Tag: भारत राष्ट्र समिती

  • Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- भारत राष्ट्र समिती जिवतीच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट जमिनीचे पट्टे देण्यात यावे व इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात यावी याकरिता भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आतापर्यंत महाराष्ट्र शासन व प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समितीने आज महाराष्ट्र शासन व प्रशासनाचा निषेध करण्याकरिता तहसील कार्यालय जिवती येथे चप्पल व जोडे दाखवीत निषेध व्यक्त केला. bharat rashtra samiti

     

    12 ऑक्टोबर 2023 रोजी जिवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने भुषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढला होता. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. Jivati taluka

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली, मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्या अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते, इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. Farmer protests

     

    तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार सुरू झालेले नाही. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेत जमिनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प, युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, गावात पाण्यासाठी नळ, घरकुल, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, न्यायालय, वसतिगृह, बीएसएनएलचे मोबाईल टावर, पटांगण, व्यायाम शाळा व वाचनालय सुरू करण्यात यावे. जिवती तालुक्यातील वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी, स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा उघडण्यात यावी अशा अनेक महत्त्वपूर्ण व रास्त मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून जिवती तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. Maharashtra government

     

    आंदोलनाच्या चौथ्या दिवस लोटूनही शासन व प्रशासनाने दखल घेतली नसल्याने बीआरएस आंदोलनकर्त्यांच्या वतीने शासनाला चप्पल – जोडे दाखवीत निषेध नोंदवला. Agricultural sector

    शासन व प्रशासनाने आंदोलनाची दखल घ्यावी आणि जिवती तालूका वासीयांना योग्य न्याय द्यावा असे आवाहन बि आर एस नेते भूषण फुसे यांनी केले आहे.

  • Jiwati Taluka : बीआरएस पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

    Jiwati Taluka : बीआरएस पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

    News34 chandrapur

    जिवती – चंद्रपूर जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती (BRS) च्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनांनी प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजुरा विधानसभेत बीआरएसला मिळणारा वाढता पाठिंबा जनभावना बदलल्याचे सूचित करतो. 12 ऑक्टोबर 2023 रोजी, BRS ने त्यांचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली जिवती तालुक्यात एक मोठा निषेध मोर्चा काढला होता. Jiwati taluka

     

    “अब की बार, किसान सरकार” (यावेळी शेतकऱ्यांसाठी सरकार) अशा घोषणा देत हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या टोकाला असलेला जिवती तालुका 21 वर्षांपूर्वी स्थापन झाला असला तरी विकासाच्या बाबतीत अजूनही मागे आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुख्य रस्ते, आरोग्य सेवा, पिण्याचे शुद्ध पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. परिसरातील शिक्षण व्यवस्थेतही सुधारणेची नितांत गरज आहे. शेतजमिनीचे पट्टे मिळावेत ही येथील लोकांची प्राथमिक मागणी आहे. तालुक्यातील जमीन परिवर्तनाची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकरी अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत. Bharat rashtra samiti

     

    या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बीआरएसने जिवती तालुक्यातील वनविभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करून स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करण्याच्या मागणीसाठी १९ फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू केला. जिवती तालुक्यातील रहिवाशांनी आपल्या मूलभूत मागण्यांची निकड अधोरेखित करत या अनिश्चित काळासाठीच्या उपोषणाला मोठ्या संख्येने आकर्षित केले. Agitations

     

    जिवती तालुक्यातील लोकही सिंचन प्रकल्प, तरुणांना रोजगार वाढविण्यासाठी उपाययोजना, गावागावात पाण्याचे नळ बसवून शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे, निवारागृहे, ग्रामीण रुग्णालये, बसस्थानक, न्यायालये, वसतिगृहे, बीएसएनएल मोबाईलची उभारणी आदी मागण्या करीत आहेत. टॉवर, खेळाची मैदाने आणि लायब्ररी. या मागण्या या प्रदेशातील सर्वसमावेशक विकास आणि प्रगतीची इच्छा दर्शवतात. Protest march

     

    भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांनी जिवती तालुक्याला भेडसावणाऱ्या प्रदीर्घ समस्यांकडे लक्ष वेधले असून रहिवाशांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे. या आंदोलनांचा चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर काय परिणाम होतो हे पाहणे बाकी आहे.

  • Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

    Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

    Self Defense राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

    आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    14 ऑगस्टला अनुकंपा धारकांचे मनपा समोर आमरण उपोषण

    Self defense या उपक्रमाचे प्रशिक्षक सेऩसाई ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॉन कुंदन पेंदोर सर आहेत. सध्या हा उपक्रम गोंडपीपरी मध्ये सुरू करण्यात आला असून लवकरच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे.

    देशात व राज्यात महिला असुरक्षित असल्याचे प्रमाण खूप जास्त आहे, त्याकरिता महिला व मुलींना आत्म रक्षणाचे धडे गिरविणे महत्वाचे आहे, ग्रामीण ते शहर हे प्रमाण सध्या सतत वाढत आहे, हे कुठेतरी थांबायला हवे, जोपर्यंत महिला स्वतःची रक्षा करण्याबाबत जागरूक होणार नाही तोपर्यंत विकृत मानसिकता वाली विक्रुती वाढत जाणार त्याकरिता महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    भारत राष्ट्र समितीने महिला व मुलींच्या हितासाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच निरंतर सुरू ठेवावे म्हणजेच गरजू मुलींना याचा लाभ नक्कीच मिळणार. न घाबरता महिला व मुलींनी समाजातील विकृतीचा धाडसपणे सामना करावा अशी इच्छा आयोजकांनी यावेळी व्यक्त केली आहे., करीता महिला व मुलींनी या निःशुल्क शिबिराचा लाभ घ्यायला हवा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • ग्रामपंचायत निवडणुकीत BRS पक्षाचा मास्टर स्ट्रोक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात त्यांनी सांगितलं आहे. बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जात आहे. फुसे यांनी थेट विकासाच्या मुद्द्याला हात घातल्याने प्रस्थापितांची कोंडी झाली आहे.

