Tag: भूषण फुसे

  • Today Caste Politics : ओबीसी मधील कुणबी वगळता बाकीनी सतरंज्या उचलायच्या काय? – भूषण फुसे

    Today Caste Politics : ओबीसी मधील कुणबी वगळता बाकीनी सतरंज्या उचलायच्या काय? – भूषण फुसे

    caste politics प्रतिभा धानोरकर यांच्या “त्या” वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी दिला अल्पसंख्यकांना भाजप नंतर काँग्रेस पासून सावध राहण्याचा इशारा

    Caste politics ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ असो की गडचिरोली, या दोन्ही ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करीत आहेत. ही परंपरा आता खऱ्या अर्थाने बदलण्याची वेळ आली आहे, असे म्हणत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन कुणबी महाधिवेशनात नुकतेच केले.

    ब्रम्हपुरी येथे हे अधिवेशन झाले. वडेट्टीवार हे अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करतात हे येथे उल्लेखनीय. रविवारी ८ सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी येथे झालेल्या कार्यक्रमाला चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा वडेट्टीवार यांच्या काँग्रेस पक्षातील विरोधक प्रतिभा धानोरकर यांच्यासह कुणबी समाजातील नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करा, असे आवाहन केले.

    महत्वाचे – या कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन नकोचं – चंद्रपूर मनपा

    Caste politics काही वर्षे ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व अल्पसंख्य समाजाचे लोक करीत आहेत, ही परंपरा बदलण्याची हीच खरी वेळ आहे. कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडतो. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदला, असे जाहीर आवाहन धानोरकर यांनी केले. वडेट्टीवार यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी टीका केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    सोयाबीन उत्पादकांना महायुती सरकारचा दिलासा

    अल्पसंख्यांक समाजाबद्दल काँग्रेस च्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या सदर व्यक्तव्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी सर्व जाती धर्मातील अल्पसंख्यकांना भाजप नंतर आता काँग्रेस पासूनही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस मध्ये सुद्धा कुणबी फॅक्टर चे जातीवाद सुरु असून यामुळे आज वड्डेटीवार बद्दल प्रतिभा धानोरकर असं बोलत असून उद्या अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, आदिवासी, मुस्लिम, जैन, पारशी व इतर अल्पसंख्यकांना सुद्धा असे लोक राजकारणात येऊ न देता आजही गुलामगिरीत ठेवण्याची यांची मानसिकता असल्याचे यावरून दिसून येत आहे.

    लोकसभा निवडणुकीत माझे पती चे अवकाळी निधन झाले असे इमोशनल कार्डच्या आडून कुणबी कार्ड खेळल्या गेले. अल्पसंख्याक समाजातील लोकांनी मोदी नकोच म्हणत एक महिला म्हणून प्रतिभा धानोरकर याना खासदार बनवून लोकसभेत पाठविले. मात्र जनतेची कामे न करता आता आपण जनप्रतिनिधी आहोत हे भान विसरून आपण कुणबी आहो असे बोलण्याने सर्व अल्पसंख्यांक समाजामध्ये नाराजी उमटली असून असले जाती कार्ड खेळणाऱ्या सत्तेच्या लवकरच माज आलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना सर्व अल्पसंख्यांक समाजांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवावा, ओबीसी समुदायातील कुणबी वगळता बाकीच्यांनी काय यांच्या सतरंज्या उचलायचा का असा खोचक टोलाही सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी लगावला आहे.

  • Mahavitaran Office : महावितरण कार्यालयात तोडफोड, भूषण फुसेवर गुन्हा दाखल

    Mahavitaran Office : महावितरण कार्यालयात तोडफोड, भूषण फुसेवर गुन्हा दाखल

    mahavitaran office धास्ती : भूषण फुसे यांचे जिवतीत आक्रमक “तोडफोड” स्टाईल आंदोलन
    मुख्यालयी हजर नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली तंबी


    Mahavitaran office जिवती – शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना आक्रमक आंदोलना करिता प्रसिद्ध आहे तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुद्धा सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे हे सुद्धा अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची आंदोलने प्रामुख्याने मागासवर्गीय, अपंग, रुग्ण, विधवा, लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी असतात. अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याबरोबरच प्रसंगी कायदा हातात घेऊनही त्यांनी आंदोलने केली आहेत. सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूषण फुसे नेहमी आक्रमक असतात.

    जेलभरो आंदोलन

    Mahavitaran office भूषण फुसे यांच्या आंदोलनाची चांगलीच धास्ती जिवती तालुक्यातील मुख्यालयी नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आली असून यापुढे सर्वसामान्य गोरगरिबांची कामे वेळेवर न केल्यास थोबाडच रंगविण असा आक्रमक इशाराही फुसे यांनी दिला आहे. जिवती तालुक्यात सरकारी अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नाही परिणामी नागरिकांची कामे खोळंबतात हि नेहमीच बोंब असताना सुद्धा प्रशासनातर्फे अश्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनवर कोणतीही कारवाई होत नाही.

