Tag: ब्रह्मपुरी पोलीस

  • कत्तलीसाठी नेणारी २० जनावरे वाचली; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    animal cruelty Transport : ब्रह्मपुरी ९ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने ८ डिसेंबर रोजी कत्तलीसाठी नेणारे व बांधून ठेवलेल्या २० जनावरांची सुटका करीत तब्बल २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे दोन पिकअप वाहने थांबवित झडती घेतली असता वाहनात ६ गोवंशीय जनावरे मिळून आले. (हे हि वाचा – तंबाखू माफियांवर होणार मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री फडणवीस)

    कत्तलीसाठी नेत होते जनावरे

    सदर गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे चालकांनी सांगितले, व अजून काही जनावरे असल्याची त्यांनी माहिती दिली, चालकांनी सांगितलेल्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पथक पोहचले असता तिथे १४ गोवंशीय जनावरे बांधलेल्या अवस्थेत होते. animal cruelty Transport

    ३ आरोपींवर गुन्हा दाखल

    आरोपीच्या ताब्यातून २० गोवंशीय जनावरे सहित दोन पिकअप वाहने असा एकूण २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी २० वर्षीय मिलिंद जितेंद्र कोवे राहणार उदापूर ब्रह्मपुरी, ३३ वर्षीय अफसर अली सय्यद ब्रह्मपुरी व पाहिजे असलेला आरोपी पहेलवार राहणार ब्रह्मपुरी यांच्या विरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ४९ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी जयंत चुनारकर, अजित शेंडे व नितेश महात्मे यांनी केली. घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.

  • police bust farm equipment theft । पोलिसांनी तात्काळ उघड केला शेतीसाठी लागणाऱ्या पंप चोरीचा गुन्हा

    police bust farm equipment theft

    police bust farm equipment theft : ब्रह्मपुरी, [१८ ऑगस्ट] – ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनने केलेल्या धडाकेबाज कारवाईत, चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील ₹४४,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये सबमर्सिबल मोटार पंप, सोलर सबमर्सिबल मोटार पंप आणि ३५ फूट लांबीची केबल यांचा समावेश आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

    चंद्रपुरात गांजाची वाहतूक, दोघांना अटक

    गुन्ह्यांचा तपशील

    ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये (गुन्हा क्र. ९०/२०२५ आणि १०८/२०२५, दोन्ही कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता) अज्ञात चोरट्यांनी शेतीसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे साहित्य चोरून नेले होते. यामध्ये खालील वस्तूंचा समावेश होता: Recovery of stolen cable farm pump Bramhapuri

    • सबमर्सिबल मोटार पंप
    • सोलर सबमर्सिबल मोटर पंप
    • मोटार पंपासाठी वापरण्यात आलेली ३५ फूट केबल

    चोरीला गेलेल्या या साहित्याची एकूण अंदाजे किंमत ₹४४,०००/- होती.

    पोलिसांची कारवाई

    गुन्हे दाखल झाल्यानंतर, ब्रह्मपुरी पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला. तपास पथकाने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर, दोन आरोपींना पकडण्यात यश आले. यामध्ये:

    1. रणजीत खुशाल मेंढे, वय २१ वर्षे, रा. उदापूर
    2. एक विधी संघर्ष बालक, वय १५ वर्षे

    या आरोपींकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    नेतृत्व आणि तपास पथक

    ही महत्त्वपूर्ण कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक बानबले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पो.हवा. मुकेश गजभे, योगेश शिवणकर, अजय कटाई, पो.अं. निलेश तुमसरे, इशाद खान, स्वप्नील पळसपगार आणि चंदू कुलसंगे यांचा सहभाग होता.

    सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा. मुकेश गजभे करत आहेत.