     

    राजुरा विधानसभा क्षेत्र आजही मागासलेलं आहे. जीवती, गोंडपीपरी, कोरपणा, राजुरा तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही.या चार तालुक्यात अनेक प्रश्न आजही उभे आहेत. या क्षेत्रातील आमदारांचे विकासा बाबत कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेत रोष बघायला मिळते. अश्यात जिल्हात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केली. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला चेहरा भूषण फुसे यांच्याकडे धुरा आली. अल्पवधित बीआरएसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विश्वास जिंकला.तेलंगनाला लागून असलेला या भागात ” अब की बार, किसान सरकार ” नारा गुंजू लागला.

     

    विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत.या निवडणूकित बीआरएसच्या उमेदवाराची कृती लक्षवेधक ठरली आहे.रामपूर ग्रामपंचायतीत बीआरएसने उमेदवार उभे केले आहे. या उमेदवारानी गावासाठी काय करणार ? हे थेट स्टॅम्प पेपरवर शपथ पत्रच लिहून दिला आहे.सरिता रायपोचम काटन, ज्योती नळे,माधुरी आंबेकर,विजय हजारे,कपिल धेटे,रामपोचम काटम या उमेदवारानी शपथ पत्र लिहिलं. या शपथ पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    काय लिहिलं शपथ पत्रात..

    उमेदवारांनी शपथपत्रांमध्ये गावविकास करण्याची शपथ घेतली.गावात पाण्याची समस्या आहे.ही समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. सोबतच गावातील अंतर्गत रस्त्याची निर्मिती करणार,गावाला डुक्कर मुक्त करणार, नाली, कचराकुंडीचे बांधकाम करणार असं शपथपत्रात त्यांनी लिहून दिल आहे.

  • येल्लो मोझॅक ने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्हात आलेल्या पुराने, संततधार पावसाने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. या संकटाशी दोन हात करीत बळीराजाने शेती उभी केली. मात्र सोयाबीनचा पेरा केलेल्या बळीराजावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.येल्लो मोझाक रोगाने सोयाबीनचे पीक उध्वस्त झाल. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडलीत तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत नागरून काढलं.

     

    सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला होती.मात्र अद्याप साधे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा भारत राष्ट्र समितीने निषेध नोंदवीला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत देण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे नेते भुषण फुसे यांनी केली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केल्या गेली .त्यापैकी जवळजवळ 53 हजार हेक्टरवरील सोयाबीनवर येल्लो मोझाक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. नगदी पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.येल्लो मोझाकचा प्रादुर्भाव जिल्हात ऑगस्टमध्ये आढळला होता. त्यानंतर यावर उपाययोजना करायला हवं होतं. मात्र महाराष्ट्र शासन व कृषी विभागाच्या निष्क्रियतेमुळे वेळेत उपाय झाले नाहीत.त्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले.

     

    सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला आहे. मात्र अद्याप सोयाबीन शेतीचे साधे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन उदासीन आहे.शेतकरी विरोधी असलेल्या शासन व प्रशासनाचा भारत राष्ट्र समितीने जाहीर निषेध केला आहे. तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करा व त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करा अशी मागणी यावेळी भारत राष्ट्र समितीने केली आहे. अन्यथा भारत राष्ट्र समिती पीडित शेतकऱ्यांसोबत मिळून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलेला आहे. याप्रसंगी भारत राष्ट्र समिती राजुरा महिला समन्वयक ज्योतीताई नळे, नळे सर, राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, धनंजय बोर्ड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • भारत राष्ट्र समितीचे जनआक्रोश आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीचा आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वडल्याचे चित्र जीवती मध्ये दिसून आलं.जीवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने जनआक्रोश मोर्चा काढला. भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. अब की बार, किसान सरकार या घोषणानी जिवती शहर दुमदुमल होत.

     

    तेलंगणा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन गेलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील राजकारणात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभेला तुफान गर्दी एकवटली होती. राज्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या सभा पार पडल्या होत्या.मोठ्या संख्येने बीआरएस कडे जनता वढली असल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.दुसरीकडे राज्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जीवती शहरात ” अब की बार, किसान सरकार ” हा नारा गुंजला.

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली खरी मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्याही अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत.पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते.इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार झालेले नाही.

     

    अश्या विविध प्रश्नांना घेऊन भारत राष्ट्र समितीने जनआक्रोश मोर्चा काढला.भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे,शेत जमीनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प,युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, अश्या मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या होत्या.

     

    या मोर्च्यात सविता वझे, ज्योती नळे, अनुसूर्या नूती, राकेश चीलकुलवार, बालाजी कारले, अजय साकीनाला, आशिष नामवाड, लखन अडबाले, महेंद्र ठाकूर, सनी रेड्डी, सुभाष हजारे, सुभाष राठोड, सुबोध चिकटे, इस्लाम शेख, विजय राठोड, बालाजी आत्राम, गणेश शेंबडे, संघर्ष पडवेकर, नामदेव कोडापे यांनी सहभाग घेतला. तालुक्यातील खडकी रायपूर, लांबोरी ,महाराज गुडा ,पाटण, शेणगाव ,आंबेजरी, कुंबेजरी ,लेंडीगुडा, भारी ,धाबा, भूरीरऐसपूर, पल्लेजरी, टेकामांडवा, अर्जुना धोंडी सह अनेक गावातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.