Tag: भारतीय सैन्य

  • 5 km tiranga rally Chandrapur । देशभक्तीची ज्वाला पेटली! चंद्रपूरमध्ये ५ किमी तिरंगा रॅलीला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    5 km tiranga rally Chandrapur

    5 km tiranga rally Chandrapur : चंद्रपूर – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी “नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक” या उपक्रमांतर्गत पाच किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढून चंद्रपूरकरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला भव्य सलामी दिली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून पार पडलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाला हजारो नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यात विविध धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकतेचे दर्शन घडले. tiranga rally in Chandrapur 2025

    चंद्रपूरमध्ये पुराचा इशारा, तातडीने नियोजन करा

    संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर सदर रॅली जय घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. या रॅलीत शहरातील विविध भागांतून तरुण,  विद्यार्थी,  महिलावर्ग,  सामाजिक संस्था, व्यापारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशाल तिरंगा खांद्यावर घेऊन चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान, देशप्रेम आणि एकतेचा झळाळता प्रकाश दिसत होता. citizens salute to Indian Army

    Powered by myUpchar

    हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

    या रॅलीत विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र प्रत्यक्ष साकार झाला. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन बांधवांनी एकत्र येऊन देशाच्या एकतेचा संदेश दिला. या प्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, भारतीय जवानांच्या बलिदानामुळे आपण शांततेत जगतो. त्यांच्या सन्मानार्थ आपण कृतज्ञतेने झुकतो. ही रॅली केवळ एक कार्यक्रम नसून चंद्रपूर शहराची राष्ट्रभक्तीची आणि एकतेची ताकद जगाला दाखवणारा संदेश आहे.

    citizen salute to indian army

    कार्यक्रमात भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा देत वातावरण देशभक्तीने भारावले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी फलक आणि बॅनरद्वारे देशप्रेमाचे संदेश दिले, तर काही ठिकाणी बॅण्ड पथकाच्या गजरात रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅली जटपूरा गेटला वळसा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्गाच्या वतीने पाणी, शीतपेय, फळांचे वाटप करत आपला सहभाग नोंदविला. या रॅलीत जवळपास २०० सामाजिक संघटना आणि पाच हजार देशभक्त नागरिक सहभागी झाले होते.

  • Kishor Jorgewar on Indian Army । देशगौरवासाठी पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र येणे हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन – आ. किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar on Indian Army

    Kishor Jorgewar on Indian Army : चंद्रपूर – भारतीय सैन्य हे केवळ रणांगणावर लढणारे शूर योद्धे नाहीत, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यांचे शौर्य, त्यांची निःस्वार्थ सेवा आणि मातृभूमीबद्दलची निष्ठा हीच खरी देशभक्ती आहे. १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा सैन्याचा आत्मविश्वास वाढवतो. आज आपण पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र आलो आहोत, हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरात होणार महापंचायत

    चंद्रपुरात शौर्य उत्सव

    भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर वंदन भारतीय सैन्याच्या शौर्याला या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत भारतीय सैन्याला सामूहिक वंदन केले. यावेळी आमदार जोरगेवार बोलत होते. Kishor Jorgewar Indian Army salute Chandrapur

    कार्यक्रमास मनीष महराज, पास्टर बिपीन, जामा मस्जिद चे मौलाना इमाम दिलशाद रजा, माजी सैनिक अश्विन दूर्गे, रोषण अलोणे, ओबीसी नेते अशोकराव जीवतोडे, कॉंगेसचे माजी नगर सेवक नंदुजी नागरकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडूजी हजारे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, दशरथसिंह ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझले, तुषार सोम, प्रकाश देवतळे, सुभाष कसान कासनगोट्टूवार, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या चारुशीला बारसागडे, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर, नामदेव डाहुले, बंटी घाटे, गुरुदेव सेवा मंडळाचे दादाजी नंदनवार  मिलिंदजी गंपावार, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर,  पंडित मथुराप्रसाद पांडे, नळे, माजी सैनिक राजेंद्र भोयर, माजी सैनिक गोविंदा डोमकावळे, माजी सैनिक धोंडुबा सपाट, माजी सैनिक मदन देशकर, माजी सैनिक अरुण मालेकर, मधुसूदन रुंगठा, संजय बोरघाटे, वाणी राव, अनिल समर्थ आदींची मंचावर उपस्थिती होती.

    भारतीय सैन्य हि आपली सुरक्षा

    यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, आज आपण केवळ एक भावना, एक श्रद्धा आणि एक अभिमानाने भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणारे, कठीण हवामानातही ताठ मानेने उभे असलेले, प्रत्येक संकटात देशवासीयांचा जीव मोलाचा मानणारे भारतीय जवान आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. भारतीय सेना ही केवळ एक लष्करी शक्ती नाही, ती आपली अस्मिता आहे, आपली सुरक्षा आहे आणि आपले अभिमानाचे प्रतीक आहे. Chandrapur citizens salute Indian soldiers

    Indian Army honor ceremony Chandrapur

    आजच्या कार्यक्रमात सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय लोक एकत्र आले आहेत. हाच खरा भारत आहे. विविधतेत एकता आणि राष्ट्रप्रेम हाच आपल्या संस्कृतीचा पाया असून, हाच देशाचा गौरव आहे. देशासाठी लढणारा जवान जात, धर्म, पक्ष, प्रांत याच्या पलीकडे जातो. त्याला फक्त भारत माता दिसते. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळेच आपण शहरात आणि गावात सुरक्षित आहोत. त्यांच्या बलिदानाची परतफेड कधीच शक्य नाही, पण त्यांच्या कार्याला अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे, सैन्याने केवळ सीमारेषा सुरक्षित ठेवल्या नाहीत, तर आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. Chandrapur patriotic event honoring soldiers

    त्यांच्या योगदानाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झाली तर ती पुरेशी नाही. ही कृतज्ञता आपल्याला दररोज जगायला हवी. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विविध धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमजद खान यांनी आभार  प्रदर्शन केले तर प्रज्ञा जीवनकर यांनीसूत्र संचलन केले.