  • burglary case solved by Brahmapuri police । ब्रह्मपुरीत चोरांची धडकी! पण पोलिसांची यशस्वी सर्जिकल स्ट्राईक

    burglary case solved by Brahmapuri police

    burglary case solved by Brahmapuri police : ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डी.बी. पथकाच्या (गुन्हे शोध पथक) सतर्कतेमुळे आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

    शिक्षक घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा – आमदार सुधाकर अडबाले

    मिळालेल्या माहितीनुसार, गोवर्धन नीलकंठ गायधने (वय ४१, रा. मराठा लेआउट, कुर्झा, ब्रह्मपुरी) यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १७ जून २०२५ रोजी ते कामासाठी बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लॉकरमधून ५०,००० रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. successful operation by DB team Brahmapuri


    आरोपींची ओळख पटली

    गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने तातडीने अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी अनिल रामभाऊ दांडेकर (वय ३०, रा. हत्तीगोटा, ब्रह्मपुरी) आणि विकी ज्ञानेश्वर जांगडे (वय ३०, रा. नानोरी, ता. ब्रह्मपुरी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सदर घरफोडी केल्याची कबुली दिली.


    मुद्देमाल जप्त

    आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ७,५०० रुपये रोख रक्कम, चोरी केलेल्या पैशातून विकत घेतलेला ५,५०० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, ५,००० रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १५,००० रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची नाकातील नथ असा एकूण ३३,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायालय, ब्रह्मपुरी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Brahmapuri crime branch nabs house theft accused


    यशस्वी कामगिरी करणारे पथक

    ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहा. पो. नि. मनोज खडसे, पो. हवालदार योगेश शिवणकर, पो. हवालदार अजय कटाईत, पो. ना. मुकेश गजबे, पो. शिपाई स्वप्नील पळसपगार, चंदू कुलसंगे, इरशाद खान आणि निलेश तुमसरे यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मुकेश गजबे करत आहेत.

  • Chandrapur Murder : शिवीगाळ केली म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

    Chandrapur Murder : शिवीगाळ केली म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

    News34 chandrapur

    ब्रम्हपुरी:- तालुक्यातील पाच किमी अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे आज 12 फेब्रुवारीला सकाळी हत्येची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. Chandrapur crime

     

    मालडोंगरी येथे राहणारे जयदेव पिल्लेवान व त्याची पत्नी हिरकण्या यांच्यामध्ये मागील 3 दिवसापासून भांडण होत होते, 11 फेब्रुवारीला रात्री 11 वाजताच्या सुमारास पती-पत्नी मध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी मुलगा जॉकीस हा उपस्थित होता, मात्र नेहमीच होत असलेला हा प्रकार बघून त्याने लक्ष दिले नाही. Murder news

     

    सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती उठली नाही, आई च्या जवळ गेला असता ती मृत अवस्थेत होती, मृतक हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा होत्या.

     

    मृतक हिरकण्या यांनी पती जयदेव ला शिवीगाळ केल्याने त्यांनी हिरकण्या ला हाथ-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्या मारहाणीत हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मार लागला त्या मारहाणीत हिरकण्या यांचा मृत्यू झाला होता.

     

    मुलगा जॉकीस याने याबाबत ब्रह्मपुरीं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत आरोपी जयदेव ला अटक केली. पुढील तपास ब्रह्मपुरीं पोलीस करीत आहे.

  • कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

    कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी/चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या वाहतूक व्यवस्था बेलगाम झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, त्यावर आता ट्रॅव्हल्स धारकांची मुजोरी कायम आहे, चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आम्ही कायद्याला न भिणारे अशी स्वतःची ओळख ट्रॅव्हल्स धारक निर्माण करीत आहे, बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी केला असता उलट त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

     

    रविवारी गडचिरोलीवरून नागपूर कडे जाणारी ट्रॅव्हल्स MH49 AT 3625 ही रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली होती, रेल्वे फाटक उघडले मात्र ट्रॅव्हल्स धारकाने वाहन एक साईड दाबल्याने इतर वाहनांना जाण्यासाठी मार्ग नव्हता, त्यामुळे रेल्वे फाटक येथे जाम झाला, तितक्यात ब्रह्मपुरी चे ठाणेदार सुधाकर अंभोरे हे आपल्या कुटुंबासहित ब्रह्मपुरी च्या दिशेने येत होते.

