Tag: मतदार यादी

  • upcoming local body elections | चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू

    upcoming local body elections

    upcoming local body elections :  चंद्रपूर 20 जून – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरु झाली असुन प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक गुरुवार (19 जून) रोजी चंद्रपूर मनपा राणी हिराई सभागृहात घेण्यात आली.


       आगामी निवडणुकांमध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण  करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य व्हावे,सर्व पात्र मतदारांना मतदान करता येऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा उपविभागीय दंडाधिकारी  संजय पवार, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा तालुका दंडाधिकारी विजय पवार,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रावार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

    शिक्षकांच्या वेतन प्रक्रिया बाबत आमदाराने अधिकाऱ्याला धरले धारेवर

    प्रस्तावित प्रभागाची माहिती


       आगामी निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पुर्ण केली जात आहे. या बैठकीत शासनाकडून निर्गमित प्रभाग रचना आदेशावर सविस्तर करण्यात आली. नव्याने प्रस्तावित प्रभागांची माहिती, मार्गदर्शन तसेच नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी नियोजन या विषयांवर चर्चा झाली. ward restructuring for local elections

    विशेष मोहीम

    प्रशासनामार्फत मतदार जनजागृती व्यापक प्रमाणात होणार असुन येत्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे तसेच नावात दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व उपलब्ध संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. voter list update


        निवडणुक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले की, ‘मतदार यादी अद्ययावतीकरण ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे. सर्व पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करून लोकशाही हक्क बजावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस जनजागृतीसाठी सर्व पक्षांनी सक्रीय सहभाग द्यावा.’ बैठकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पारदर्शक, सुसूत्र व शांततेपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

  • chandrapur voter list 2024 : मतदार याद्या प्रसिद्ध, नागरिकांनो आपले नाव तपासा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    chandrapur voter list 2024 : मतदार याद्या प्रसिद्ध, नागरिकांनो आपले नाव तपासा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    chandrapur voter list 2024 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.

    अवश्य वाचा : आज चंद्रपुरात निघणार मशाल रॅली

    Chandrapur voter list 2024 यात प्रामुख्याने नवमतदारांची नोंदणी, मयत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे, मतदार यादीत त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात तब्बल 38637 मतदारांची वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यात आता 1000 पुरुष मतदारांमागे 965 स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर 9 ने वाढल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

                जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

      chandrapur voter list 2024 पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 1 जुलै 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, ते लगेच तपासावे, जेणेकरून कोणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नाव नोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी वेळात वेळ काढून संबंधित ठिकाणी जावून आपले नाव तपासावे, असे आवाहन त्यांनी केले.

      Chandrapur vote list 2024 जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात एकूण 17 लक्ष 92 हजार 147 मतदार होते. यात आता 51125 मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून 12488 नावे मयत किंवा स्थलांतरीत झाल्यामुळे वगळण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ झाली असून जिल्ह्यात आता एकूण 18 लक्ष 30 हजार 784 मतदार आहेत. यात 9 लक्ष 31 हजार 821 पुरुष मतदार, 8 लक्ष 98 हजार 918 स्त्री मतदार तर 45 इतर मतदारांचा समावेश आहे.

    18 ते 19 वयोगटातील 33825 युवा मतदार : जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 10488 ने वाढली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून 33825 युवा मतदार आहेत. यात 18801 पुरुष, 15022 स्त्री आणि 2 इतर मतदार यांचा समावेश आहे.

    मतदान केंद्रांची संख्या, 85 वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदार : जिल्ह्यात एकूण 2076 मतदार केंद्र असून राजूरा विधानसभा मतदार संघात – 344, चंद्रपूर – 390, बल्लारपूर – 366, ब्रम्हपूरी – 319, चिमूर – 314 आणि वरोरा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात 85 वय आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 13987 आहे. तर दिव्यांग मतदार एकूण 8496 आहेत.

    मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग नोंदविता यावा, यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. यासाठी मतदार यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक 6 भरून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

  • Verification of voters list : चंद्रपूर जिल्हा प्रशासन लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

    Verification of voters list : चंद्रपूर जिल्हा प्रशासन लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

    Verification of voters list आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/international-yoga-day-activities-mla-kishor-jorgewar-big-announcement/

    त्यानुषंगाने सदर कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहे. जे मतदार 18 वर्षाचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र.6 भरुन नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरीत झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटया दूर करण्यात येणार आहे.

     

    Verification of voters list विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्यात बदल करुन घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात कांग्रेसने महायुती सरकारवर फेकले चिखल

    विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर  उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6. 7 आणि 8 स्वीकारतील व दि. 19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.

    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक : चंद्रपूर जिल्हयातील मतदार यादीच्या शुध्दीकरणाचे काम आगामी विधानसभा, निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी शुक्रवारी (दि. 21) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. तसेच जिल्हयातील सर्व मतदारांना आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

     

    Verification of voters list ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नसेल, अशा मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रासह नमुना क्र. 6 भरुन विहीत मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.