाणात रेती आहे.हे सर्व हेरून चिमूर नेरी येथील रेती तस्कर सामुहिक पणे या पात्रातुन अवैध रेती उत्खनन व वाहतुक करीत आहेत.ज्यामुळे पात्रात जवळपास पाच फुटावर खड्डे पडलेले आहेत.हि रेती तस्करी रोज रात्रो पहाटे पाच वाजे पर्यंत केल्या जाते.

     

    अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या साठी निर्माण करण्यात आलेल्या पांदण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात दुचाकीने जाताना जिव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक शेतकरी यावरून मार्गक्रमण करताना पडले आहेत.मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या रेती तस्करीकडे महसुल विभाग जाणीव पुर्वक दुर्लक्ष करतात कि त्यांना माहीती नसते हा गंभीर प्रश्न आहे.या घाटातुन करण्यात आलेल्या रेती उपसा संबधी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांना माहीती देण्यात आली असुन या रेती तस्करावर कोणती कार्यवाही होईल याकडे नागरीकांचे लक्ष लागलेले आहे.