     

    अंभोरे यांना वाहतूक खोळंम्बली असल्याचे निदर्शनास आल्यावर ते वाहनाच्या खाली उतरले, त्यांनी तात्काळ ट्रॅव्हल्स चालकाला वाहन पुढे नेण्यास सांगितले मात्र चालकाने त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळी केली, ठाणेदार अंभोरे हे साध्या गणवेशात होते, तरीसुद्धा त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट मुजोर चालकाने त्यांना शिवीगाळ केली.

     

    ठाणेदार अंभोरे यांनी ट्रॅव्हल्स पुढे थांबविण्यास सांगितली मात्र चालक त्यांचं ऐकायला तयार नव्हता, अंभोरे यांनी वाहतूक पोलिसाला याबाबत सूचना केल्या, ट्रॅव्हल्स ख्रिस्तानंद चौकात थांबली, आणि ठाणेदारांनी चालकाला शिस्त घडवली.

     

    चौकात नेमकं काय घडलं? ठाणेदार अंभोरे काय म्हणाले?

    वाहतूक व्यवस्था खोळंम्बली होती, मी त्या चालकाला ट्रॅव्हल्स पुढे नेण्यास सांगितली मात्र मलाच त्याने उलट शिवीगाळी करणे सुरू केले, मी सामान्य नागरिक प्रमाणे त्याच्याशी बोललो मात्र त्याने शिवीगाळी देत उलट उत्तर दिले, मी पोलीस आहे हे त्यांना कळले नाही, पण सामान्य नागरिकांसोबत हे ट्रॅव्हल्स धारक असेच वागत असतील.

     

    मी त्यांचं वाहन पुढच्या चौकात थांबविले, तितक्यात वाहनातून खाली उतरताना चालकाला लागले, त्याला वाहतुकीच्या नियमाबद्दल सांगितले. मात्र तो मुजोरी करीत असल्याने त्याला खाकीचा दम दाखवीत कानशिलात लगावली असे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले.

     

    कोण आहे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे?

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पदी असताना त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घातला होता, अनेक आव्हानात्मक गुन्ह्याचा त्यांनी छडा लावला, शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी असताना सुधाकर अंभोरे यांच्या शिस्तीची चर्चा चहूबाजूने होते, त्यांच्या हद्दीत गुन्हेगार गुन्हा करताना घाबरत होता.

     

    गुन्हा कुणी केला तर तो कोणत्या पक्षाचा? किंवा प्रतिष्ठित व्यक्ती नसून तो फक्त गुन्हेगार आहे, अशी कायद्याची बाजू नेहमीच अंभोरे घेत होते, कायद्यापुढे सर्व समान हे वक्तव्य ते नेहमी करायचे.

     

    ब्रह्मपुरी मध्ये घडलेला हा प्रसंग अनेकांनी त्यांची चूक दर्शविली मात्र विशेष बाब म्हणजे पोलीस जेव्हा फायबर लाठी ने मारतात तर ते कधी डोक्यावर मारत नाही, अनेकांनी अंभोरे यांनी चालकाला दांडूक्याने मारहाण केली असा उल्लेख बातमीमध्ये आला आहे, दांडू पोलीस विभागातून अनेक वर्षापूर्वी हद्दपार झाला, आता फायबर लाठी ने त्याची जागा घेतली आहे.

     

    अंभोरे हे वर्दीत नसतानाही आपलं कर्तव्य पार पाडत होते, जिथे चुकते तिथेचं कायदा खुपते, हेच या प्रकरणात घडलं आहे. ट्रॅव्हल्स चालकाने याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे, आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गुन्हेगारी नावापुरती उरली आहे, पोलीस निरीक्षक अंभोरे यांची उचलबांगडी लवकर व्हावी या हेतूने ही तक्रार केली अशी चर्चा आता सुरू झाली आहे.