Tag: भद्रावती पोलीस

  • अंधाराचा फायदा घेत तो घरात शिरला आणि…

    crime against women : भद्रावती १० डिसेंबर २०२५ (News३४) – २९ वर्षीय विवाहित महिलेच्या घरी प्रवेश करून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा हात पकडत महिलेच्या अंगाला स्पर्श करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा भद्रावती पोलिसांनी दाखल केला आहे. (हे वाचा – जटपुरा गेट परिसरात एकाच दिवशी दोन घरफोड्या)

    ९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता महिला घरी एकटी होती महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेल्याने संधीचा फायदा घेत भाऊराव उरकांडे ने सदर महिलेच्या घरी प्रवेश करीत दाराची कडी आतून लावली. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा भाऊराव ने हात पकडला. त्याने तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न सुद्धा केला. crime against women

    इतक्यात पीडित महिलेचा पती घरी आला, पटीने दार ठोठावले असता भाऊराव ने घाबरत पळ काढला. या सर्व प्रकाराबाबत महिलेने भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. पोलिसांनी भाऊराव उरकांडे यांच्यावर कलम ३२९ (४) व ७५ (१) (i) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

  • animal cruelty prevention act । १७ गोवंशांची सुटका; प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

    animal cruelty prevention act

    animal cruelty prevention act : भद्रावती (चंद्रपूर): भद्रावती पोलिसांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १७ गोवंशांची सुटका केली आहे. ही कारवाई ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता भद्रावती तालुक्यातील नवरगाव शिवारात एका विटाभट्टीजवळच्या शेतात करण्यात आली. पोलिसांनी या गोवंशांना भद्रावती येथील जैन मंदिर गोशाळेत सुपूर्द केले आहे. police rescue cows from illegal slaughterhouse

    भद्रावती पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, तालुका मुख्यालयापासून १२ किमी दूर असलेल्या नवरगाव शिवारात, जिथे एक विटाभट्टी देखील आहे, तेथील कृषी साहित्य ठेवण्याच्या खोलीत गायी, बैल आणि वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आली आहेत.

    चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

    १७ गोवंशाची सुटका

    सायंकाळी ६.३० वाजता पीएसआय संजय मिश्रा आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांना तिथे एका खोलीत सर्व गुरे बांधलेली दिसली. या गुरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. पोलिसांनी तपासणी केली असता, सुमारे ४.२५ लाख रुपये किमतीचे एकूण १७ गोवंश आढळून आले. पोलिसांनी या सर्व गोवंशांना सुखरूप बाहेर काढून भद्रावती येथील जैन मंदिर गोशाळेत पाठवले.

    पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, त्यांना कळाले की ही खोली डोलारा गावातील शेख अबु नावाच्या व्यक्तीची आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी फरार आरोपी शेख अबु शेख अहमद (वय ६०) याच्या विरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पीएसआय प्रियांका गेडाम करत आहेत

  • Chain snatching incident Bhadravati । सावध व्हा! भद्रावतीत चेन स्नॅचिंगची घटना, तीन आरोपी पकडले

    Chain snatching incident Bhadravati

    Chain snatching incident Bhadravati : भद्रावती – २० मे रोजी भद्रावती शहरातील शास्त्रीनगर भागात महिलेच्या गळ्यातील सोन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती, याबाबत पोलिसात तक्रार दिल्यावर भद्रावती पोलिसांनी या प्रकरणात २ आरोपीसह विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून सोन्याची चैन जप्त करण्यात आली. Bhadravati police arrest chain snatchers

    राज्यातील पहिले वन नियंत्रण कक्ष चंद्रपुरात

    २० मे रोजी भद्रावती शहरातील शास्त्रीनगर वार्ड मध्ये रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात युवकांनी जबरीने हिसकावली, याबाबत महिलेने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

    अल्पवयीन बालकाचा गुन्ह्यात समावेश

    पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला असता या प्रकरणी १९ वर्षीय थॉमस अशोक दुधे राहणार नवीन सुमठाना, दानिश बेग राहणार डोलारा तलाव व एका १७ वर्षीय विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले.

    आरोपीजवळून पोलिसांनी चोरी गेलेली १५ ग्राम सोन्याची चैन असा एकूण १ लक्ष ५० हजार रुपयांचा माल हस्तगत केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी न्योमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अनुप आसटूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे व योगेश घाटोळे यांनी केली.