    अवश्य वाचा : तुझा रेप करीत ठार मारणार, महिलेला धमकी, चंद्रपूर पुन्हा हादरलं

    दि. ५ सप्टेंबर ला सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन जिवतीत होते. एक दिवस अगोदर दि. ४ सप्टेंबर ला जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमाचा आढावा घेण्याकरिता भूषण फुसे जिवतीत गेले होते. फुसे जिवतीत आल्याने परिसरातील शेतकरी, महिलावर्ग व सर्वसाधारण नागरिक कार्यलयात आले आणि त्यांनी जिवती तालुक्यातील समस्या सांगितल्या अशीच महावितरणची एक समस्या सोडविण्याकरिता भूषण फुसे हे महावितरण कार्यलयात गेले असताना त्यांनाही तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. भूषण फुसे यांनी टेबल ठोकत आक्रमक पावित्रा दाखविला यात फुसे यांच्या हातून संगणकाचा स्टॅंड व कुर्सी तुटली यात महावितरणचे एक हजार रुपयाचे नुकसान झाले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रवीण देवतळे यांनी पोलिसांत याविषयी तक्रार नोंदविली आहे.

    सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी सांगितले कि प्रशासनाने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश तात्काळ द्यावे व त्याची अंमलबजावणी करावी. यापुढे मुख्यालयी नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विरुद्ध आक्रमक आंदोलन उभे करू परिणामी आंदोलनात तोडफोड झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनावर येईल असा इशारा दिला आहे.

  • Bhushan Fuse : एक वाढदिवस असाही

    Bhushan Fuse : एक वाढदिवस असाही

    Bhushan Fuse चंद्रपूर – सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी वाढदिवसाच्या निमित्याने आगळावेगडा उपक्रम राबवीला. राजुरा विधानसभा क्षेत्रातील धार्मिक स्थळाना भेटी दिल्यात. रुग्णांना फळ वाटप केले. शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. विधानसभेतील अनेक गावातील समर्थकांनी विविध उपक्रम राबविलेत.

    ओबीसी महासंघाचे 9वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब येथील अमृतसर मध्ये

    Bhushan fuse राजुरा विधानसभेतील अनेक प्रश्नांना आंदोलनाच्या माध्यमातून भूषण फुसे यांनी वाचा फोडली आहे. जीवती, कोरपना, गोंडपिपरी, राजुरा तालुक्यात त्यांचा समर्थकांची संख्या मोठी आहे. नुकतेच भूषण फुसे यांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. विविध धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्यात.विविध ठिकाणी त्यांचा समर्थकांनी वृक्षारोपण केले. गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.करंजी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.गडचांदूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर,संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर कमिटी तर्फे भूषण फुसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती.

    अनोखे उपक्रम…

    गोंडपिपरी तालुक्यातील जोगापूर येथील गुरुद्वारा येथे फुसे यांनी दर्शन घेतले.जोगापूर गुरुद्वारा कमिटीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.पंचशील बुद्ध विहार गोडपिंपरी येथील भंतेजींना चिवरदान केले.राम मंदिर गोंडपिपरी येथे दर्शन केले.करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन्सिलचे वाटप.विध्यार्थाना नव्याकोऱ्या चप्पलाचे वाटप केले.शासकीय रुग्णालय गोंडपिपरी येथे फळ व नवजात शिशूंची किट वाटप करण्यात आली. फुसे यांनी स्वतःच्या हाताने चिमुकलांना चपला घालून दिल्या. हे क्षण बघताच सर्व चिमुकले व त्यांचे पालक तसेच शिक्षक भावनिक झाले होते.

  • ग्रामपंचायत निवडणुकीत BRS पक्षाचा मास्टर स्ट्रोक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात त्यांनी सांगितलं आहे. बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जात आहे. फुसे यांनी थेट विकासाच्या मुद्द्याला हात घातल्याने प्रस्थापितांची कोंडी झाली आहे.

     

    राजुरा विधानसभा क्षेत्र आजही मागासलेलं आहे. जीवती, गोंडपीपरी, कोरपणा, राजुरा तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही.या चार तालुक्यात अनेक प्रश्न आजही उभे आहेत. या क्षेत्रातील आमदारांचे विकासा बाबत कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेत रोष बघायला मिळते. अश्यात जिल्हात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केली. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला चेहरा भूषण फुसे यांच्याकडे धुरा आली. अल्पवधित बीआरएसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विश्वास जिंकला.तेलंगनाला लागून असलेला या भागात ” अब की बार, किसान सरकार ” नारा गुंजू लागला.

     

    विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत.या निवडणूकित बीआरएसच्या उमेदवाराची कृती लक्षवेधक ठरली आहे.रामपूर ग्रामपंचायतीत बीआरएसने उमेदवार उभे केले आहे. या उमेदवारानी गावासाठी काय करणार ? हे थेट स्टॅम्प पेपरवर शपथ पत्रच लिहून दिला आहे.सरिता रायपोचम काटन, ज्योती नळे,माधुरी आंबेकर,विजय हजारे,कपिल धेटे,रामपोचम काटम या उमेदवारानी शपथ पत्र लिहिलं. या शपथ पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    काय लिहिलं शपथ पत्रात..

    उमेदवारांनी शपथपत्रांमध्ये गावविकास करण्याची शपथ घेतली.गावात पाण्याची समस्या आहे.ही समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. सोबतच गावातील अंतर्गत रस्त्याची निर्मिती करणार,गावाला डुक्कर मुक्त करणार, नाली, कचराकुंडीचे बांधकाम करणार असं शपथपत्रात त्यांनी लिहून दिल आहे.

  • येल्लो मोझॅक ने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्हात आलेल्या पुराने, संततधार पावसाने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. या संकटाशी दोन हात करीत बळीराजाने शेती उभी केली. मात्र सोयाबीनचा पेरा केलेल्या बळीराजावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.येल्लो मोझाक रोगाने सोयाबीनचे पीक उध्वस्त झाल. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडलीत तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत नागरून काढलं.

     

    सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला होती.मात्र अद्याप साधे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा भारत राष्ट्र समितीने निषेध नोंदवीला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत देण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे नेते भुषण फुसे यांनी केली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केल्या गेली .त्यापैकी जवळजवळ 53 हजार हेक्टरवरील सोयाबीनवर येल्लो मोझाक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. नगदी पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.येल्लो मोझाकचा प्रादुर्भाव जिल्हात ऑगस्टमध्ये आढळला होता. त्यानंतर यावर उपाययोजना करायला हवं होतं. मात्र महाराष्ट्र शासन व कृषी विभागाच्या निष्क्रियतेमुळे वेळेत उपाय झाले नाहीत.त्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले.

     

    सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला आहे. मात्र अद्याप सोयाबीन शेतीचे साधे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन उदासीन आहे.शेतकरी विरोधी असलेल्या शासन व प्रशासनाचा भारत राष्ट्र समितीने जाहीर निषेध केला आहे. तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करा व त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करा अशी मागणी यावेळी भारत राष्ट्र समितीने केली आहे. अन्यथा भारत राष्ट्र समिती पीडित शेतकऱ्यांसोबत मिळून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलेला आहे. याप्रसंगी भारत राष्ट्र समिती राजुरा महिला समन्वयक ज्योतीताई नळे, नळे सर, राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, धनंजय बोर्ड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • भारत राष्ट्र समितीचे जनआक्रोश आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीचा आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वडल्याचे चित्र जीवती मध्ये दिसून आलं.जीवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने जनआक्रोश मोर्चा काढला. भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. अब की बार, किसान सरकार या घोषणानी जिवती शहर दुमदुमल होत.

     

    तेलंगणा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन गेलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील राजकारणात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभेला तुफान गर्दी एकवटली होती. राज्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या सभा पार पडल्या होत्या.मोठ्या संख्येने बीआरएस कडे जनता वढली असल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.दुसरीकडे राज्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जीवती शहरात ” अब की बार, किसान सरकार ” हा नारा गुंजला.

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली खरी मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्याही अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत.पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते.इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार झालेले नाही.

     

    अश्या विविध प्रश्नांना घेऊन भारत राष्ट्र समितीने जनआक्रोश मोर्चा काढला.भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे,शेत जमीनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प,युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, अश्या मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या होत्या.

     

    या मोर्च्यात सविता वझे, ज्योती नळे, अनुसूर्या नूती, राकेश चीलकुलवार, बालाजी कारले, अजय साकीनाला, आशिष नामवाड, लखन अडबाले, महेंद्र ठाकूर, सनी रेड्डी, सुभाष हजारे, सुभाष राठोड, सुबोध चिकटे, इस्लाम शेख, विजय राठोड, बालाजी आत्राम, गणेश शेंबडे, संघर्ष पडवेकर, नामदेव कोडापे यांनी सहभाग घेतला. तालुक्यातील खडकी रायपूर, लांबोरी ,महाराज गुडा ,पाटण, शेणगाव ,आंबेजरी, कुंबेजरी ,लेंडीगुडा, भारी ,धाबा, भूरीरऐसपूर, पल्लेजरी, टेकामांडवा, अर्जुना धोंडी सह अनेक गावातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.